ETV Bharat / state

आषाढी एकादशी 2024; मानाच्या पालख्या वाखरीत दाखल, 12 लाख भाविक मुक्कामी - Ashadhi Ekadashi 2024

Ashadhi Ekadashi 2024 : यंदा आषाढी एकादशी (Ashadhi Wari) 17 जुलैला साजरी होणार आहे. आज दुपारी मानाच्या दहा पालख्या पंढरपूर तालुक्यातील वाखरीत (Wakhari) दाखल झाल्या आहेत. आषाढी एकादशी असल्यानं सर्वानाच विठुरायांच्या भेटीची आस लागली आहे.

Ashadhi Ekadashi 2024
मानाच्या पालख्या वाखरीत दाखल (ETV BHARAT Graphics)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 14, 2024, 6:26 PM IST

पंढरपूर (सोलापूर) Ashadhi Ekadashi 2024 : आषाढी एकादशीचा सोहळा (Ashadhi Wari) अवघ्या दोन दिवसावरती येऊन ठेपला आहे. संतांच्या मानाच्या पालख्या आज पंढरपूर तालुक्यात दाखल झाल्या आहेत. पटवर्धन कुरोली येथे बंधू भेटीचा सोहळा रंगणार आहे. वाखरी (Wakhari) येथे संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचा शेवटचा मुक्काम असतो. या वर्षी शेवटच्या मुक्कामासाठी तब्बल 30 टक्के अतिरिक्त भाविक येण्याची शक्यता असल्यामुळं, वाखरीतही 52 एकर परिसरात स्वतंत्र 15 एकर विस्तारीत पालखी तळाची संकल्पना जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी राबविली आहे.

वाखरी संतांचा महामेळा : वाखरीच्या शेवटच्या मुक्कामासाठी संत तुकाराम महाराज (Tukaram Maharaj Palkhi), संत ज्ञानेश्वर महाराज (Dnyaneshwar Maharaj Palkhi) पालख्यांसोबत येणाऱ्या दिंड्या, भाविक यांच्याशिवाय इतर मार्गाने पंढरपूरकडं येणाऱ्या दिंड्या आणि पालख्या ही माऊली-तुकोबाच्या भेटीसाठी वाखरी पालखी तळावर येत असतात. त्यामुळं पंढरपुरात दाखल होण्यापूर्वी संतांचा महामेळा वाखरी पालखी तळावर भरतो. त्यादृष्टीनं त्यांना सोयीसुविधा देण्यासाठी वाखरी ग्रामपंचायत, पंढरपूर नगर परिषद, पंचायत समिती, जिल्हा परिषदसह संपूर्ण जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे.

ही आहे सोय : वाखरी पालखी तळावर भाविकांसाठी 4 हजार सुलभ शौचालये उभारण्यात आली आहेत. 500 स्नानगृहे, हिरकणी कक्ष, आपत्ती व्यवस्थापन कक्ष उभारले आहेत. वारकऱ्यांना शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे यासाठी पालखी तळावर ठिकठिकाणी स्टॅन्डपोस्ट नळांची व्यवस्था केलीय. टँकरना पाणी भरण्याची सोयही येथे केली आहे. आवश्यक त्या मोठ्या पालख्यांना राहुट्यांच्या जागी टँकर पुरविली आहे. दिवाबत्तीसाठी 55 ठिकाणी रोड लाईट, 10 हायमास्ट दिवे पालखी तळावर बसविले आहेत. त्यामुळं रात्रीही या पालखी तळ विद्युत रोषणाईने चकाकणार आहे. ठिकठिकाणी जंतुनाशक पावडर फवारणी, गप्पी मासे सोडणे, कंटेनर सर्व्हेक्षण, धूळ फवारणी आरोग्य विभागामार्फत भाविकांची काळजी घेतली जात आहे.

स्वतंत्र आरोग्य व्यवस्था तैनात : या सोहळ्यासाठी पालखी तळ, रिंगण स्थळावर स्वतंत्र आरोग्य व्यवस्था उभारली आहे. प्रमुख संतांच्या पालख्या वाखरीत दाखल होण्याअगोदर बाजीराव विहिर येथे सर्वात मोठा गोल आणि उभे रिंगण सोहळा संपन्न होतो. या ठिकाणी होणारी गर्दी लक्षात घेता स्वतंत्र आरोग्य व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. प्राथमिक उपचार, आवश्यक असल्यास ॲम्ब्युलन्समधून इतर ठिकाणी ने-आण करण्याची सोय देखील करण्यात आली आहे.

आरोग्याच्या सुविधा : आळंदी-देहू ते पंढरपूर या मार्गावर वाखरी हे शेवटचे मुक्कामाचे ठिकाण आहे. त्यामुळं भाविक चालून चालून थकलेले असतात. त्यांना आरोग्याच्या सुविधा घेण्यासाठी इतर ठिकाणी जाणे अडचणीचे ठरत असल्यानं पालखी तळावरच वाखरी ग्रामपंचायतीमार्फत भाविकांना तब्बल 5 हजार झंडुबाम आणि प्लॅस्टीकचा वापर टाळण्यासाठी 5 हजार कापडी पिशव्यांचे मोफत वाटप करण्यात येणार असल्याचं, ग्रामविकास अधिकारी सावता शिंदे यांनी सांगितलं. पायी चालून आलेल्या भाविकांचा थकवा घालविण्यासाठी वाखरी ग्रामपंचायतीमार्फत खास 12 लोकांची टीम मोफत मसाज करण्यासाठी पाचारण केलीय. येथे आयुर्वेदिक तेलाने 20 खुर्च्यांवर 24 तास मसाज करून भाविकांचा थकवा घालविण्यात येणार आहे.

प्रशासकीय यंत्रणा सज्ज : पंढरपुरातील गर्दी कमी करण्यासाठी प्रशासनाकडून नदी पलिकडं 65 एकर पालखी तळाचा विकास करून भाविकांना सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यामुळं चंद्रभागा वाळवंट, शहरातील गर्दीचा ताण कमी झाला होता. त्याच धर्तीवर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी वाखरी पालखी तळावर यावर्षी येणाऱ्या भाविकांच्या अधिकच्या संख्येमुळं प्रशासनावर ताण येऊन चेंगराचेंगरी होऊ नये म्हणून वाखरी-टाकळी बायपासच्या शेजारी 52 एकर परिसरात स्वतंत्र 15 एकर पालखी तळ विकसीत केला आहे.

हेही वाचा -

  1. आषाढी एकादशी 2024 : 'या' पद्धतीनं विठ्ठलाची करा पूजा; जाणून घ्या विधी आणि महत्व - Ashadhi Ekadashi 2024
  2. दिवे घाटातील ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं विहंगम दृश्य, पहा ड्रोन व्हिडिओ - Ashadhi Ekadashi 2024

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.