ETV Bharat / state

'मोदींच्या सभेसाठी शासकीय यंत्रणेचा गैरवापर, अधिकाऱ्यांवर कारवाई करावी'; दानवे यांचे मुख्य निवडणूक आयुक्तांना पत्र - Demand To Election Commissioner

Danve Demand To Election Commissioner : देशाचे 'प्रभारी पंतप्रधान' नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी मोठ्या प्रमाणात रस्त्याच्या डागडुजी, स्वच्छतेसाठी स्थानिक प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणात खर्च करण्यात येत आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या आदर्श आचारसंहितेचा हा भंग आहे. त्यामुळे याप्रकरणी चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर नियमानुसार उचित कारवाई करावी, अशी मागणी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मुख्य निवडणूक आयुक्त यांना पत्राद्वारे केली आहे.

Danve Demand To Election Commissioner
अंबादास दानवे (Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 15, 2024, 9:17 PM IST

मुंबई Danve Demand To Election Commissioner : राज्यात लोकसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून लोकसभा निवडणूक 2024 चं कामकाज सुरू झालं आहे. त्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाकडून आदर्श आचारसंहिता जाहीर करण्यात आलेली आहे. असं असताना 'प्रभारी पंतप्रधान' नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी मोठ्या प्रमाणात रस्त्याच्या डागडुजीची कामं करण्यात येत आहेत. स्वच्छतेसाठी स्थानिक प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणात खर्च करण्यात येत आहे.

आचारसंहिता भंग : निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या आदर्श आचारसंहितेचा हा भंग आहे. त्यामुळे याप्रकरणी चौकशी करून आदर्श आचारसंहितेचा भंग केल्या प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांवर नियमानुसार उचित कारवाई करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मुख्य निवडणूक आयुक्त यांना पत्राद्वारे केली आहे. देशभरात स्वतंत्र आणि निष्पक्ष निवडणूक व्हावी यासाठी निवडणूक आयोगाने मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत. त्याप्रमाणे राज्यात सर्वत्र राजकीय पक्षांकडून त्यांचे पालन करून नेत्यांच्या सभा सुरू असून चौथ्या टप्प्यातील प्रचाराची कामे सुरू आहेत; परंतु पंतप्रधान यांच्या दौऱ्याच्या वेळी अनेक ठिकाणी या आचारसंहितेचा भंग करून ज्या ठिकाणी त्यांच्या सभा होणार आहेत त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रस्त्याच्या डागडुजीची कामं करण्यात येत असून स्वच्छतेसाठी स्थानिक प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणात खर्च करण्यात येत आहे. कोल्हापूर येथील हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील उमेदवाराच्या प्रचारासाठी मोदी येणार असल्याने विमानतळापासून ते सभेच्या ठिकाणापर्यंतच्या रस्त्याची डागडुजी आणि स्वच्छतेची कामं कोल्हापूर महानगरपालिकेमार्फत करण्यात आली.

शासकीय यंत्रणेचा गैरवापर : वास्तविक पाहता इतर वेळी पंतप्रधान किंवा इतर राजकीय महत्त्वाच्या पदावर असलेल्या व्यक्तींच्या दौऱ्याच्यावेळी अशी कामे करण्यात येत असतात; परंतु लोकसभेच्या निवडणुकीसाठी देशात आदर्श आचारसंहिता सुरू असताना नरेंद्र मोदी यांच्या बैठकांच्या स्थळी जाण्यासाठी प्रत्येक ठिकाणी अशी कामे शासकीय यंत्रणेचा वापर करून करण्यात येत असल्याने एक प्रकारे हा निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या आदर्श आचारसंहितेचा भंग आहे. त्यामुळे याप्रकरणी चौकशी करून आदर्श आचारसंहितेचा भंग केल्या प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांवर नियमानुसार उचित कारवाई करण्याची मागणी आपण निवडणूक आयुक्तांकडे करत असल्याचं अंबादास दानवे यांनी सांगितलं.

हेही वाचा :

  1. अस्मितेसाठी महाराष्ट्र पेटून उठत नाही ही खंत - इतिहासतज्ञ इंद्रजीत सावंत; तर पंतप्रधानांनी महाराष्ट्राची माफी मागावी, विरोधकांची मागणी - Political Reaction on Jiretop
  2. कांद्यावरुन मोदींविरोधात तरुणांची भर सभेत घोषणाबाजी; पंतप्रधान मोदी मात्र उद्धव ठाकरेंवर बरसले - pm narendra modi
  3. "मंत्रिपद पाहिजे या हेतूनं तुमचं सरकारकडे लांगूलचालन..." संभाजी ब्रिगडेचा प्रफुल पटेल यांच्यावर हल्लाबोल - prafull patel

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.