पुणे Ajit Pawar taunted Supriya Sule : खासदार सुप्रिया सुळे मी केलेल्या कामाची यादी आपल्या पुस्तकात छापतात. "मी केलं, मी केलं असं सांगत फिरत आहेत ", अशी नक्कल अजित पवार यांनी आज (27 एप्रिल) सुप्रिया सुळे यांची भर भाषणात केलेली आहे. दरम्यान त्यांनी सुप्रिया सुळेंवर टीकाही केलेली आहे. बारामतीचा सगळा इमारतीचा विकास मी केला; मात्र दुसऱ्याच्या विकास कामाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. ही निवडणूक भावनिक नाही. मी अगोदर बारामतीचा विकास केला; मग तुमच्याकडे मत मागायला आलेलो आहे. मी करून दाखवलेलं आहे, असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.
अजित पवारांचा सुप्रिया सुळेंना सवाल : विद्यमान खासदारांना माझा प्रश्न आहे की, पंधरा वर्षांच्या खासदारकीच्या काळात तुम्ही भोरसाठी काय केलं हे सांगा. भोर एमआयडीसी जर 2019 ला झाली नाही तर मतं मागायला येणार नाही, असं म्हटलं होतं. तरी तुम्ही मतं मागायला आलात. आता 24 ला ही मतं मागायला आलेला आहात. मी असतो तर मलाच याबद्दल कसे जाऊ मत मागायला असा प्रश्न पडला असता, अशी टीका अजित पवार यांनी आज सुप्रिया सुळे यांच्यावर पुण्यात केलेली आहे.
मी शब्दांचा पक्का, त्यामुळे प्रश्न सुटतील : सुनेत्रा पवार यांच्या प्रचारानिमित्त भोर मुळशी तालुक्यातील पुण्यात राहणाऱ्या नागरिकांचा मेळावा आज कात्रज भागात घेण्यात आला. या मेळाव्याला अजित पवार यांनी मार्गदर्शन केलं. या भागातले एमआयडीसीचे प्रश्न असेल, कृषी पर्यटन असेल, टोलनाक्याचे प्रश्न असतील, कारखानदारी असेल, रोजगार असेल हे सगळे प्रश्न सोडवण्यासाठी मी स्वतः पुढाकार घेईन. एक तर मी कुणाला शब्द देत नाही आणि देताना विचार करून देतो. मी शब्दाचा पक्का आहे. त्यामुळे हे सगळे प्रश्न सुटतील. फक्त यावेळेस मी सांगणाऱ्या उमेदवाराला निवडून द्या. तुम्ही पंधरा वर्षे त्यांना दिले. पाच वर्ष यांना निवडून द्या. पंधरा वर्षांपेक्षा जास्त विकास मी तुम्हाला करून दाखवेल आणि जर एमआयडीसी नाही झाली तर मीसुद्धा भोरमध्ये मत मागायला येणारच नाही मी थांबणारच नाही, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिलेली आहे.
हेही वाचा :
- पंकजा मुंडेंनी मारली पलटी! म्हणाल्या, "प्रीतम मुंडेंविषयीचं वक्तव्य..." - Pankaja Munde
- नेत्यांच्या चकरा अन् हेलिकॉप्टरच्या घिरट्यांमध्ये वाढ; निवडणुकीच्या काळात आलाय भाव, किंमती जाणून बसेल धक्का - Lok Sabha election 2024
- अहमदनगरात निलेश लंके विरुद्ध सुजय विखे लढतीत आणखी एका 'निलेश लंके'ची उडी; रोहित पवारांचा विखेंवर हल्लाबोल - Lok Sabha election