ETV Bharat / state

साताऱ्याच्या जिल्हाधिकाऱ्यांचा जीएसटी आयुक्तांना दणका, झाडाणी गावातील अनधिकृत बांधकाम पाडणार - Jhadani Illegal Constructions - JHADANI ILLEGAL CONSTRUCTIONS

Jhadani Illegal Constructions : अहमदाबादचे जीएसटी आयुक्त चंद्रकांत वळवी यांना सातारच्या जिल्हाधिकाऱ्यांनी मोठा दणका दिला आहे. महाबळेश्वर तालुक्यातील झाडाणी गावची जमीन बळकावून त्याठिकाणी केलेले अनाधिकृत बांधकाम (Unauthorized Construction) पाडण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी प्रांताधिकाऱ्यांना दिले आहेत.

Action Against Illegal Constructions
अनधिकृत बांधकाम (ETV BHARAT Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 12, 2024, 10:56 PM IST

सातारा Jhadani Illegal Constructions : मूळचे नंदुरबारचे रहिवासी आणि अहमदाबादचे जीएसटी आयुक्त चंद्रकांत वळवी, त्यांचे कुटुंबीय आणि नातेवाईकांनी महाबळेश्वर तालुक्यातील झाडाणी गावची जमीन बळकावल्याचं प्रकरण सध्या राज्यात गाजत आहे. याप्रकरणी माहिती अधिकार कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी बेमुदत उपोषण सुरू केल्यानंतर जीएसटी आयुक्ताने केलेलं बेकायदेशीर बांधकाम पाडण्याचे (Unauthorized Construction) आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी प्रांताधिकाऱ्यांना दिले आहेत.



बेमुदत उपोषणाला अखेर यश : सुशांत मोरे यांच्या हाती आलेल्या कागदपत्रांतून झाडाणी गावची ६४० एकर जमीन जीएसटी आयुक्त चंद्रकांत वळवी आणि त्यांच्या नातेवाईकांनी बळकावल्याची बाब समोर आली. तसंच कोणत्याही परवानगीशिवाय अनधिकृत बांधकाम केल्याचंही निदर्शनास आलं. या प्रकरणात कमाल जमीन धारणा कायद्याचं उल्लंघन झालं असून सखोल चौकशी करण्याची मागणी मोरे यांनी केली. झाडाणीतील अनधिकृत बांधकाम पाडण्यात यावं, यासह अन्य मागण्यांसाठी मोरे यांनी बेमुदत उपोषणही सुरू केलं होतं. त्याला यश आलं आहे.


अनधिकृत बांधकाम पाडण्याचे आदेश : यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी जीएसटी आयुक्तांसह तिघांना नोटीसा बजावून मंगळवारी (११ जून) जिल्हाधिकारी कार्यालयात हजर राहण्यास कळवलं होतं. त्यानुसार त्यांच्या वकिलांनी हजर होवून पुरावे सादर करण्यास मुदत मागितली. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी २० जून तारीख दिली आहे. उपोषणाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने अ‍ॅक्शन मोडवर येत झाडाणीतील ४० एकर क्षेत्रावर झालेलं अनधिकृत बांधकाम पाडण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी वाईच्या प्रांताधिकाऱ्यांना दिले आहेत. जीएसटी आयुक्तांना हा मोठा धक्का आहे.



उपोषणकर्त्याच्या सर्व मागण्या मान्य : व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रातील जमीन खरेदी व्यवहारांची चौकशी, कांदाटी खोऱ्यातील १६ गावांसाठी रुग्णवाहिका, नवजा (ता. पाटण) येथील ओझर्डे धबधब्याचे व्यवस्थापन स्थानिकांकडं हस्तांतर करणं, वन्यजीवांच्या हल्ल्यानंतरची तत्काळ मदत, वासोटा किल्ला, ओझर्डे धबधबा परिसरात प्लास्टिक संकलन आणि घनकचरा प्रकल्पाची उभारणी, यावर तातडीनं कार्यवाही केली जाणार असल्याचं लेखी आश्वासन प्रशासनानं उपोषणकर्ते सुशांत मोरे यांना दिलं. त्यानंतर निवासी उपजिल्हाधिकारी विक्रांत चव्हाण यांच्या हस्ते लिंबू सरबत घेऊन सुशांत मोरे यांनी उपोषण स्थगित केलंय.

हेही वाचा -

  1. Satara : साताऱ्यातील मेडिकल कॉलेजचं काम बंद पाडलं; नेमकं कारण काय?
  2. Borivali Building Collapsed : बोरिवलीत १६ व्या मजल्याच्या पायाड्यावरून पडून तिघांचा मृत्यू...
  3. पिंपरी चिंचवडमधील 'ती' झुकलेली इमारत अखेर जमीनदोस्त; परिसरातील नागरिकांचा जीव पडला भांड्यात

ABOUT THE AUTHOR

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.