ETV Bharat / state

आमदार रवी राणांनी फुकटात नेल्या 70 हजार विटा; आमदारांवर अशी वेळ का आली? - Allegation On Ravi Rana - ALLEGATION ON RAVI RANA

Allegation On Ravi Rana : आमदार रवी राणा यांचा बंगला बांधण्यासाठी वीटभट्टी चालकांनी 70 हजार विटा दिल्या. तरीही राणांच्या आदेशावरून स्थानिक प्रशासनाने वीटभट्टी चालकांवर कारवाई केली, असा आरोप चालकांनी केला आहे. तर प्रदूषण वाढत असल्याने जिल्हा प्रशासनाने महिनाभरापूर्वीच कारवाईची नोटीस दिली, अशी माहिती दिली गेली. वाचा सविस्तर बातमी

Allegation On Ravi Rana
वीटभट्टीवरील कारवाई (Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 8, 2024, 4:36 PM IST

Updated : May 8, 2024, 7:07 PM IST

कारवाईनंतर व्यथा मांडताना वीटभट्टी चालक आणि कामगार (Reporter)

अमरावती Allegation On Ravi Rana : अमरावती शहरातील बडनेरा ते कोंडेश्वर मंदिर मार्गावर असणाऱ्या सुमारे साडेतीनशे वीटभट्ट्यांवर बुधवारी सकाळी कारवाई करण्यासाठी अनेक बुलडोझर, महसूल विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी तसेच पोलिसांचा तगडा बंदोबस्त पोहोचला. ही कारवाई सुरू होताच आमदार रवी राणा यांनी त्यांचा बंगला बांधण्यासाठी आमच्याकडून दोन लाख विटा फुकटात मागितल्या होत्या. त्यापैकी आम्ही 70 हजार विटा दिल्या. आमच्या जवळच्या विटा नेल्या असतानाही आता आमच्यावर अशी कारवाई होत आहे, असा टाहो वीटभट्ट्या चालकांनी फोडला.

प्रशासनाने सहा महिन्यांपूर्वीच दिला इशारा : कोंडेश्वर मंदिर मार्गावर गत 40 ते 50 वर्षांपासून बऱ्याच दूर अंतरापर्यंत वीटभट्ट्या आहेत. वीट भट्ट्यांमुळे या परिसरात प्रदूषणाचे प्रमाण वाढले आहे. या भागात अनेक अभियांत्रिकी महाविद्यालय आहेत. यासह या परिसरात जिल्हा ग्रामीण पोलीस दलातील कर्मचाऱ्यांच्या आठशे कुटुंबांसाठी नवी वसाहत निर्माण करण्यात आली आहे. या ठिकाणी लवकरच पोलिसांचे कुटुंब राहायला येणार आहेत. अशा परिस्थितीत या भागात शासनाच्या जमिनीवर अनधिकृतपणे वसलेल्या या वीटभट्ट्या त्वरित हटविण्यासंदर्भात जिल्हा प्रशासनाच्यावतीने सहा महिन्यांपूर्वीच या भागातील सर्व वीटभट्ट्या चालकांना नोटीस बजावली होती. प्रशासनाच्यावतीने जागा सोडण्याचा इशारा देण्यात आला असताना देखील या भागातील एकही वीटभट्टी चालक येथून हलला नाही.

अधिकाऱ्याच्या कानशिलात लगावली : आज सकाळी आठ वाजेच्या सुमारास वीटभट्ट्या उध्वस्त करण्यासाठी महसूल विभागाचा ताफा कोंडेश्वर मार्गावरील वीटभट्ट्यांच्या परिसरात दाखल झाला. रस्त्याला लागून असणाऱ्या सुधाकर खोब्रागडे यांची वीटभट्टी सर्वांत आधी उध्वस्त करण्यात आली. ही कारवाई सुरू असताना वीटभट्ट्या चालकांनी एकच टाहो फोडला. यावेळी एका वीटभट्टी चालकाने एका महसूल अधिकाऱ्याच्या कानशिलात लगावल्यामुळे वातावरण चिघळले. पोलिसांनी अधिकाऱ्याला मारहाण करणाऱ्या व्यक्तीला ताब्यात घेतले. दरम्यान परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी वीटभट्ट्या चालकांना 20 मे पर्यंत आपल्या भट्ट्या या शासकीय जागेवरून हटवाव्या, अशी अखेरची सूट दिली.

मेळघाटातील मजूर उघड्यावर : अमरावती ते कोंडेश्वर मार्गावर असणाऱ्या एकूण साडेतीनशेच्या वर वीटभट्ट्यांवर मेळघाटातील दोन हजाराच्या वर आदिवासी मजूर आहेत. आज वीटभट्टी परिसरात असणाऱ्या मजुरांच्या झोपड्या कारवाईदरम्यान उध्वस्त करण्यात आल्या. यामुळे अनेक आदिवासींचे कुटुंब उघड्यावर आलेत. या कारवाईमुळे या मजुरांच्या घरात आज अन्न देखील शिजले नाही. त्यांच्या झोपडीतील सर्व साहित्य आणि त्यांच्याकडे असणाऱ्या कोंबड्या उघड्यावर पडल्या.

पहाटे दोन वाजल्यापासून सुरू व्हायचे काम : या वीटभट्ट्यांवर पहाटे दोन वाजल्यापासून मजूर विटा तयार करण्याच्या कामाला लागायचे. अतिशय अवघड असणारे हे काम करण्यासाठी वीटभट्ट्या चालकांनी मेळघाटातील आदिवासी मजुरांना या ठिकाणी आणले. इथे आम्हाला दोन हजार रुपये रोज मिळतो. आजच्या या कारवाईमुळे आम्ही उघड्यावर आलो असून आता कुठे काम करायचे आणि कुठे पोटापाण्याची व्यवस्था लावायची असा प्रश्न मेळघाटातील उपाधखेडा गावातून आलेल्या कैलास काळे या आदिवासी मजुराने 'ई टीव्ही भारत'शी बोलताना उपस्थित केला.

आमदार राणांवर गंभीर आरोप : या भागात अनेक वर्षांपासून असणाऱ्या आमच्या वीटभट्ट्या या ठिकाणी सुरक्षित राहतील, असे आश्वासन आमदार रवी राणा यांनी आम्हाला दिले होते. या परिसरालगतच त्यांचा बंगला बांधण्यासाठी त्यांनी आम्हाला दोन लाख विटा द्याव्यात अशी मागणी केली होती. त्यावेळी सर्व वीटभट्टी चालकांनी त्यांना दोन लाख तर नव्हे मात्र 70 हजार विटा फुकटात पुरवल्या होत्या. माझ्या वीटभट्टी वरून मी 4000 विटा आमदार रवी राणा यांना दिल्या, असे सुधाकर खोब्रागडे या वीटभट्टी चालकाने माध्यमांशी बोलताना म्हटले आहे.

हेही वाचा:

  1. धाराशिवसह संभाजीनगर नावावर शिक्कामोर्तब; नामांतरण केल्यानं नुकसान होणार नसल्याचं उच्च न्यायालयाचं निरीक्षण - Bombay high court
  2. शरद पवारांनी फेकला नवा राजकीय बॉम्ब, उद्धव ठाकरेंची होणार का अडचण? - Sharad Pawar
  3. राष्ट्रवादीच्या फुटीनंतरच्या वादाचा पवार कुटुंबावर परिणाम, बारामती लोकसभा निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी काय वाद झाला? - Baramati lok Sabha election 2024

Last Updated : May 8, 2024, 7:07 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.