ETV Bharat / state

महिलांसंदर्भातील 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर अरविंद सावंतांकडून फक्त दिलगिरी व्यक्त, पण माफीनामा नाहीच...

महिलांसंदर्भात केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी अरविंद सावंत यांच्यावर गुन्हादेखील दाखल झाला असून, त्यांच्या वक्तव्याची महिला आयोगाने दखल घेतलीय. आता अरविंद सावंत यांनी दिलगिरी व्यक्त केलीय.

arvind sawant
अरविंद सावंत (ETV Bharat FIle Photo)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 2, 2024, 3:32 PM IST

Updated : Nov 2, 2024, 3:41 PM IST

मुंबई -: अरविंद सावंत यांनी शिवसेनेच्या शिंदे गटाच्या नेत्या शायना एनसी यांच्यावर केलेल्या वक्तव्यावरून राज्यातील राजकारण चांगलंच तापलंय. अरविंद सावंत यांच्या वक्तव्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीसुद्धा टीकास्त्र डागलंय. आमच्या लाडक्या बहिणींवर अशी टिप्पणी केली जाते हे अत्यंत दुर्दैवी आहे. आता बाळासाहेब ठाकरे हयात असते तर यांचं थोबाड रंगवलं असतं. आम्ही गुवाहाटीमध्ये असतानाही त्यांनी आमच्या महिलांची अशी बदनामी केलीय. अशा लोकांना येत्या निवडणुकीत सर्व भगिनी नक्कीच धडा शिकवतील," अशी टीका एकनाथ शिंदे यांनी केली होती. याप्रकरणी अरविंद सावंत यांच्यावर गुन्हादेखील दाखल झाला असून, त्यांच्या वक्तव्याची महिला आयोगाने दखल घेतलीय. आता अरविंद सावंत यांनी दिलगिरी व्यक्त केली असून, महायुतीवरही पलटवार केलाय.

दिलगिरी व्यक्त करणारा व्हिडीओ सावंतांकडून पोस्ट : "मी त्या दिवशी जे काही बोललो, माझ्या त्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला. तरीदेखील माझ्या त्या वक्तव्याने कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो," असं अरविंद सावंत यांनी म्हटलंय. दिलगिरी व्यक्त करणारा एक व्हिडीओ अरविंद सावंत यांनी पोस्ट केलाय. मात्र, याच व्हिडीओमध्ये अरविंद सावंत यांनी महायुतीला काही प्रश्न विचारले असून, या प्रश्नांची उत्तरे मिळावीत, अशी अपेक्षा अरविंद सावंत यांनी व्यक्त केलीय. यात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून ते आशिष शेलार यांच्यापर्यंत सर्वांना प्रश्न विचारलेत.

राम कदम, गुलाबराव पाटलांवर कोणते गुन्हा दाखल केले?: अरविंद सावंत म्हणाले की, "आमच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांचा उल्लेख आशिष शेलार यांनी ज्या पद्धतीने केला, त्याबाबत शेलारांवर कोणते गुन्हे दाखल झाले? मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात मुख्यमंत्र्यांच्याच एका पदाधिकाऱ्याने एका मुलीवर बलात्कार केला. त्याच्यावर कोणते गुन्हे दाखल झाले आणि ते कधी झाले? वामन म्हात्रे यांनी एका महिला पत्रकाराला अपमानजनक भाषा वापरली, त्यांच्यावर तुम्ही काय कारवाई केली? संजय राठोड हे तुमच्याच सत्तेतील आमदार आहेत. त्यांच्यावर बलात्कारासारखे गंभीर आरोप आहेत. त्यांच्यावर काय गुन्हे दाखल केलेत? राम कदम, गुलाबराव पाटील असे बरेच जण आहेत, यांच्यावर कोणते गुन्हे दाखल केलेत? या सर्व घटनांमध्ये महिलांचा सन्मान झाला का? त्यामुळे आता जे लोक माझ्यावर टीका करतात, त्यांनी माझ्या या प्रश्नांची उत्तरं द्यावीत, अशी प्रतिक्रिया खासदार अरविंद सावंत यांनी केलीय.

हेही वाचा :

  1. "अगोदर संजय राठोड यांच्यावर कारवाई करा मग...", शायना एनसी यांच्या आरोपांवर काय म्हणाले अरविंद सावंत?
  2. खासदार अरविंद सावंत यांच्याविरोधात नागपाडा पोलिसात गुन्हा दाखल
Last Updated : Nov 2, 2024, 3:41 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.