ETV Bharat / state

वैष्णोदेवीचं दर्शन घेऊन परतताना काळाचा घाला; मेळघाटातील 11 महिन्याच्या चिमुकलीसह एकाच कुटुंबातील चौघे ठार - Amravati accident - AMRAVATI ACCIDENT

Amravati Accident News : वैष्णोदेवीचं दर्शन घेऊन मुलाला जालंदर येथे सोडण्यासाठी जात असलेल्या एका कुटुंबाच्या वाहनाला भीषण अपघात झाला. या अपघातात 11 महिन्यांच्या चिमुकलीसह चौघांना आपला जीव गमवावा लागला.

Amravati Accident
वैष्णोदेवीचं दर्शन घेऊन परतताना काळाचा घाला; मेळघाटातील 11 महिन्याच्या चिमुकलीसह एकाच कुटुंबातील चौघे ठार (Etv Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 6, 2024, 10:57 PM IST

अमरावती Amravati Accident News : सैन्यात असणाऱ्या आपल्या मुलाला जालंदर येथे सोडण्याच्या निमित्तानं वैष्णोदेवीचं दर्शन करून परत येणाऱ्या मेळघाटातील एकाच कुटुंबातील चौघं पंजाबमधील जालंदर येथे महामार्गावर झालेल्या अपघातात ठार झालेत. या अपघातात दोघेजण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जलंदर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या दुर्घटनेमुळं चिखलदरा तालुक्यात येणाऱ्या सोलामहु गावात शोककळा पसरली आहे.

चारचाकीनं कुटुंब निघालं वैष्णोदेवी दर्शनाला : चिखलदरा तालुक्यात येणाऱ्या सोलामहु गावातील रहिवासी असणारे सेवानिवृत्त वैद्यकीय कर्मचारी गानुजी बेलसरे यांचा लहान मुलगा मंगेश बेलसरे हा सीमा सुरक्षा दलात जलंदर येथे कार्यरत आहे. तर मोठा मुलगा लोकेश हा गावातील उभार विद्यालयात सहाय्यक शिक्षक म्हणून सेवा देतो. कुटुंबात लग्न असल्यामुळं मंगेश बेलसरे हा जलंदर येथून पंधरा दिवसाच्या सुट्टीवर गावी आला होता. मंगेश ची सुट्टी संपल्यावर त्याच्या कुटुंबानं मंगेश सोबतच वैष्णोदेवीला जायचं आणि त्यानंतर मंगेशला जालंदरला सोडून आपण परतायचं असा बेत आखला. संपूर्ण बेलसरे कुटुंब 30 एप्रिलला सोलामहु येथून आपल्या चार चाकी गाडीनं वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी निघालं होतं.

वैष्णोदेवी येथे काही सदस्य हरवल्यामुळं झाला गोंधळ : बेलसरी कुटुंब वैष्णोदेवीच्या दर्शनाला पोहोचले असताना बेलसरे कुटुंबाचे दोन व्याही गर्दीत हरवले. यामुळं बेलसरे कुटुंबाची तारांबळ उडाली. हा सर्व गोंधळ सुरू असताना कर्तव्यावर रुजू व्हायचे म्हणून मंगेश हा त्याच्या पत्नीसह कुटुंबातील इतर सदस्यांना सोडून जलंदरला परत आला. कुटुंबातील हरवलेले सदस्य सापडल्यावर बेलसरे कुटुंब वैष्णोदेवी येथून थेट जालंदरसाठी निघाले. दरम्यान, मार्गात जालंधर लगत महामार्गावर चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि भरधाविकात असणारी गाडी रस्त्याखाली झाडावर आढळली. या अपघातात गानू बेलसरे (वय 58), लोकेश बेलसरे (वय 45), अनिशा लोकेश बेलसरे (वय 40), निहारिका (वय 11 महिने) हे चौघे घटनास्थळीच ठार झालेत. तर श्रीराम कासदेकर (वय 40), सरस्वती कासदेकर (वय 38) हे दोघे गंभीर जखमी असून त्यांच्यावर जालंदर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मेळघाटात शोककळा : सोलामहु गावातील बेलसरे कुटुंबाच्या वाहनाला पंजाबमध्ये झालेल्या अपघातात कुटुंबातील चौघे ठार झाल्याची माहिती मेळघाटात पोहोचताच संपूर्ण मेळघाटात शोककळा पसरली. या घटनेमुळं सोलामहु गाव हादरले आहे.

हेही वाचा -

  1. लग्न समारंभाकरिता जाणाऱ्या ऑटोरिक्षाला ट्रकची धडक, दोन महिलांसह तीन ठार
  2. Amravati Accident: मद्यपी दुचाकीस्वारानं उडवल्यानं महिला पोलिसाचा मृत्यू, आरोपीला अटक
  3. Amravati Accident News : दुचाकी आणि चारचाकी वाहनाची समोरासमोर धडक, दोघे जागीच ठार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.