मुंबई Aaditya Thackeray Mumbai PC : मुंबईची गेल्या दोन वर्षांमध्ये प्रचंड लूट सुरू असून कंत्राटदारांच्या माध्यमातून मुंबई लुटली जात आहे. या सर्व गैरव्यवहाराची महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर चौकशी करून संबंधितांना तुरुंगात टाकले जाईल, असा इशारा शिवसेना नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी दिला आहे. ते आज (29 जुलै) मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.
घोटाळेबाजांना तुरुंगात टाकू- ठाकरे : गेल्या दोन वर्षांमध्ये मुंबईला मोठ्या प्रमाणात लुटलं जात आहे. सर्वत्र कंत्राटदारांचे राज्य असून मुंबईत केवळ रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचा फार्स केला जात आहे. रस्त्यावरील खड्डे पोलीस बुजवत आहेत आणि कंत्राटदार मज्जा मारत आहेत अशी स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे या सर्व मुंबई महानगरपालिकेच्या पैशाची अतोनात उधळपट्टी करणाऱ्या कंत्राटदारांची आम्ही चौकशी करू. गैरकारभार असलेल्या कामांना स्थगिती देऊ आणि घोटाळेबाजांना तुरुंगात टाकू, असा इशारा आदित्य ठाकरे यांनी यावेळी दिला आहे.
महाराष्ट्रात लाडका कंत्राटदार योजना : दरम्यान, महानगरपालिकेच्या पैशाची उधळपट्टी करताना लाडक्या कंत्राटदारांचे खिसे भरले जात आहेत. गेल्या दोन वर्षांत महाराष्ट्रात लाडका कंत्राटदार ही योजना राबवली जात आहे; मात्र येत्या नोव्हेंबरमध्ये आमचे सरकार येत आहे. सरकार आल्यावर आम्ही सर्व कामांना स्थगिती देऊन चौकशी करणार असल्याचा पुनर्विचार आदित्य ठाकरे यांनी केला. वांद्रे वर्सोवा सिलिंगसाठी पावणेसात हजार कोटी रुपयांचा निधी वापरला गेला आहे. याचाही जाब विचारणार असून आम्ही आल्यानंतर दोन वर्षांत मुंबईला खड्डेमुक्त करू, असा दावाही ठाकरे यांनी केला आहे.
हेही वाचा:
- खोके सरकारनं अर्थसंकल्पात दाखवलं गाजर : आदित्य ठाकरेंची महायुती सरकारवर टीका - Aaditya Thackeray On budget
- आदित्य ठाकरे यांची कोस्टल रोड प्रकरणात चौकशी करा - आशिष शेलार यांची मागणी - Coastal Road case
- सत्तेचा गैरवापर करून झालेल्या पराभवाचे विजयात रुपांतर करू, आम्ही कोर्टात जाणार - आदित्य ठाकरे - Aditya Thackeray Mumbai PC