ETV Bharat / state

निवडणुकीनंतर मुख्यमंत्री पद कोणाला मिळणार? अजित पवारांनी सांगितले 'हे' दोन महत्त्वाचे मुद्दे - Ajit Pawar News

Ajit Pawar News उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गणेश चतुर्दशीनिमित्त श्रीमंत दगडुशेठ हलवाई मंदिरात आरती केली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना आगामी विधानसभा निवडणुकीबाबत त्यांनी भूमिका मांडली.

Ajit Pawar on election contest
उपमुख्यमंत्री अजित पवार विधानसभा निवडणूक (Source- ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 17, 2024, 10:16 AM IST

Updated : Sep 17, 2024, 11:26 AM IST

पुणे Ajit Pawar News - राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडी तसेच महायुतीमध्ये मुख्यमंत्री पदाबाबत जोरदार चर्चा सुरू आहे. शिवसेना ठाकरे पक्षाकडून महाविकास आघाडीकरिता माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नाव पुढे केलं जात आहे. तर राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नेत्यांनीही अजित पवार यांची मुख्यमंत्री पदी निवड व्हावी, अशी इच्छा व्यक्त केली होती. अशातच मुख्यमंत्री पदाच्या चर्चांबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे.

अजित पवार यांची मंदिरात पूजा, निवडणुकीवर भाष्य (Source- ETV Bharat Reporter)

पुण्याच्या विसर्जन मिरवणुकीला थोड्याच वेळात सुरू होणार आहे. तत्पूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पूजा करून आरती केली. त्यानंतर उपमुख्यमंत्री पवार यांनी अखिल मंडई मंडळातदेखील आरती केली. यावेळी विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री पदाबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारलं असता ते म्हणाले, "पहिल्यांदा महायुतीचं सरकार आणण्याकरता आमचा प्रयत्न असणार आहे. महायुतीचं सरकार आल्यावर आम्ही सर्वजण बसून निर्णय घेऊ. तसेच आताच्या विधानसभा निवडणूका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही लढणार आहोत."

यावेळी अजित पवार म्हणाले, "अतिशय उत्साहात राज्यातील जनतेने उत्साहपूर्ण वातावरणात बाप्पांचं स्वागत केलं आहे. आज बघता बघता 11 वा दिवस उजाडला आहे. आज गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, म्हणण्याची वेळ आली आहे. थोडंसं मन जड झालं आहे."

  • "आतापर्यंत सर्वांनी अतिशय चांगलं काम केलं आहे. विसर्जनाच्या दिवशी प्रत्येकानं आपापली जबाबदारी पार पाडावी," असे आवाहन यावेळी उपमुख्यमंत्र्यांनी केले.

सर्वच कार्यकर्त्यांना वाटत असते की, आपापला नेता हा मुख्यमंत्री व्हावा. पण सगळ्यांची इच्छा पूर्ण व्हावी, असं होत नाही. मुख्यमंत्री पदाबाबत 145 चा मॅजिक आकडा पार करावा लागतो. दुसरी सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे कोणाला मतदान करायचं आहे, हे मतदार राजा याच्या हातात असते-उपमुख्यमंत्री अजित पवार

दर्शनाकरिता इतर राज्यांतील नेते, सेलिब्रिटी महाराष्ट्रात- उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील गणेशोत्सावरदेखील भाष्य केलं. उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, " कोरोनाच्या काळात बऱ्याच सणावर मर्यादा आल्या होत्या. त्यामुळे गणेश मंडळ आणि कार्यकर्ते नाराज होते. कोरोनाच्या परिस्थितीमधून बाहेर पडावे, अशी सर्वांची इच्छा होती. मी 35 वर्षे पाहत आहे. राज्यातील गणेशोत्सव वाढत चालला आहे. इतर राज्यातील सेलिब्रिटी आणि राजकीय नेते राज्यात दर्शनाला येतात. ते लालबागचा राजा आणि दगडूशेठच्या गणपतीच्या दर्शनासाठी विनंती करतात. सलग सुट्ट्यांमुळे गणेशभक्तांची गर्दी वाढली आहे."

हेही वाचा-

  1. उपमुख्यमंत्री अजित पवार आज 'लालबागचा राजा' चरणी लीन; भल्या पहाटे घेतलं दर्शन - Ajit Pawar At Lalbaugcha Raja
  2. लाडक्या गणरायाला आज निरोप... मुंबईत 24,000 हून अधिक पोलीस तैनात - Ganesh visarjan 2024
  3. अमित शाहांचा मुंबई दौरा संपताच अजित पवार मध्यरात्री 'वर्षा'वर; तीन तास चर्चा - DCM Ajit Pawar Meet CM

Last Updated : Sep 17, 2024, 11:26 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.