ETV Bharat / state

अप्पर वर्धा धरण: स्वातंत्र्यदिनानिमित्त धरणाचा खास 'नजारा' - Amravati Upper Wardha Dam

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 14, 2024, 2:15 PM IST

Amravati Upper Wardha Dam स्वातंत्र्यदिन 2024 निमित्त अप्पर वर्धा धरणाच्या सांडव्यावर लेझरच्या माध्यमातून तिरंगी प्रकाशझोत टाकण्यात आला आहे. तिरंगी रोषणाईचा हा नेत्रदीपक नजारा डोळ्यांचं पारणं फेडत आहे.

Amravati Upper Wardha Dam
स्वतंत्र्य दिनानिमित्त धरणाचा खास नजारा (ETV Bharat Reporter)

अमरावती Amravati Upper Wardha Dam : स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर अमरावती शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मोर्शी तालुक्यातील अप्पर वर्धा धरण तिरंगा रोषणाईनं उजळून निघालंय. धरणाच्या सांडव्यावर लेझरच्या माध्यमातून तिरंगी प्रकाशझोत टाकण्यात आला आहे. धरणातील या तिरंगी जलधारा पाहण्यासाठी मंगळवारी रात्री परिसरातील पर्यटकांची गर्दी उसळली.

धरणाजवळ 'भारत माता की जय'ता घोष : अप्पर वर्धा धरणाचे 13 पैकी 11 दारं उघडताच त्यातून मोठ्या प्रमाणात होणारा पाण्याचा विसर्ग मनमोहक असून मंगळवारी रात्री या पाण्यावर राष्ट्रध्वजातील तिन्ही रंग प्रकाश योजनेद्वारे भरण्यात आले. या रंगसंगतीमुळे हे पाणी जणू राष्ट्रध्वज भासत होतं. यामुळे आलेल्या पर्यटकांनी 'भारत माता की जय' अशा घोषणा देत जल्लोष केला.

धरण तुडुंब भरलं : मोर्शी तालुक्यात सातपुडा पर्वत रांगेत वसलेल्या अप्पर वर्धा धरणात मध्य प्रदेशातून वाहत येणाऱ्या नद्यांमधील पाणी साचतं. अप्पर वर्धा धरणात सध्या 85 टक्के पाणीसाठा आहे. येत्या काही दिवसांत मध्य प्रदेशात तसंच मोर्शी परिसरात मुसळधार पावसाची शक्यता असल्यामुळे अप्पर वर्धा धरण पातळी गाठण्याची शक्यता आहे. एकूणच परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेता अप्पर वर्धा धरणातून पाण्याचा विसर्ग केला जात आहे. अप्पर वर्धा धरणाची 11 दारं उघडण्यात आली आहेत.

पर्यटकांची गर्दी : साप्ताहिक सुट्टीसह येणाऱ्या सलग सुट्ट्यांमुळे पर्यटक मोठ्या संख्येनं अप्पर वर्धा धरणाचं मोहक दृश्य पाहण्यासाठी परिसरात गर्दी करतील. तसंच रात्रीच्या सुमारास या ठिकाणी करण्यात आलेली रंगसंगती पाहण्यासाठी देखील उशिरापर्यंत या भागात पर्यटकांची गर्दी राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हेही वाचा

  1. स्वातंत्र्यदिना निमित्त कोयना धरणावर लेझरच्या माध्यमातून नेत्रदीपक तिरंगी रोषणाई, पाहा व्हिडिओ - Koyna Dam
  2. दारूबंदी ते कृषी क्रांती: हिरकणी पुरस्कारानं सन्मानित 'ममता ठाकूर' यांना स्वातंत्र्यदिन सोहळ्यासाठी दिल्लीतून खास निमंत्रण - Independence Day Invitation
  3. प्रजासत्ताक दिन 2024; ध्वज फडकवणे आणि ध्वजारोहण यात काय आहे फरक ? - Republic Day 2024

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.