ETV Bharat / state

राणा यांच्यानंतर अभिनेत्री क्रांती रेडकर यांनाही आली पाकिस्तानमधून जीवे मारण्याची धमकी

Death Threat Kranti Redkar from Pakistan : अभिनेत्री क्रांती रेडकर यांना पाकिस्तानमधून जीवे मारण्याची धमकी आल्याची बातमी समोर आली आहे. याबाबत स्व: क्रांती यांनी आपल्या एक्स (ट्वीटर)वरून माहिती दिली आहे.

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 8, 2024, 10:36 PM IST

अभिनेत्री क्रांती रेडकर
अभिनेत्री क्रांती रेडकर

मुंबई : Death Threat Kranti Redkar from Pakistan : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना पाकिस्तानमधून जीवे मारण्याची घटना ताजी असतानाच आता प्रसिद्ध मराठी अभिनेत्री क्रांती रेडकर यांनाही जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. याबाबत सोशल मीडियावर पोस्ट लिहित क्रांती रेडकर यांनी ही माहिती दिली आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुंबई पोलिसांना आपल्या पोस्टमध्ये टॅग करत क्रांती यांनी ही माहिती दिली आहे. मागील एक वर्षांपासून क्रांतीला जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत.

वेळोवेळी मुंबई पोलिसांना कळवलं : याआधी देखील मीडिया समोर येत आपल्या जीवे मारण्याच्या धमक्या येत असल्याचं क्रांती रेडकर यांनी सांगितलं होतं. मागील एक वर्षांपासून त्यांना पाकिस्तान आणि युकेमधील नंबरवरून जीवे मारण्याच्या धमक्या येत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. जीवे मारण्याची धमकी आल्यानंतर त्यांनी वेळोवेळी त्याबाबत मुंबई पोलिसांच्या निदर्शनास आणून दिलं आहे.

क्रांतीने पोस्टमध्ये काय म्हटलं? : क्रांती रेडकर यांनी ट्वीट करत याबाबत मत व्यक्त केलं आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, माझ्या मोबाईल नंबरवर पाकिस्तानी आणि ब्रिटनमधून मला जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. हे फक्त तुमच्या निदर्शनास आणून द्यायचं आहे. हे गेल्या एक वर्षापासून होत आहे. पोलिसांना वेळोवेळी याबाबत कळवण्यात आलं आहे. तसंच, क्रांतीने तिच्या या पोस्टवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच, मुंबई पोलिसांना देखील टॅग केलं आहे.

तेव्हाही आल्या होत्या चर्चेत : अभिनेत्री क्रांती रेडकर या एनसीबी ऑफिसवर समीर वानखेडे यांच्या पत्नी आहेत. कॉर्डेलिया क्रूझ प्रकरणात समीर वानखेडे यांच्यावर अनेक आरोप करण्यात आले होते. तेव्हा देखील क्रांती रेडकर मोठ्या प्रमाणात चर्चेत आल्या होत्या.

हेही वाचा :

1 खासदार नवनीत राणा यांना पाकिस्तानातून जीवे मारण्याची धमकी, तक्रार दाखल

2 "गल्लीतील नेत्यानं...", नितीन गडकरींना उद्धव ठाकरेंनी दिलेल्या ऑफरवर फडणवीसांचं उत्तर

3 टीकेचा वार, शरद पवार! कायम पवारच का होतात विरोधकांचे टार्गेट? वाचा खास रिपोर्ट

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.