ETV Bharat / state

लालबागच्या राजाच्या मंडळात 'या' पदावर अनंत अंबानी यांची नियुक्ती - Anant Ambani

Anant Ambani - लालबागचा राजा गणेश मंडळात अनंत अंबानी यांची प्रमुख सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब कांबळे यांनी ही माहिती दिली.

अनंत अंबानी, मुकेश अंबानी, नीता अंबानी
अनंत अंबानी, मुकेश अंबानी, नीता अंबानी (Etv Bharat File photo)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 4, 2024, 7:19 PM IST

मुंबई Anant Ambani : मुंबईसह देशभरात प्रसिद्ध असलेल्या लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचं यंदा 91 वे वर्ष आहे. मुंबईमधील प्रसिद्ध लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने यंदा अनंत अंबानी यांना प्रमुख सल्लागार कार्यकारी समिती म्हणून नियुक्ती केली आहे. ही माहिती लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब कांबळे यांनी दिली आहे.

लालबागच्या राजाच्या चरणी कोटींचे दान - लालबागचा राजा गणेश मंडळाला गेल्यावर्षी अनंत अंबानी यांनी कोटींचा निधी दान केला होता. यंदा देखील अंबानी कुटुंबीयांनी लालबागच्या राजाच्या चरणी कोटींचे दान केले असल्याची चर्चा आहे. लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला गणेशोत्सव काळात मिळालेल्या दानातून काही सामाजिक कार्य केली जातात. मात्र 2020 मध्ये देशावर ओढवलेल्या कोविडच्या संकटामुळे गणेशोत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा झाला नव्हता. त्यामुळे कठीण परिस्थिती निर्माण होऊन मंडळाचा निधी कमी झाला होता.

अनंत अंबानी प्रमुख सल्लागार - उद्योगपती अनंत अंबानी आणि त्यांच्या कुटुंबाने लालबागचा राजा गणेश मंडळाला पाठिंबा दिला आणि त्यासाठी त्यांनी रुग्ण सहाय्य निधी योजनेसाठी योगदान दिलं. त्याचप्रमाणे रिलायन्स फाउंडेशनने 24 डायलिसिस मशीन देखील लालबागचा राजा मंडळाला दिली. त्यामुळे मंडळाच्या कार्यात अंबानी कुटुंबीयांनी मोठा हातभार लावला. त्यामुळे लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानं अनंत अंबानी यांची प्रमुख सल्लागार म्हणून कार्यकारी समितीत नेमणूक केली आहे.

अनेक वर्षांपासून ऋणानुबंध - एका महिन्यापूर्वी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत या नेमणुकीला मंजुरी देण्यात आली असल्याची माहिती लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब कांबळे यांनी दिली आहे. अनंत अंबानी यांचा या मंडळाशी गेल्या अनेक वर्षांपासून ऋणानुबंध जोडलेला आहे. लालबागच्या राजाच्या अनेक सामाजिक उपक्रमात देखील अंबानी कुटुंबीयांनी सहभाग घेतला असल्याची माहिती मंडळाकडून देण्यात आली आहे.

हेही वाचा..

  1. गणेशोत्सव 2024; बाप्पांच्या मिरवणूक मार्गावर तब्बल 13 पूल धोकादायक, जल्लोष करताना घ्या काळजी
  2. गणेशोत्सव 2024; महापालिकेची मुंबईकरांना भेट, यावर्षी करणार 204 कृत्रिम तलावांची निर्मिती

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.