मुंबई Man Died Falling Into Open Drain : मुंबईतील दहिसर बोरिवली रेल्वे पुलामागील सावंत मार्गावर एक दुःखद घटना घडली आहे. या मार्गावरील उघड्या नाल्यात बुधवारी पहाटे दीड वाजताच्या सुमारास ओम प्रकाश शर्मा (65) ही व्यक्ती पडली. त्यांना तातडीनं शताब्दी रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी त्यांना पहाटे 4:15 वाजता मृत घोषित केलं. मुंबई अग्निशमन दलानं ही माहिती दिली आहे.
बातमी अपडेट होत आहे