ETV Bharat / state

'राजपुत्र' विधानसभेच्या रिंगणात? अंतिम निर्णयाची प्रतीक्षा - AMIT THACKERAY

राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांनी आगामी विधानसभा निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे या निवडणुकीत रंगत येणार आहे.

राज ठाकरे, अमित ठाकरे
राज ठाकरे, अमित ठाकरे (संग्रहित छायाचित्रे)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 16, 2024, 3:52 PM IST

Updated : Sep 16, 2024, 4:09 PM IST

मुंबई : अलीकडच्या काळात राज्यातील राजकारणात वेगानं घडामोडी घडत आहेत. विधानसभा निवडणूक तोंडावर असल्यानं एकीकडे सत्ताधारी महायुती तसंच विरोधी महाविकास आघाडीत उमेदवारीवरुन चर्चा झडत आहेत. आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र आणि मनसे नेता अमित ठाकरे यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे या निवडणुकीत चांगलीच रंगत येणार असं दिसतंय. पक्षाच्या नेते आणि सरचिटणीसांच्या बैठकीत अमित यांनी ही इच्छा व्यक्त केली. मनसेच्या इतर महत्त्वाच्या नेत्यांनीही निवडणुकीच्या मैदानात उतरायला हवं, अशी आग्रही मागणीही अमित यांनी केली.

दरम्यान, याविषयी शहानिशा करण्यासाठी मनसे नेते बाळा नांदगावकर यांच्याशी संपर्क साधला असता, अमित ठाकरे यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मात्र यासंदर्भात पक्ष पातळीवर कोणताही विचारविनिमय झाला नाही. तसंच याबाबत कोणताही निर्णय झाला नसल्याचं नांदगावकर यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितलं.

जर अमित ठाकरे यांनी निवडणूक लढवणार असले तर जागावाटपाची गणितं निश्चितपणे बदलणार आहेत. राज यांच्या पुत्रासमोर महायुती (भाजपा किंवा शिवसेना) उमेदवार देणार नाही, हे निश्चित आहे. शिवाय मनसेचं प्राबल्य असलेल्या मतदारसंघातूनच अमित यांना मैदानात उतरवलं जाईल. या दृष्टीने राज ठाकरे यांचं निवासस्थान असलेला माहिम मतदारसंघ सोयीचा आहे. या मतदारसंघातून याआधी मनसेचे सरचिटणीस नितीन सरदेसाई यांनी 2009 च्या विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला होता. मात्र तूर्त शिवसेनेचे विद्यमान आमदार सदा सरवणकर हा मतदारसंघ सहजासहजी सोडणार नाहीत. जर अमित यांचं लढणं निश्चित झालं तर त्यांच्यासाठी मुंबईतलाच सुरक्षित मतदारसंघ शोधला जाईल.

अर्थात या जर-तर च्या गोष्टी आहेत. यापूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपण स्वतः विधानसभा निवडणूक लढवणार, असं 2014 साली मुंबईतील एका सभेत जाहीर केलं होतं. तोपर्यंत तेव्हाच्या एकसंध शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरे यांनी निवडणूक लढवली नव्हती. आदित्य निवडणुकीच्या मैदानात 2019 साली उतरले. त्यामुळ राज ठाकरे यांच्या रुपाने ठाकरे घराण्यातील पहिला सदस्य निवडणूक लढणार, अशा चर्चांना तेव्हा ऊत आला. मात्र राज यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला. आता अमित ठाकरे यांनी निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केलीय. अमित यांच्या इच्छेवर राज यांच्या मान्यतेची मोहर पडते का, यावर बरंच काही अवलंबून आहे.

Last Updated : Sep 16, 2024, 4:09 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.