ETV Bharat / state

आधी 'अहमदनगर' का होतं अन् आता 'अहिल्यानगर' का झालं? वाचा इतिहास - Ahmednagar Renamed As Ahilyanagar

अहमदनगर जिल्ह्याला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं नाव देण्याची मागणी दोन वर्षांपूर्वी करण्यात आली होती. अखेर अहमदनगर जिल्ह्याचं नाव बदलून 'अहिल्यानगर' झाल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली.

AHMEDNAGAR RENAMED TO AHILYANAGAR
अहमदनगरचं अहिल्यानगर असं नामकरण (Etv Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 5, 2024, 7:30 PM IST

अहिल्यानगर : अहमदनगरचं नामांतरण आता 'अहिल्यानगर' करण्यात आलंय. राज्य सरकारनं यासंबंधीच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केलाय. केंद्र सरकारकडून मंजुरी आणि अंतिम अधिसूचना शुक्रवारी (4 ऑक्टोबर) निघताच, शनिवारी तातडीनं राज्य सरकारनं अधिसूचना काढून अहमदनगर शहराचं नाव 'अहिल्यानगर' केलं. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी नामांतराबाबत सरकारनं अधिसूचना काढली असली तरी नामांतराला विरोध करत काही जणांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली. त्यामुळं यात कायदेशीर गुंता कायम असल्याचं दिसून येत आहे. मात्र, तूर्तास राज्य सरकारनं अधिसूचना काढून विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर श्रेयवादाची लढाई जिंकल्याचं म्हणावं लागेल.

शहराचा इतिहास : अहमदनगरचं 'अहिल्यानगर' केल्यानंतर काहींनी या निर्णयाचं स्वागत केलं, तर काहींनी नामांतराला विरोध करत थेट उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. अहमदनगर शहर हे देशातील काही प्रस्थापित शहरांपैकी एक आहे. या शहराची स्थापना 'मलिक अहमद निजामशाह' यांनी 28 मे 1490 रोजी केली. अहमदनगर शहराच्या स्थापनेला तब्बल 534 वर्षे झाली. निजाम अहमदच्या नावावरून शहराला अहमदनगर नाव देण्यात आलं. अहमदशाहानं आपल्या कार्यकाळात शहरात अनेक आकर्षक वास्तू निर्माण करून नागरिकांसाठी नागरी सुविधा उपलब्ध करून दिल्या. त्यामुळं एक उत्तम प्रशासकाच्या नावानं असलेल्या अहमदनगर शहराचं नाव बदलू नये, असं एका वर्गाचं म्हणणं आहे. तर, दुसरीकडे जिल्ह्यातील चौंडी इथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा जन्म झाल्यामुळं जिल्ह्याला त्यांचं नाव द्यावं, अशी आग्रही मागणी होती.

राज्यातील महत्त्वाचं शहर : 'अहिल्यानगर' हे उत्तर महाराष्ट्रातील महत्त्वाचं शहर आहे. कापड बाजार खरेदी आणि बेकरी उत्पादनांसाठी हे शहर प्रसिद्ध आहे. येथे भारतीय लष्कर प्रशिक्षण, देशातील मुख्य आर्मी ऑफिस व रणगाडा केंद्र आहे. या शहराची स्थापना मलिक अहमद निजामशाह यांनी 28 मे 1490 रोजी केली. विशेष म्हणजे मलिक अहमदच्या फौजेत असणारा राजा, सेनापती, प्रधान आणि काझी या सर्वांच्याच नावात अहमद होतं.

नामांतराला विरोध करणारी याचिका दाखल : राजकीय पातळीवर सर्व पक्षीय नेत्यांनी 'अहिल्यानगर' नावाला सहमती दर्शवली. अनेक व्यक्ती, संस्था 'अहिल्यानगर' असाच उल्लेख करत आहेत. तर माजी कुलगुरू डॉ.सर्जेराव निमसे, हर्षद शेख आदींनी औरंगाबाद खंडपीठात नामांतराला विरोध करणारी याचिका दाखल केली. या याचिकेची सुनावणी 10 ऑक्टोबर रोजी होणार आहे.

अंतिम अधिसूचना जारी : 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर' यांचं जन्मस्थान 'चौंडी' हे नगर जिल्ह्यात आहे. त्यामुळं जिल्ह्याला त्यांचं नाव देण्याची मागणी सुमारे दोन वर्षांपूर्वी करण्यात आली होती. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषणा केली. तसंच महापालिकेनं ठरावही केला. त्यानंतर राज्य मंत्रिमंडळानंही त्याला मान्यता दिली. हा प्रस्ताव केंद्र सरकारकडं गेला. त्यानंतर केंद्रानंही मंजुरी दिली.

महायुतीनं दिलेली आश्वासनं पूर्ण केल्याचं समाधान : "पुण्यश्लोक अहिल्या देवी यांच्या जयंतीचं यंदा 300 वं वर्ष असून हा निर्णय होणं, ही एक ऐतिहासिक घटना आहे. अहमदनगर जिल्ह्याला पुण्यश्लोक अहिल्या देवीचं नाव देण्याच्या मागणीवर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आला. अहमदनगर जिल्हा आता 'अहिल्यानगर' म्हणून ओळखला जाणार. या निर्णयात योगदान देऊ शकलो याचा मला आनंद आहे. महायुती सरकारनं दिलेली आश्वासनं पूर्ण केल्याचं समाधान आहे," असं पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितलं.

हेही वाचा

  1. नागपुरात देशातील पहिला 'चार मजली उड्डाणपूल' सुरू; गडकरी म्हणाले, "वरदान ठरणार" - Nagpur Double Decker Flyover Bridge
  2. ठाण्यातील पंतप्रधान मोदींच्या सभेसाठी आल्या रिकाम्या बस; पाहा व्हिडिओ - PM Narendra Modi
  3. पंतप्रधान मोदींकडून नंगारा भवनाचं उद्घाटन, बंजारा समाजाच्या 'काशी'त वाजवले नगारे - PM NARENDRA MODI SPEECH IN WASHIM

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.