ETV Bharat / state

पुणे पोर्शे कार अपघात प्रकरण : डॉ. तावरेंचा पाठीराखा मंत्रालयात कितव्या मजल्यावर बसतो? अंबादास दानवे यांचा सवाल - Pune Porsche Car Case

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 29, 2024, 8:18 PM IST

Pune Porsche Car Case : पुणे ससून येथील रक्ताचे नमुने बदलल्या प्रकरणात आरोपी असलेले डॉ. अजय तावरे (Ajay Taware) हे कुणाच्या आशीर्वादाने काम करतात? मंत्रालयातील कितव्या मजल्यावर त्याचा पाठीराखा बसतो हे आता स्पष्ट व्हायला पाहिजे अशी मागणी, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी आज मुंबईत पत्रकार परिषदेत केली आहे.

Ambadas Danve
अंबादास दानवे (ETV BHARAT MH DESK)

मुंबई Pune Porsche Car Case : पुणे येथील पोर्शे कार अपघात प्रकरणात आरोपीचे रक्ताचे नमुने बदलले गेल्याचं स्पष्ट झालंय. या प्रकरणात किती रुपयांचा व्यवहार झाला आणि काय प्रकरण घडलं हे आता सर्वांसमोर आलंय. या प्रकरणातील आरोपी डॉ. अजय तावरे (Ajay Taware) याच्याशी कोण फोनवर संपर्कात होते, याची चौकशी व्हावी. तसंच त्यांना कोणी आदेश दिले याची देखील चौकशी व्हावी अशी मागणी, अंबादास दानवे यांनी केलीय.

प्रतिक्रिया देताना विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (ETV BHARAT Reporter)

तावरेचा पाठीराखा कोण : वैद्यकीय शिक्षण विभागाचे माजी मंत्री गिरीश महाजन आणि त्यांचे सचिव अश्विनी जोशी यांनी राज्यातील सर्व वैद्यकीय महाविद्यालयांच्या अधिष्ठातांच्या बदलीची फाईल मुख्यमंत्र्यांकडं पाठवली होती. या फाईलमध्ये 16 अधिकाऱ्यांच्या बदल्या होत्या. यापैकी 15 अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या. मात्र केवळ डॉ. अजय तावरे याची बदली झाली नाही. आता यामागे कोण आहे आणि कशामुळं अजय तावरेची बदली झाली नाही हे सरकारनं स्पष्ट करावं. त्यामुळं अजय तावरेचा पाठीराखा मंत्रालयाच्या कितव्या मजल्यावर बसला आहे? हे सुद्धा स्पष्ट करावं अशी मागणी दानवे यांनी केलीय.

भ्रष्टाचाराचे आरोप असलेली व्यक्ती चौकशी समितीत : जे जे रुग्णालयाच्या अधिष्ठाता पल्लवी सापळे यांची चौकशी काही बाबतीत सुरू होती. ज्या व्यक्तीची स्वतःची चौकशी सुरू आहे अशा व्यक्तीच्या अध्यक्षतेखाली नवी चौकशी समिती कशी नेमली जाते. ही चौकशी समिती काय अहवाल देणार? असा सवालही दानवे यांनी उपस्थित केलाय.

शेतकरी आत्महत्या सुरूच : राज्यातील शेतकऱ्यांना सरकारकडून शेतीसाठी कर्ज दिले गेले नाही. ज्या शेतकऱ्यांना कर्ज दिले गेले नाही अशा शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचं स्पष्ट झालंय. राज्यातील शेतकऱ्यांना खते, बी-बियाणे यांचा सुद्धा तुटवडा आहे. सरकारने त्याची तजवीज केलेली नाही. त्यामुळं येत्या अधिवेशनात सरकारला याबाबतीत धारेवर धरणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय.

हेही वाचा -

  1. जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना प्रकरणी अजित पवारांवर दबाव आणण्यासाठी चौकशी सुरू - Jarandeshwar Sugar Factory Case
  2. एका हाताने टाळी वाजवण्याचा अंध तरुणानं केला पराक्रम, इंडीयाज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद - Rahul Petare can clap by one hand
  3. नवी मुंबई महानगरपालिका, पोलिसांकडून रात्रभर डान्सबार, पबवर तोडक कारवाई - Action on pubs in Navi Mumbai

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.