नवी मुंबई Acid Attack On Wife : पत्नीनं बहिणीच्या घरी हैदराबाद येथे जाण्यास नकार दिल्यानं पनवेलमध्ये एका व्यक्तीनं पत्नी साखरझोपेत असतानाच तिच्या चेहऱ्यावर अॅसिड फेकल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. (search for absconding husband) सद्यस्थितीत पीडित महिला तिच्या माहेरी कोलकाता येथे उपचार घेत आहे.
काय आहे प्रकरण? मजान सिद्दीकी गाझी (वय, २८) आणि त्याची पत्नी हे दोघेही पनवेल तालुक्यातील वावंजे ग्रामपंचायतीच्या हद्दीतील खैरने गावात गेल्या तीन महिन्यांपासून त्यांच्या तीन मुलांसह राहत होते. कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी मझान गाझी हा मजुरी करत होता. तर त्याची पत्नी ही पनवेल जवळील एका कंपनीत कामाला होती. मझान गाझी हा हैदराबाद येथे राहणाऱ्या बहिणीच्या घरी सहकुटुंब जाऊन काही दिवस राहण्यासाठी पत्नीकडं तगादा लावत होता. मात्र पत्नी नंणदेच्या घरी जाण्यास तयार नव्हती. या कारणामुळे दोघात 19 जानेवारीला कडाक्याचं भांडण झालं. यानंतर पत्नी झोपी गेली. परंतु मझारच्या मनात तिच्याबद्दल राग खदखदत होता. त्यामुळे ती साखरझोपेत असताना त्यानं तिच्या चेहऱ्यावर अॅसिड फेकले. अचानक झालेल्या अॅसिड हल्ल्यानं पत्नी जोरात किंचाळली. या घटनेनंतर तिला पनवेलमधील एका खासगी रुग्णालयात नेण्यात आलं. पुढे ती उपचारासाठी कोलकत्ता येथील तिच्या मूळ गावी असणाऱ्या माहेरी गेली.
पनवेल पोलीस ठाण्यात गुन्हा वर्ग : 20 जानेवारीला झालेल्या अॅसिड हल्ल्यानंतर पनवेल येथील खासगी रुग्णालयात पीडित महिलेनं उपचार घेतले. ती तिच्या माहेरी कोलकाता येथील मूळ गावी गेली. तिच्या पालकांनी तिला पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर पीडितेनं कोलकात्यात पती मझार गाझी विरुद्ध गुन्हा दाखल केला. रविवारी 11 फेब्रुवारीला कोलकाता पोलिसांनी गुन्हा पनवेल तालुका पोलीस ठाण्यात वर्ग केला. सद्यस्थितीत पीडित महिला तिथेच असल्यानं तिच्या जळालेल्या जखमांचं गांभीर्य आणि जखमी अवस्थेत तिनं पनवेल ते कोलकता प्रवास कसा केला असावा? याची माहिती अजूनही मिळालेली नाही, असं पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जगदीश शेळकर यांनी म्हटलं आहे.
- आरोपी पती अद्यापही फरार: पहाटे साखरझोपेत असणाऱ्या पत्नीवर अॅसिड हल्ला करणाऱ्या मझार गाझी याच्यावर कलम २२६ (अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर आरोपी पती फरार असून त्याचा पोलिसांच्या माध्यमातून शोध सुरू आहे, अशी माहिती नवी मुंबई परिमंडळ दोनचे उपायुक्त विवेक पानसरे यांनी दिली.
हेही वाचा: