ठाणे : दिवाळीला (Diwali 2024) अवघे काही दिवस उरले आहेत. दिवाळी हा दिव्यांचा आणि प्रकाशाचा सण म्हणून ओळखला जातो. हिंदू धर्मात दिवाळी सणाला अतिशय महत्वाचं स्थान आहे. तर दिवाळीसाठी बाजारपेठा सज्ज झाल्या आहेत. बाजारात नवनवे आकाश कंदील, दिवे, तोरण विक्रीसाठी आले आहेत. तर अमिताभ बच्चन, सलमान खान, रितिक रोशन, मनीष मल्होत्रा यांच्या घराबाहेर लागणारे कंदील हे ठाण्यात तयार होतात. मनीष मल्होत्रा यांचा तर कंदील रवाना देखील झाला आहे. ठाण्यातील या पर्यावरणभिमुख कंदिलांची मागणी पूर्ण करण्यासाठी आता अहोरात्र मेहनत सुरू आहे.
हेरंभ आर्ट्स दरवर्षी मागणी : दरवर्षी हजारो कंदील बनवून प्रदूषण कमी करण्यासाठी मदत करणाऱ्या हेरंभ आर्ट्सनं यंदा बांबू आणि कापडी कंदील तयार केले आहेत. दरवर्षी सेलिब्रिटी हेरंभ आर्ट्स यांच्याकडून शेकडो कंदील मागवत असतात. यंदा देखील या कंदिलांची मागणी पुर्ण करण्यासाठी लगबग सुरू आहे.
बुकिंग सुरू परदेसी कंदील रवाना : या पर्यावरणभिमुख कंदिलांची मागणी मोठ्या प्रमाणात असून बुकिंग फुल्ल झालंय. ऑनलाईन विदेशातून आलेल्या मागण्या पूर्ण करण्यात येणार आहे. विदेशात कंदील पाठवण्यासाठी विशेष काळजी घ्यावी लागते. त्यांचं कुरिअर करणं देखील सुरू असल्याचं हेरंभ आर्ट्सचे यश देसले यांनी सांगितलं.
पारंपारिक कंदीलांची मागणी घटली : पारंपारिक कंदील आता वापरले जात नसून त्यांची मागणी घटलेली आहे. त्यांची जागा आता या इको फ्रेंडली कंदीलनं घेतलीय. बांबू आणि कापडी अशा नवीन आकर्षक कंदिलांची मागणी वाढत आहे. तर कापडावर प्रिंट केलेले कंदील देखील नागरिकांच्या पसंतीस पडत आहेत.
दरवर्षी होते शेकडो कोटींची उलाढाल : दरवर्षी कंदील, रांगोळी, उठणं या व्यवसायातून शेकडो कोटींची उलाढाल होते. यामुळं सीजनल व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांना दिवाळीनिमित्त काम मिळतं. या सीजनल कामावर हजारो कुटुंबांचा उदरनिर्वाह होत असून याचा फायदा बेरोजगारांना देखील होतो.
हेही वाचा -