ETV Bharat / state

रमेश कदम, बाळा भेगडे, विवेक कोल्हे...; शरद पवारांचे जुने मावळे पुन्हा 'तुतारी' फुंकणार - SHARAD PAWAR

शरद पवारांनी विधानसभा निवडणुकांची तयारी सुरू केलीय. महाराष्ट्रात ठिकठिकाणी माणसं हेरून ठेवलीत, आता पवार त्यांना आपल्या गळाला लावतायत, असंही चंदन शिरवाळे म्हणालेत...

sharad pawar
शरद पवार (ETV Bharat File Photo)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 9, 2024, 4:11 PM IST

Updated : Oct 9, 2024, 6:02 PM IST

मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात आता पुन्हा एकदा जोरदार इनकमिंग सुरू झालंय. वेगवेगळ्या पक्षातून बडे नेते पवारांच्या पक्षात दाखल होताहेत. पवारांनी अतिशय सूक्ष्म पातळीवर नियोजन करीत नेत्यांना गळाला लावण्याचा प्रयत्न सुरू ठेवल्याने विधानसभा निवडणुकीतसुद्धा शरद पवारांचा पक्ष प्रभावी ठरण्याची चिन्हे निर्माण झालीत. शरद पवार यांचा अजूनही महाराष्ट्रात करिष्मा सुरू राहील, अशी प्रतिक्रिया जाणकार व्यक्त करीत आहेत.

पवार यांच्या पक्षाला बरे दिवस येणार : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि सर्वेसर्वा शरद पवार यांच्या कार्याचा आणि कारकीर्दीचा प्रभाव पुन्हा एकदा महाराष्ट्रात दिसू लागलाय. कितीही पक्षाची पडझड झाली तरी आपण पुन्हा डाव सावरू शकतो आणि पुन्हा एकदा टक्कर देऊ शकतो, असे शरद पवार यांनी आपल्या कृतीतून सिद्ध केलंय. लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांनी महाराष्ट्रात फिरून ज्या पद्धतीने पक्षाची मोट पुन्हा एकदा बांधली आणि आपल्याकडे विजयश्री खेचून आणला ते पाहता शरद पवार यांना पुन्हा एकदा महाराष्ट्राने स्वीकारल्याचं दिसतंय.

ज्येष्ठ राजकीय विश्लेषक चंदन शिरवाळे (ETV Bharat Reporter)

पवारांची निवडणुकीतील रणनीती : या पार्श्वभूमीवर आता आगामी निवडणुकांमध्ये शरद पवार यांच्या पक्षाला बरे दिवस येण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुका संपताच आनंदोत्सव साजरा करत न बसता शरद पवारांनी विधानसभा निवडणुकांची तयारी सुरू केली होती, त्यासाठी त्यांनी महाराष्ट्रात ठिकठिकाणी माणसं हेरून ठेवली होती आणि त्या माणसांना आता पवार आपल्या गळाला लावत आहेत, पवारांची ही निवडणुकीतील रणनीती अधिक प्रभावी ठरू शकण्याची शक्यता ज्येष्ठ राजकीय विश्लेषक चंदन शिरवाळे यांनी व्यक्त केलीय.

काय आहे पवारांची रणनीती?: राज्यामध्ये पुन्हा एकदा कोणत्या मतदारसंघात कोणत्या नेत्याचा प्रभाव आहे, जनतेच्या मनात त्या नेत्याविषयी काय भावना आहेत. जिंकून येण्याची नेत्याची क्षमता किती आहे आणि आपल्याला त्याला किती मदत द्यावी लागेल, याविषयी शरद पवार चाचपणी करीत आहेत. मतदारसंघनिहाय राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला कोणते मतदारसंघ येतील, याचा अंदाज बांधून संबंधित मतदारसंघात कोणाला तिकीट देता येईल, कोण प्रबळ दावेदार आहे, याचा विचार करून पवारसाहेब तशी आखणी करताना दिसताहेत. काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत असले तरी शरद पवार यांना या घडीला मुख्यमंत्रिपदाची चर्चा महत्त्वाची न वाटता सत्ता महत्त्वाची वाटतेय, तसे त्यांनी बोलूनही दाखवले आणि त्यांचे त्या दृष्टीने जोरदार प्रयत्नही दिसत असल्याचे शिरवाळे यांचं म्हणणं आहे.

कोण आहेत राष्ट्रवादीच्या वाटेवर? : शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात येण्यासाठी अनेक नेते इच्छुक आहेत. भारतीय जनता पक्षातून कोल्हापूर कागलमध्ये समरजीतसिंह घाटगे, इंदापूरमधून हर्षवर्धन पाटील आणि नवी मुंबईतून शिंदे गटाचे विजय नाहटा हे राष्ट्रवादीत दाखल झालेत. याशिवाय बार्शीमधून दिलीप सोपल, मोहोळ विधानसभा मतदारसंघातून राजन पाटील, रमेश कदम, वडगाव शेरी मतदारसंघातून बापू पाठारे, मावळ विधानसभा मतदारसंघातून बाळा भेगडे, कोपरगाव विधानसभा मतदारसंघात विवेक कोल्हे, वाई मतदारसंघात मदन भोसले, माढा मतदारसंघात रणजीत शिंदे, पंढरपूर मतदारसंघात प्रशांत परिचारक हे शरद पवार यांच्या पक्षाची तुतारी हातात घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे,

दिग्गज मंडळी शरद पवारांकडं? : सातारा जिल्ह्यातून रामराजे नाईक निंबाळकर आणि नवी मुंबईतून गणेश नाईक यांच्या नावाची ही चर्चा होताना दिसत आहे. एकूणच राजकारणातील ही दिग्गज मंडळी पुन्हा एकदा हातात तुतारी घेणार आणि राज्याच्या राजकारणात शरद पवारांचे हात पुन्हा बळकट होणार, अशी चिन्हे दिसत असल्याचे शिरवाळे यांनी सांगितलंय.

हेही वाचा

  1. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची आता पुरोगाम्यांशी जुळवून घेण्याची 'केडरनीती'
  2. भाजपाच्या इच्छुकानं थेट पालिकेकडं मागितली 'एनओसी'; पु्ण्यात राजकीय चर्चेला उधाण

Last Updated : Oct 9, 2024, 6:02 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.