ETV Bharat / state

आषाढी वारीनिमित्तानं पुण्यात वाहतुकीचे बदल; ही बातमी वाचूनच घराबाहेर पडा.... - Dnyaneshwar Maharaj Palkhi Ceremony - DNYANESHWAR MAHARAJ PALKHI CEREMONY

Dnyaneshwar Maharaj Palkhi Ceremony : श्री संत ज्ञानेश्वर महाराज (Dnyaneshwar Maharaj) आणि संत तुकाराम महाराज (Tukaram Maharaj) पालखी सोहळ्यासाठी वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. त्यामुळं पर्ययी मार्गांचा वापर करावा असं आवाहन, पोलीस प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे.

Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi Ceremony
पालखी सोहळ्या दरम्यान वाहतुकीत बदल (ETV BHARAT Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 23, 2024, 6:42 PM IST

पिंपरी (पुणे) Dnyaneshwar Maharaj Palkhi Ceremony : श्री संत तुकाराम महाराज (Tukaram Maharaj) यांची पालखी शुक्रवारी (ता. 28) देहूतून, तर श्री संत ज्ञानेश्वर महाराज (Dnyaneshwar Maharaj) यांची पालखी शनिवारी (ता.29) आळंदीतून आषाढी वारीसाठी (Ashadhi Wari 2024) प्रस्थान होणार आहे. संत तुकोबारायांच्या पालखीचा पहिला मुक्काम देहूतील इनामदार वाडा येथे आहे. शनिवारी ही पालखी आकुर्डीतील विठ्ठल मंदिर येथे मुक्कामासाठी येणार आहे.

या परिसरात वाहतुकीत बदल : माउलींच्या पालखीचा पहिला मुक्काम आळंदीतीलच गांधी वाडा येथे असणार आहे. त्यानंतर या दोन्ही पालख्या शनिवारी (ता. 30) पुण्याच्या दिशेने मार्गस्थ होणार आहेत. त्यामुळं रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर भाविकांची वर्दळ राहणार आहे. दरम्यान, भाविकांना कोणताही अडथळा निर्माण होऊ नये, हा सोहळा निर्विघ्न पार पडावा, यासाठी आळंदी, देहू, मोशी परिसरात वाहतुकीत बदल करण्यात आला आहे.

आळंदी परिसरातील बदल

• चिंबळी ते आळंदी रस्ता बंद राहणार असून, चिंबळी फाटा चौक, चाकण येथून आळंदीकडं येणारी वाहने जयगणेश साम्राज्य चौक, अलंकापुरम चौक मार्गे तसेच भोसरी चौक- मॅगझीन चौक मार्गे जातील.

• चाकण ते आळंदी या मार्गावरील वाहने जय गणेश साम्राज्य चौक, अलंकापुरम चौक मार्गे, भोसरी चौक-मॅगझीन चौक मार्गे जातील.

• वडगाव घेणंद ते आळंदी या मार्गावरील वाहने चाकण-वडगांव घेणंद शेळपिंपळगाव मार्गे कोयाळी कमान, कोयाळी-मरकळगाव मार्गे जातील.

• मरकळ ते आळंदी या मार्गावरील वाहने मरकळकडून धानोरेफाटा मार्गे चहोली फाटा- मॅगझीनचौक, अलंकापुरम चौक मार्गे जातील.

• भारतमाता चौक ते आळंदी या मार्गावरील वाहने जयगणेश साम्राज्य चौक, अलंकापुरम चौक मार्गे, भोसरी चौक- मॅगझीन चौक, मोशी- चाकण-शिक्रापूर मार्गे जातील.

• मोशी-आळंदी या मार्गावरील वाहने जयगणेश साम्राज्य चौक, अलंकापुरम चौक मार्गे, भोसरी.

• मोशी-आळंदी या मार्गावरील वाहने जयगणेश साम्राज्य चौक, अलंकापुरम चौक मार्गे, भोसरी चौक-मॅगझीन चौक, मोशी-चाकण-शिक्रापूर मार्गे जातील.

• विश्रांतवाडी ते आळंदी या मार्गावरील वाहने पुणे-दिघी मॅगझीन चौकाकडून आळंदीकडे येणारी वाहने भोसरी-मोशी-चाकणमार्गे शेलपिंपळगाव मार्गे जातील. अलंकापुरम- जयगणेश साम्राज्य चौक मार्गे जातील.

• आळंदीकडं येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना चहोली फाटा चौकाचे पुढे, डुडुळगाव जकात नाक्याचे पुढे, केळगाव चौक, बापदेव चौकाच्या पुढे, इंद्रायणी हॉस्पिटलचे पुढे, विश्रांतवाडीच्या, धानोरीफाटा/पीसीएस चौकाचे पुढे जाण्यास प्रवेश बंदी असेल.

• हा बदल मंगळवारी (ता. 25) दुपारी बारा ते रविवारी (ता.30) रात्री नऊ वाजेपर्यंत अथवा वाहतूक सुरळीत होईपर्यंत लागू राहणार आहे.

मोशी परिसरातील बदल

• मोशीतील हवालदार वस्ती (वाय जंक्शन) ते मोशी चौक दरम्यानचा रस्ता गुरुवारी (ता. 27) ते रविवारी (ता. 30) पर्यत एकेरी वाहतूक करण्यात येणार आहे. मोशी ते हवालदारवस्तीकडं जाणारा रस्ता हा सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद असेल. या मार्गावरील वाहने भारतमाता चौकातून हवालदार वस्तीकडं जातील.

• मोशी भारतमाता चौक ते हवालदार वस्तीकडं (वाय जंक्शन) जाणाऱ्या जडवाहनास गुरुवारी (ता. 27) ते रविवारी (ता. 30) पर्यत बंदी असेल.

• भोसरी पांजरपोळ चौक ते अंलकापुरम चौकाकडे जाणाऱ्या जडवाहनास रविवारी (ता. 30) ते पहाटे चार ते रात्री दहापर्यत प्रवेश बंद असेल. या मार्गावरील जड वाहने पांजरपोळ चौकातून पुढे भोसरी पुलावरून जेआरडी टाटा पुलावरून सरळ कोकणे चौक-जगताप डेअरी चौक मार्गे इच्छितस्थळी जातील.

देहू परिसरातील बदल

• मुंबई-पुणे महामार्गावरील देहू कमान ते देहूगाव या मार्गावरील वाहतूक बंद राहणार असून, या मार्गावरील वाहने भक्ती-शक्ती चौक ते त्रिवेणीनगर ते तळवडे गावठाण ते कॅनबे चौक ते खंडेलवाल चौक देहूगाव या मार्गे जातील.

• चाकण ते कॅनबे चौक तसेच तळवडे गावठाण चौक ते कॅनबे चौक ते महिंद्रा सर्कल हा मार्ग बंद राहणार आहे. या मार्गावरील वाहने मोशीतील भारतमाता चौक, नाशिक हायवे मार्गे इच्छितस्थळी जातील.

• तळेगाव-चाकण रस्त्यावरील देहूफाटा ते देहूगाव हा मार्ग बंद राहणार असून, या मार्गावरील वाहने एचपी चौकमार्गे जातील.

• देहू कमान ते चौदा टाळकरी कमान ते भैरवनाथ चौक हा मार्ग सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद राहणार आहे.

• खंडेलवाल चौक ते देहू कमान मुख्य ते परंडवाल चौक, खंडेलवाल चौक ते देहू मुख्य कमान ते परंडवाल चौक या मार्गावर जाण्यास सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद असेल.

• हा बदल बुधवारी (ता. 26) दुपारी बारा ते शनिवारी (ता. 29) रात्री नऊपर्यंत असेल.

देहूरोड परिसरातील बदल

• मुंबई-पुणे महामार्गावरील सेंट्रल चौक देहूरोड ते भक्ती शक्ती मार्गे पुण्याकडं जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद राहणार असून, या मार्गावरील सर्व प्रकारची वाहने सेंट्रल चौक- मामुर्डी-किवळे-भूमकर चौक-डांगे चौक मार्गे जातील.

• हा बदल शुक्रवार (ता. 28) रात्री बारा ते शनिवारी (ता. 29) सायंकाळी सहापर्यंत अथवा वाहतूक सुरळीत होईपर्यंत लागू राहणार आहे.

हेही वाचा -

  1. Saptarangi Dnyaneshwari : सहा महिन्यात हाताने लिहिली सप्तरंगी ज्ञानेश्वरी; निवृत्त प्राध्यापकाची अनोखी माऊली भक्ती
  2. Dnyaneshwar Maharaj Palkhi Sohla : जीवन धन्य करणारा संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा; जाणून घेऊया इतिहास

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.