ETV Bharat / state

पाण्याचा शोध आला जिवाशी; बिबट्याची मान अडकली पाण्याच्या हंड्यात, पाच तासानंतर सुखरुप सुटका - Leopard Head Stuck in Vessel

Leopard Head Stuck in Vessel : पाणी आणि भक्ष्याच्या शोधात आलेल्या मादी बिबट्याची मान पाण्याच्या हंड्यात अडकल्याची घटना साक्री तालुक्यातील धुकशेवड गाव शिवारातील गोठ्यात घडली. तब्बल पाच तासानंतर बिबट्याची सुखरुप सुटका करण्यात आली.

Dhule Leopard News
बिबट्याची मान पाण्याच्या हंड्यात अडकली
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 3, 2024, 7:06 PM IST

Updated : Mar 3, 2024, 7:16 PM IST

बिबट्याची मान अडकली पाण्याच्या हंड्यात

धुळे Leopard Head Stuck in Vessel : पाणी आणि भक्ष्याच्या शोधात आलेल्या मादी बिबट्यांची मान पाण्याच्या हंड्यात अडकल्याची घटना शनिवारी रात्री घडली. या घटनेमुळं परिसरात घबराटीचं वातावरण निर्माण झालंय. दरम्यान घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी, पशुवैद्यकीय डॉक्टर घटनास्थळी दाखल झाले होते. पाच तासांच्या प्रयत्नानंतर बिबट्याची सुखरुप सुटका करण्यात आलीये.

बिबट्याची केली सुखरुप सुटका : पशुवैद्यकीय यांनी भुलीचं इजेक्शन देवून बिबट्याला बेशुद्ध केलं. त्यानंतर हंडा काढून बिबट्याची सुखरुप सुटका करण्यात आली. त्याला पिंजऱ्यात ठेवून जंगलात सोडण्यात येणार असल्याची माहिती कोंडाईबारी वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी सविता सोनवणे यांनी दिलीय.

अशी घडली घटना : साक्री तालुक्यातील कोंडाईबारी वन क्षेत्रातील जयराम नगर पैकी धुकशेवड शिवारातील कृष्णा नारायण चौरे (रा.देवळीपाडा) यांच्या शेतात गुरांच्या वाड्यात पहाटे दोन वाजेच्या सुमारास भक्ष आणि पाण्याच्या शोधात एक मादी बिबट्या आला होता. तांब्याच्या हंड्यात पाणी असावं म्हणून त्याने मान आत घातली, मात्र, त्याची मान या हंड्यात अडकल्यामुळं तो थकला होता. त्याला पुरेसा ऑक्सिजन मिळत नव्हता. त्यानंतर तो वाड्याच्या आजूबाजूला सैरावैरा पळत सुटला होता. त्यानंतर बिबट्या हैराण होऊन दमून वाड्यात जाऊन बसला.

बिबट्याला ऑक्सिजन मिळत नव्हता : सदरील घटना पाहून शेतमालकानं पहाटे तीन वाजता वन अधिकारी सविता सोनवणे यांना फोनद्वारे माहिती दिली. त्यांनी ही बाब उपवनसंरक्षक नितीन कुमारसिंग यांना कळवून पिंजऱ्यासह वन कर्मचारी आणि वन्यजीव संस्था, पिंपळनेरचे पथक आणि पिंपळनेर पोलीस ठाण्याचे सहायक पोलील निरीक्षक सचिन कापडणीस आणि त्यांचे कर्मचारी तसेच पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना सोबत घेऊन घटनास्थळी पोहोचले.

इंजेक्शनद्वारे दिली भूल : वैद्यकीय अधिकाऱ्यांनी इंजेक्शनद्वारे भूल देऊन त्यास बेशुद्ध केलं. पिंजऱ्यामध्ये टाकून त्याला पिंपळनेर वनविभागाच्या आवारात आणलं. या ठिकाणी साक्री तालुक्याचे पशुधन आयुक्त अधिकारी डॉ.योगेश गावित, डॉ.मंगेश हेमाडे, डॉ.संदीप कोकणी, डॉ.शंकर आस्वार, डॉ.राहुल पाटील यांनी या बिबट्यास पुन्हा इंजेक्शनद्वारे भूल दिली. बिबट्यास ऑक्सिजन देण्याचा प्रयत्न केला. मात्र, बिबट्याची मान आतमध्ये अडकल्यानं ते शक्य झालं नाही.

बिबट्याची मान सुखरूप बाहेर निघाली : कारागीर मुस्ताक शेख यांनी कटरच्या मदतीनं तांब्याच्या हंड्याला दोन ते तीन ठिकाणी चरे देऊन ऑक्सिजन आत पोहोचेल अशी व्यवस्था केली. बिबट्याला ऑक्सिजन मिळताच बिबट्या सुस्थितीत आला. एकीकडं हंडा पकडून आणि एका बाजूने बिबट्याची शेपूट पकडून हंडा ओढून बिबट्याची मान सुखरूप बाहेर निघाली. पुन्हा बिबट्याला पिंजऱ्यात ठेवलं. त्याच्यावर वैद्यकीय उपचार सुरू असून त्याची तब्येत आता चांगली आहे. या एक वर्षाच्या मादी बिबट्यास सुरक्षित जंगलात सोडण्यात येणार असल्याचं वनक्षेत्रपाल अडकिने, वनाधिकारी सविता सोनवणे यांनी सांगितलं.

हेही वाचा -

  1. बापरे बिबटे वाढलेत बरं का! भारतात बिबट्यांच्या संख्येत वाढ, जाणून घ्या महाराष्ट्राचा नंबर कितवा?
  2. बिबट्याची दहशत कायम; अहमदनगरच्या अंबिका नगरमध्ये एकावर हल्ला, पाहा व्हिडिओ
  3. दुर्गापूर परिसरात मुक्तसंचार करणारा बिबट्या जेरबंद; आणखी एकाचा शोध सुरू

Last Updated : Mar 3, 2024, 7:16 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.