ETV Bharat / state

मन हेलावून टाकणारी घटना! माय-लेकरांनी संपवलं जीवन; सर्वत्र हळहळ - एकाच कुटुंबातील तिघांची आत्महत्या

Solapur Suicide News : सोलापूर जिल्ह्यातून मन हेलावून टाकणारी बातमी समोर आली आहे. एकाच कुटुंबातील तिघांनी आत्महत्या केल्याची ही घटना आहे. आई आणि दोन मुलांनी गळफास घेऊन आपलं जीवन संपवलं आहे. मात्र, हे टोकाचं पाऊल त्यांनी का उचललं हे कारण अद्याप समोर आलेलं नाही.

घटनेचा पंचनामा केलेला फोटो
घटनेचा पंचनामा केलेला फोटो
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 3, 2024, 10:46 PM IST

माहिती देताना

सोलापूर Solapur Suicide News : सोलापूर शहरातील मुळेगाव रोड येथील सरवदे नगरामध्ये हे कुटुंब राहतं होतं. कामावर गेलेल्या पतीने घरी फोन केला. मात्र, त्या फोनला घरातून कोणताचं प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे ते काय झालं असंल याची खात्री करण्यासाठी घरी आले. दरम्यान, त्यांना पत्नीसह दोन्ही मुलं गळफास घेतलेल्या अवस्थेत पाहायला मिळालं. हे चित्र पाहून ते जागेवर कोसळले. त्यांनी त्या अवस्थेत एकच टाहो फोडला. त्यानंतर त्यांचे शेजारी अनेक लोक तिकडे धावले. त्याच्या मदती तिघांचा गळफास सोडून या घटनेची पोलिसांना सविस्तर माहिती देण्यात आली.

घटनेची माहिती मिळताच पोलीस धावले : या प्रकरणाची माहिती देताना पोलिसांनी सांगितलं की, स्नेहा संतोष चिल्लाळ (वय 30), संध्या संतोष चिल्लाळ (वय 11), मनोजकुमार संतोष चिल्लाळ (वय 7) असं आत्महत्या केलेल्या तिघांची नावं आहेत. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली आहे. त्यानंतर पोलिसांनी या घटनेचा कसून तपास सुरू केला आहे.

घरात कोणताही वाद नव्हता : स्नेहा चिल्लाळ यांच्यासह त्यांच्या मुलांना साडीने गळफास घेऊन आत्महत्या का केली त्याचा शोध पोलीस घेत आहेत. माध्यमांशी बोलताना आत्महत्या केलेल्या महिलेच्या पतीने सांगितलं की, घरात कोणताही वाद नव्हता. आज ते कामासाठी घरातून बाहेर पडले होते, त्यानंतर बाजार देण्यासाठी त्यांनी पुन्हा घरी फोन लावला त्यावेळी मात्र, फोन कोणीच उचलला नाही. त्यामुळे स्वतः पतीने घरी जाऊन पाहिल्यावर त्यांना घडलेला प्रकार लक्षात आला.

परिसरात सर्वत्र हळहळ : घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिसांनी तात्काळ येऊन पंचनामा केला. या ठिकाणी घरामध्ये साडीच्या साह्याने तिघांनी गळफास घेतल्याचं पती संतोष चिल्लाळ यांना निदर्शनास आल्याने त्यांनी शेजारच्यांना बोलवून हे तीनही मृतदेह खाली उतरवले. सदरचे मृतदेह सिविल हॉस्पिटल मध्ये शवविच्छेदनासाठी पाठवून देण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी पुढील कारवाई केली. दरम्यान, या घटनेनंतर परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

हेही वाचा :

1 ठरलं! महाविकास आघाडीची यादी 'या' तारखेला होणार जाहीर; 19 ते 20 जागा काँग्रेस लढवणार

2 तिहेरी हत्याकांडानं चंद्रपूर हादरलं; नराधमानं पत्नीसह केली दोन मुलींची हत्या

3 नांदेडच्या 'या' भागात भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.