ETV Bharat / state

अभिषेक घोसाळकर यांच्या पार्थिवाच्या अंत्यदर्शनासाठी प्रचंड गर्दी - मॉरिस नोरोन्हा

Abhishek Ghosalkar Funeral : मुंबईतील दहिसर इथले उद्धव ठाकरे गटाचे माजी नगरसेवक आणि माजी आमदार विनोद घोसाळकर यांचे पुत्र अभिषेक घोसाळकर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. मॉरिस नोरोन्हा नावाच्या गुंडानं गुरुवारी (8 फेब्रुवारी) रात्री 8 वाजेच्या सुमारास हा गोळीबार केला. यानंतर नोरोन्हाने स्वतःवर गोळीबार करुन आत्महत्या केली. अभिषेक घोसाळकर यांच्या पार्थिवावर आज (9 फेब्रुवारी) अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

abhishek ghosalkar funeral
अभिषेक घोसाळकर यांच्या पार्थिवाच्या अंत्यदर्शनासाठी प्रचंड गर्दी
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 9, 2024, 4:12 PM IST

मुंबई Abhishek Ghosalkar Funeral : शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे युवा नेते अभिषेक घोसाळकर यांची गुरुवारी (8 फेब्रुवारी) मॉरिस नामक गुंडानं फेसबुक लाईव्हदरम्यान गोळ्या झाडून हत्या केली. यानंतर मॉरिस याने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. या संपूर्ण घटनेनंतर महाराष्ट्रासह मुंबईत एकच खळबळ उडाली असून अभिषेक घोसाळकर यांच्या अंतिम दर्शनासाठी त्यांच्या निवासस्थानी हजारो लोकांनी गर्दी केली आहे.

संपूर्ण मुंबई हादरली : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सहकुटुंब दुपारी अभिषेक घोसाळकर यांचे अंतिम दर्शन घेण्यासाठी त्यांच्या 'औदुंबर' या निवासस्थानी पोहोचले. घोसाळकर कुटुंबीयांवर ओढवलेल्या या संकट प्रसंगी संपूर्ण ठाकरे कुटुंब आणि पक्ष त्यांच्यासोबत असल्याचं उद्धव ठाकरे यांनी याप्रसंगी सांगितले. भाजपाचे आमदार गणपत गायकवाड यांनी आठवड्याभरापूर्वीच पोलीस ठाण्यात गोळीबार केला होता. त्यानंतर गुरुवारी (8 फेब्रुवारी) अचानक ही घटना घडल्यानं संपूर्ण मुंबई हादरली आहे. अभिषेक घोसाळकर आणि मॉरिस नोरोव्हा या दोघांमध्ये अनेक वर्षांपासून वाद होता आणि या वादाच्या पार्श्वभूमीवर ही हत्या झाली असल्याचं बोललं जात आहे.

कुटुंबीयांना अश्रू अनावर : अभिषेक घोसाळकर यांचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी त्याच्या 'औदुंबर' या निवासस्थानी ठेवण्यात आल्यानंतर स्थानिक लोकांनी तसंच शिवसेनेच्या असंख्य कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी केली. पोलिसांचा मोठा बंदोबस्त या संपूर्ण परिसरामध्ये तैनात करण्यात आला असून दौलतनगर या परिसरात संपूर्ण दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत. अभिषेक घोसाळकर यांना अखेरचा निरोप देताना त्यांची पत्नी आणि त्यांच्या लहान मुलीला अश्रू अनावर झाले. त्यांना रडताना पाहून सर्वांच काळीज पिळवटूनं निघालं आहे.

हेही वाचा -

  1. उद्धव ठाकरेंनी घेतलं अभिषेक घोसाळकर यांचं शेवटचं दर्शन, दुपारी अंत्यसंस्कार
  2. अभिषेक घोसाळकरांची हत्या पूर्व वैमन्यस्यातून, विरोधकांकडून राजकीय रंग देण्याचा प्रयत्न : देवेंद्र फडणवीस
  3. अभिषेक घोसाळकर खून प्रकरण नेमकं काय ? 'मॉरिस भाई'नं का केला थंड डोक्यानं खून आणि नंतर आत्महत्या...!

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.