मुंबई Anant Radhika Wedding : अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट हे लग्नबंधनात अडकले आहेत. अनंत हा भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश आणि नीता अंबानी यांचा सर्वात धाकटा मुलगा आहे. तर शैला आणि वीरेन मर्चंट यांची राधिका ही मुलगी आहे. हे दोघेही विवाहबंधनात अडकले आहेत. यूकेचे माजी पंतप्रधान बोरिस जॉन्सन मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये पोहोचले.
नीता अंबानी यांचा डान्स : अंबानींच्या मुंबईतील अँटिलिया या घरातून अनंत अंबानीची वाजत-गाजत धूमधडाक्यात वरात निघाली. ढोल ताशाच्या गजरात अनंत अंबानीची वरात निघाली. यावेळी आई नीता अंबानीने ढोल-ताशाच्या तालावर ठेका धरला. उपस्थितांनीही यावेळी वरातील मनमुराद नाचण्याचा आनंद घेतला. याचा व्हिडिओ सध्या समोर आला आहे. नीता अंबानी यामध्ये फारच सुंदर अशा ट्रेडिशनल लूकमध्ये दिसत आहेत.
ऐश्वर्याची लग्नाला अनुपस्थिती : अमिताभ बच्चन, त्यांच्या पत्नी जया बच्चन, मुलगी श्वेता बच्चन, जावई निखिल नंदा, नातू अगस्त्य नंदा, नात नव्या नवेली व ज्युनिअर बच्चन म्हणजेच अभिषेक बच्चन यांनी अनंत-राधिकाच्या लग्नाला हजेरी लावली. पण ऐश्वर्या व आराध्या या लग्नाला अनुपस्थित राहिल्या.
तीन दिवस चालणार सोहळा : हा शाही विवाह सोहळा तीन दिवस चालणार आहे. 12 जुलैला शुभ विवाहानं याची सुरूवात झाली. तसंच 13 जुलैला शुभ आशीर्वाद सोहळा होणार आहे आणि 14 जुलैला मंगल उत्सवानं विवाह सोहळा संपेल. मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे हा लग्न समारंभ आयोजित करण्यात आला आहे. मुंबईतील 18.5 एकरचे जिओ वर्ल्ड सेंटर न्यूयॉर्कमधील एम्पायर स्टेट बिल्डिंगपेक्षा 10.3 पट मोठे आणि फिफा फुटबॉल खेळपट्टीपेक्षा सुमारे 12 पट मोठे आहे.
पाहुण्यांचं थाटात स्वागत : तीन दिवस चालणाऱ्या या लग्न सोहळ्यासाठी अनेक सेलिब्रिटी मुंबई विमानतळावर दाखल होत आहेत. ताज कुलाबा हॉटेलचे कर्मचारी पाहुण्यांचा पारंपरिक पद्धतीनं स्वागत करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. पुष्पहार देत स्वागत केलं जात आहे. तसंच पाहुण्यांना ओवाळलं देखील आहे.
लग्नासाठी खर्च किती? : अनंतच्या लग्नात येणाऱ्या पाहुण्यांसाठी अंबानी कुटुंबाकडून तीन फाल्कन-2000 विमाने बुक करण्यात आली आहेत. क्लब वन एअरचे सीईओ राजन मेहरा यांनी एका आघाडीच्या दैनिकाला सांगितले की, या कार्यक्रमासाठी 100 हून अधिक खासगी जेट वापरण्यात येतील अशी अपेक्षा आहे. वर्तमानपत्रातील एका लेखानुसार, लग्नाचा एकूण अपेक्षित खर्च 320 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच 2500 कोटी रुपये पेक्षा जास्त अपेक्षित आहे. यामध्ये लग्नाआधीच्या सेलिब्रेशनच्या खर्चाचा समावेश आहे. तसेच सुरक्षा, खासगी जेट आणि क्रूझ जहाज यांसारख्या इतर रसदीसाठी मोठ्या प्रमाणावर खर्च केला जात आहे.
हेही वाचा -
- अनंत-राधिकाचा शाही विवाह सोहळा, बॉलिवूड, हॉलिवूडसह विविध क्षेत्रातील दिग्गज राहणार हजर; पाहा लिस्ट - Radhika and Anant Ambani Wedding
- 100 जेट, हजारो NSG कमांडो तैनात; अनंत-राधिकाच्या शाही लग्नाची तयारी पूर्ण, 'या' शुभ मुहूर्तावर वरमाला विधी - Anant Radhika wedding
- अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या लग्नामुळे मुंबईत रस्त्यावर नाकाबंदी, सामान्य नागरिकांना फटका - ANANT AND RADHIKA WEDDING