ETV Bharat / state

अंबरनाथच्या दुर्गादेवी पाडा परिसरात दुहेरी हत्याकांड; चोर समजून मारहाण करणाऱ्या 20 जणांना पोलिसांनी घेतलं ताब्यात - double murder in Durga Devi Pada

Ambernath Crime News : पूर्वेच्या दुर्गापाडा परिसरात शुक्रवारी (16 फेब्रुवारी) रात्रीच्या सुमारास दुहेरी हत्याकांड घडल्याची धक्क्कादायक माहिती समोर आली आहे. सूरज परमार आणि सूरज कोरी असं मृत तरुणांचं नाव आहे. तर याप्रकरणी 20 जणांना चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

Ambernath Crime News double murder in Durga Devi Pada area 20 peoples were taken into custody by police
अंबरनाथच्या दुर्गादेवी पाडा परिसरात दुहेरी हत्याकांड
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 17, 2024, 9:13 PM IST

अशोक भगत , वरिष्ठ पोलीस निरीक्षक

ठाणे Ambernath Crime News : चोरी करण्यासाठी आले या संशयातून दोन तरुणाची जमावानं बेदम मारहाण करून हत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. ही घटना अंबरनाथ पूर्वेतील दुर्गादेवी पाडा परिसरात साई कृपा कॉलनी येथे घडली आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात मारहाण करणाऱ्या जमावापैकी 20 जणांना संशियत म्हणून पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांची चौकशी सुरू केली आहे.

20 जणांना घेतलं ताब्यात : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सूरज परमार आणि सूरज उर्फ भैय्या निर्मल कोरी अशी मृत तरुणांची नावं आहेत. हे दोघंही अंबरनाथ शहरातील प्रकाशनगर आणि शिवमंदिर परिसरात राहत होते. अंबरनाथच्या दुर्गादेवी पाडा परिसरात आज (17 फेब्रुवारी) सकाळी या दोघांचे मृतदेह आढळून आले. याविषयी माहिती मिळताच तात्काळ शिवाजी नगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या दोन्ही तरुणांना चोर समजत जमावानं मारहाण करून हत्या केल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त केला जातोय. तसंच त्यादृष्टीनं शिवाजीनगर पोलीस तपास करत असून आतापर्यत 20 जणांना ताब्यात घेण्यात आलं असून त्यांची चौकशी सुरू आहे. तसंच दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.

जमावानं केलेल्या मारहाणीत दोघांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. त्यामुळं याच दिशेनं पोलीस तपास करत आहेत- अशोक भगत, वरिष्ठ पोलीस निरीक्षक

जमावाकडून करण्यात आली मारहाण : सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पहाटेच्या सुमारास दुर्गादेवी पाडा परिसरात साई कृपा कॉलनी येथे मृतक दोघेही चोरी करण्याच्या उद्देशानं आले होते. त्यावेळी परिसरातील कुत्रे त्यांच्यावर भुंकत असल्यानं परिसरातील नागरिक जागे झाले. ते बघून दोघांनीही परिसरातून पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यामुळं जमावानं दोघांना चोर समजून त्यांना बेदम मारहाण केली.

हेही वाचा -

  1. नागपुरात घडले दुहेरी हत्याकांड, काही तासातच आरोपींना बेड्या
  2. उज्जैनमध्ये दुहेरी हत्याकांड; दरोड्यानंतर भाजपा नेते रामनिवास कुमावत आणि त्यांच्या पत्नीची हत्या
  3. Ahmednagar Crime News: पत्नी- सासूचा खून करून फरार झालेल्या घरजावयाची आत्महत्या, खुनानंतर स्वतःच्या आईकडे सोपवली मुलगी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.