ETV Bharat / state

नवी मुंबईत धबधब्यावर अडकलेल्या 60 हून पर्यटकांची सुटका; महापालिकेनं केलं 'हे' आवाहन - Navi Mumbai Rain

Navi Mumbai Rain : नवी मुंबई येथील दुर्गा मातानगरमधील धबधब्याच्या परिसरात अडकलेल्या 60 हून अधिक पर्यटकांना अग्निशमन दल तसंच महापालिकेच्या आपत्कालीन यंत्रणेनं सुखरुप बाहेर काढलं आहे.

Navi Mumbai Rain
धबधब्यावर अडकलेल्या 60 हून पर्यटकांची सुटका (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 21, 2024, 10:25 PM IST

नवी मुंबई Navi Mumbai Rain : नवी मुंबई येथील दुर्गा मातानगरमधील धबधब्याच्या परिसरात 60 हून अधिक पर्यटक अडकल्याची माहिती नवी मुंबई महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षास मिळाली. त्यानंतर अग्निशमन व आपत्कालीन यंत्रणेला पोलीसांसह मदतकार्यासाठी पाठवत आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी स्वत: घटनास्थळी भेट दिली. याठिकाणी अडकलेल्या सर्व नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलं. अशाचप्रकारे पावणे एमआयडीसी परिसरात अडकलेल्या दोन नागरिकांचीही महानगरपालिकेच्या अग्निशमन दलानं पोलीसांच्या मदतीनं सुरक्षितपणे सुटका केली आहे.

धबधब्यावर अडकलेल्या 60 हून पर्यटकांची सुटका (ETV Bharat Reporter)

मदतकार्य यंत्रणेस आपल्या क्षेत्रात सज्ज राहण्याचे आदेश : नवी मुंबई शहर समुद्रसपाटीच्या खाली वसलेलं असल्यानं उधाण भरतीची वेळी मुसळधार पाऊस असल्यास शहराच्या काही भागात पाणी साचतं, याची दखल घेत महानगरपालिकेच्या मदतकार्य यंत्रणेस आपल्या क्षेत्रात सज्ज राहण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले. रविवारी दुपारी 12.10 वाजता 4.44 मीटर इतकी उधाण भरती होती व त्याचवेळी पाऊस संततधार कोसळत होता.

किती पर्जन्यवृष्टी : 21 जुलै रोजी सकाळी 8.30 ते सायं. 5.30 वाजेपर्यंत नवी मुंबईत सरासरी 95.88 मिमी पावसाची नोंद झाली असून, बेलापूर विभागात 145.00 मिमी, नेरुळ विभागात 92.05 मिमी, वाशी विभागात 119.80 मिमी, कोपरखैरणे विभागात 130.95 मिमी, ऐरोली विभागात 39.80 मिमी, दिघा विभागात 47.70 मिमी पावसाची नोंद झाली आहे. हे पर्जन्यमान मागील 3 दिवसांपासून मोठं असून 20 जुलै रोजी सकाळी 8.30 ते 21 जुलै रोजी सकाळी 8.30 वाजेपर्यंत 85.87 मिमी, 19 जुलै रोजी सकाळी 8.30 ते 20 जुलै रोजी सकाळी 8.30 वाजेपर्यंत 75.17 मिमी पर्जन्यवृष्टी झाली. या पावसाळी कालावधीत नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात 21 जुलै रोजी सायंकाळी 5.30 पर्यंत एकूण 1273.26 मिमी इतकी पर्जन्यवृष्टी नोंद झालेली आहे.

मनपाचं आवाहन : हवामान खात्याकडून देण्यात आलेली अतिवृष्टीची शक्यता लक्षात घेऊन नागरिकांनी महत्वाच्या कामाव्यतिरिक्त घराबाहेर पडू नये. अतिमहत्त्वाचं काम असल्यासच घराबाहेर पडावं. तसंच पुढील 3 दिवस 4.5 मीटरपेक्षा जास्त क्षमतेची उधाण भरती असल्यानं व नवी मुंबई शहर समुद्रसपाटीपासून खालच्या भागात असल्यामुळं त्याच काळात मुसळधार पर्जन्यवृष्टी झाल्यास काही सखल भागात पाणी साचण्याची शक्यता आहे. तरी नागरिकांनी अतिवृष्टीच्या काळात सतर्क राहून सहकार्य करावं व अडचणीच्या काळात काही मदतीची आवश्यकता असल्यास नवी मुंबई महानगरपालिकेच्या नजिकच्या विभाग कार्यालयाशी संपर्क साधावा, असं आवाहन महापालिकेचे आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी केलं आहे.

हेही वाचा :

  1. कोल्हापुरात पुन्हा पूरस्थिती? पंचगंगेच्या इशारा पातळीच्या स्पर्शाला केवळ 2 फूट पाणी शिल्लक - Kolhapur Flood Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.