ETV Bharat / state

अंबादास दानवे यांच्या निलंबनाचा पुनर्विचार करा - अनिल परब - Ambadas Danve suspension - AMBADAS DANVE SUSPENSION

Ambadas Danve suspension: अंबादास दानवे यांच्या निलंबनाचा पुनर्विचार करण्याची मागणी शिवसेना (उबाठा) नेते अनिल परब यांनी केली आहे. तसंच अंबादास दानवे यांनी उपसभापती निलम गोऱ्हे यांना पत्र लिहून दिलगिरी व्यक्त केली आहे. त्यामुळं दानवे यांचं निलंबन मागं घेण्याची शक्यता आहे.

Anil Parab Ambadas Danve
अनिल परब, अंबादास दानवे (Etv Bharat MH Desk)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 3, 2024, 10:54 PM IST

मुंबई Ambadas Danve suspension : विधान परिषदचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी मंगळवारी सभागृहात भाजपा आमदार प्रसाद लाड यांना शिवीगाळ केल्यामुळं त्यांचं निलंबन करण्यात आलं आहे. अंबादास दानवे यांच्यावरील निलंबन मागं घेण्याबाबत फेरविचार करावा, अशी मागणी शिवसेनेचे आ. अनिल परब यांनी केली आहे.

आम्ही न बोलता सभागृहात बसू : सभागृहात घडलेल्या प्रकाराविषयी दिलगिरी व्यक्त करणार असल्याचा प्रस्ताव आपल्यासमोर मांडला आहे. तसंच उद्धव ठाकरे यांनी देखील माफी मागितली आहे. विरोधी पक्ष नेत्याचं निलंबन आजपर्यंत झालेलं नाही. त्यामुळं उपसभातींनी निर्णयाचा फेरविचार करावा, अशी विनंती परब यांनी केलीय. तसंच सभागृहात विरोधी पक्षनेता नसल्यामुळं काम करणं कठीण आहे. विरोधीपक्ष नेतेपद रिक्त राहणार असेल, तर आमची काम करण्याची इच्छा नाही. तुम्ही निर्णय घेत नाही, तोपर्यंत आम्ही सभागृहात खाली बसून सरकारच कामकाज शांतपणे पाहू, अशी भूमिका महाविकास आघाडीतील सर्वच नेत्यांनी घेतली.

दबाव आणण्याचा प्रयत्न : आमदार अनिल परब यांनी घेतलेल्या भूमिकेनंतर सभागृह थोडासा गोंधळ पाहायला मिळाला. अनिल परबांसह इतर सदस्य माझ्यावर दबाव-तंत्राचा वापर करत असल्याचे गोऱ्हे म्हणाल्या. तसंच मी संवेदशील व्यक्ती असून गट नेत्यांच्या बैठकीला आपण याल अशी मला अपेक्षा होती. त्याची पूर्वकल्पना देखील दिली नाही. त्यामुळं प्रश्न उत्तराच्या तासानंतर तुम्हाला वेळ दिला जाईल. तोपर्यंत शांतता राखा, असं आश्वासन नीलम गोऱ्हे यांनी अनिल परब यांना दिलं.

साताऱ्यात आयटी हब : सातारा जिल्ह्यातील शिरवळ येथे आयटी हब, तर पुसेगाव रस्त्यालगत औद्योगिक वसाहत मंजूर करण्यात आल्याची माहिती, उद्योग मंत्री उदय सामंत यांनी बुधवारी विधानपरिषदेत दिली. आमदार शशिकांत शिंदे यांनी विधान परिषद सभागृहात सातारा जिल्ह्यातील उद्योग तसंच रोजगार निर्मितीसंदर्भात तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. साताऱ्याचा विकास करण्यासाठी महाराष्ट्र स्कूटर्स कंपनीची जागा ताब्यात घेऊन तिथं नवीन प्रकल्प आणावा, अशी मागणी शिंदे यांनी केली.

लवकरच कारवाई : सातारा येथील महाराष्ट्र स्कूटर्स ही कंपनी बंद आहे. यासंदर्भातील कायदेशीर बाबी तपासून एमआयडीसी ही जागा ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न करेल, असं आश्वासन यावेळी सामंत यांनी दिलं. नेर गावातील शेतकऱ्यांच्या जमिनीवरील शिक्के उठविण्यात आले नसल्याची बाब आमदार शिंदे यांनी निदर्शनास आणून देताच याबाबतचे आदेश देण्यात आले असून लवकरच कारवाई करण्यात येईल, अशी माहिती सामंत यांनी दिली. पुसेगाव, निढळ परिसरात 2014 पासून औद्योगिक वसाहत मंजूर असून पाणीसुद्धा आरक्षित झालं आहे. सर्वेक्षण करून दहा हजार एकर भूसंपादन झालं आहे. खटाव तालुक्यातील दुष्काळी भागात देखील औद्योगिक वसाहत निर्माण झाली, तर मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होईल, असं आमदार शशिकांत शिंदे म्हणाले.

'हे' वाचलंत का :

  1. "मुख्यमंत्र्यांचा जिल्हा, पालकमंत्री बेपत्ता", पालकमंत्री नाही थाऱ्यावर, जनतेला सोडलं वाऱ्यावर, बॅनरमधून उडवली मंत्र्यांची खिल्ली - Shambhuraj Desai Missing Banner
  2. चार बायका असणाऱ्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ देणार का - मनसे - Mazi Ladki Bahin Yojana
  3. ...तर माझ्यावर हक्कभंग आणा; देवेंद्र फडणवीसांचं विरोधकांना आव्हान - Devendra Fadnavis News

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.