ETV Bharat / state

American Man Body : अमेरिकन नागरिकाचा पंचतारांकित हॉटेलमध्ये संशयास्पद परिस्थिती मृतदेह आढळला - American Man Body Found in Mumbai

American Man Body Found in Mumbai मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमध्ये अमेरिकेतील नागरिकाचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. त्याबाबत पुढील कारवाई मुंबई पोलीस करत आहेत.

फाईल फोटो
फाईल फोटो
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 12, 2024, 10:47 PM IST

मुंबई : American Man Body Found in Mumbai : मुंबईच्या पश्चिम उपनगरातील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये अमेरिकेतील नागरिकाचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी सहार पोलिसांनी मृत्यूची नोंद केली असल्याची माहिती सहार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक धनंजय सोनावणे यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना दिली आहे. मार्क्स विल्यम (वय 60) असं अमेरिकन नागरिकाचं नाव आहे.

अमेरिका क्राईम विभागाला संपर्क करणार : अमेरिकन नागरिकाचा मृतदेह हॉटेलात सापडल्याने जुहू परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सहार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जे डब्ल्यू मॅरिएट या पंचतारांकित हॉटेलमध्ये मार्क्स विल्यम (वय 60) ही अमेरिकन व्यक्ती 9 मार्चपासून राहत होती. मात्र, आज सकाळी 10 वाजताच्या सुमारास विल्यम यांचा त्यांच्या खोलीत मृतदेह आढळून आल्याने हॉटेल व्यवस्थापनाने सहार पोलिसांना संपर्क साधला. सहार पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी जे डब्ल्यू मॅरिएट हॉटेलमध्ये घटनास्थळी धाव घेतली आणि अमेरिकन नागरिकाचा मृतदेह ताब्यात घेतला. सध्या मृतदेह कूपर रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला.

घटनेची माहिती समोर आली नाही : शवविच्छेदनातून अहवाल समोर आल्यानंतरच या अमेरिकन व्यक्तीचा मृत्यू नेमका कुठल्या कारणाने झाला हे समजणार आहे. विल्यम यांचा मृत्यू नैसर्गिक आहे की, अनैसर्गिक हे शवविच्छेदन अहवालावरून स्पष्ट होईल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. त्यामुळे अंधेरीतील पंचतारांकित हॉटेलात सापडलेल्या मृतदेहाबाबत अद्याप मृत्युची सहार पोलिसांनी नोंद केली आहे. सहार पोलीस अमेरिकेच्या क्राईम विभागाशी संपर्क साधून पुढील कारवाई करणार असल्याचही येथील पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. पोलीस या अमेरिकन नागरिकाबाबत अधिक माहिती गोळा करत असून, ही व्यक्ती मुंबईत का आली होती आणि तिच्यासोबत अजून कोणी अमेरिकेतून आले होते का? याचा देखील तपास पोलिसांकडून सुरु असल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्याने दिली आहे.

हेही वाचा :

1 Tejas crashes in Jaisalmer : जैसलमेरमध्ये प्रशिक्षणादरम्यान 'तेजस' विमानाचा अपघात, दोन्ही पायलट सुखरूप

2 Lok Sabha Election : काँग्रेसकडून लोकसभा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर

3 विदेशात नोकरी शोधत असाल तर सावधान! रशियात गेलेल्या तरुणाचा युक्रेन विरोधातील लढाईत मृत्यू

4 अयातुल्ला खमेनी यांचं फेसबुक-इन्स्टाग्राम खातं बंद, इराणनं मेटाला अभिव्यक्ती स्वातंत्र्याची करुन दिली आठवण

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.