मुंबई : विद्यमान सरकारनं मुंबईची लूट करण्याचा कार्यक्रम सुरूच ठेवला आहे. मुंबईतील महापालिकेच्या तीन जागांचा लिलाव करण्याची घोषणा नुकतीच करण्यात आली. मात्र, आम्ही मुंबईच्या जागा विकू देणार नाही, आदानीच्या घशात जाऊ देणार नाही अशी प्रतिक्रिया, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी पत्रकार परिषदेत दिली. ते मुंबईत मातोश्री या निवासस्थानी बोलत होते.
तीन जागा अदानीच्या घशात घालण्याचा प्रयत्न : मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारीतील छत्रपती शिवाजी महाराज मंडई क्रॉफर्ड मार्केट, वरळी येथील असफाल्ट प्लांट आणि मलबार हिल येथील बेस्टचे पॉवर रिसीविंग स्टेशन हे महानगरपालिकेने लिलावात काढले आहे. महानगरपालिकेकडे पैशाची टंचाई असल्यामुळं या तीन जागा लिलावात काढून पुन्हा एकदा अदानीच्या घशात घालण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचा आरोप, आदित्य ठाकरे यांनी केलाय.
महानगरपालिकेला कंगाल करण्याचा प्रयत्न : मुंबई महानगरपालिका तोट्यात असताना, उद्धव ठाकरे यांनी मुंबई महानगरपालिकेवर शिवसेनेचा झेंडा फडकवल्यानंतर 1997 पासून आतापर्यंत मुंबई महानगरपालिका 92 हजार कोटी रुपये फायद्यात आणून तशी अनामत रक्कम ठेवली होती. मात्र गेल्या अडीच वर्षांमध्ये मुंबई महानगरपालिकेची अनामत रक्कम काढून मुंबई महानगरपालिकेला कंगाल करण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांकडून झाला आहे. म्हणूनच आज महानगरपालिकेच्या जागा विकण्याची वेळ आलीय. मात्र आम्ही मुंबई महानगरपालिकेच्या जागा विकू देणार नाही, मुंबईची आणि महाराष्ट्राची लूट होऊ देणार नाही, असा स्पष्ट इशारा ठाकरे यांनी दिला.
तीन जागा विकण्याचा घाट : मुंबईत आतापर्यंत सरकारने रस्ते घोटाळा, सॅनिटरी पार्क घोटाळा, स्ट्रीट फर्निचर घोटाळा असे अनेक घोटाळे केले आहेत. आता मुंबईच्या महत्त्वाच्या मोक्याच्या तीन जागा विकण्याचा घाट घातला आहे. मात्र, हा अत्यंत घृणास्पद प्रकार असून मुंबई महानगरपालिकेच्या या जागा आम्ही विकू देणार नाही. यांचा भ्रष्टाचार उघड करू असंही त्यांनी सांगितलं.
हेही वाचा -
- विकासकामांसंदर्भात समोरासमोर या अन् चर्चा करा, आदित्य ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना आव्हान
- 'कुठं गेलं ह्यांचं हिंदुत्व...?' भारत-बांगलादेश सामन्यापूर्वी आदित्य ठाकरेंचा केंद्र सरकारला सवाल, BCCI वरही जहरी टीका
- मुंबईच्या रस्त्यांवरील खड्ड्यांवर आणि भ्रष्ट कंत्राटदारांवर आदित्य ठाकरेंचा संताप; दिला 'हा' इशारा - Aaditya Thackeray Mumbai PC