ETV Bharat / state

पीएमओ कार्यालयात सल्लागार असल्याचं सांगून 50 लाखाची फसवणूक; पुण्यातील धक्कादायक प्रकार - Pune Fraud News

Pune Fraud News : पुण्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पंतप्रधान कार्यालयात राष्ट्रीय सल्लागार असल्याचं सांगत एका महिलेनं तब्बल 50 लाख रुपयांची फसवणूक केली आहे.

Etv Bharat
Etv Bharat (Etv Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 18, 2024, 1:19 PM IST

पुणे Pune Fraud News : आज पर्यंत आपण अनेक प्रकरणात वेगवेगळ्या पद्धतीनं फसवणूक झाल्याच्या घटना घडल्या आहेत. पुण्यातील विधानभवन परिसरात तर चक्क पंतप्रधान कार्यालयात राष्ट्रीय सल्लागार असल्याचं सांगून टेंडर मिळवून देण्याचं आमिष दाखवत एका व्यक्तीची 50 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी एका महिलेसह दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दोघांवर गुन्हा दाखल : या प्रकरणी पोलिसांनी बंडगार्डन पोलीस स्टेशनमध्ये काश्मीरा संदीप पवार (वय 29, रा. प्लॉट नंबर 14, कोयना सोसायटी, सदर बाजार सातारा) आणि गणेश गायकवाड (रा. सातारा) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर गोरख जगन्नाथ मरळ (वय 49, रा. पुणे) यांनी याबाबत तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणात शासनाचं टेंडर मिळवून देण्याचं आमिष दाखवून आरोपींनी फसवणूक केली आहे.

बनावट कागदपत्राच्या आधारे फसवणूक : याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार आणि आरोपींची काही निमित्तानं ओळख झाली होती. यानंतर आरोपी कश्मीरा पवार यांनी तक्रारदारला त्या स्वतः पंतप्रधान कार्यालयात राष्ट्रीय सल्लागार म्हणून कार्यरत असल्याचं सांगितलं. शासकीय टेंडर मिळवून देतो, अशी बतावणीसुद्धा कश्मीरानं केली. विश्वास संपादित व्हावा म्हणून आरोपींनी फिर्यादीला थेट पुण्यातील विधान भवनात भेटण्यासाठी बोलावलं तसंच त्यांच्या व्हाट्सअपवर शासकीय टेंडरची बनावट कागदपत्रंसुद्धा पाठवली.

टेंडर मिळवल्यानंतर पैसे कमवता येतील या भावनेतून तक्रारदारला विश्वास बसला. टेंडर मिळवायचं असेल तर पैसे भरावे लागतील, असं सांगून आरोपींनी वेळोवेळी तक्रारदाराकडून रोख स्वरूपात तसंच आरटीजीएस द्वारे 50 लाख रुपये उकळले. एवढी मोठी रक्कम देऊनसुद्धा टेंडर मिळत नाही आणि आपली फसवणूक झाली आहे हे लक्षात येताच फिर्यादीनं पोलीस स्टेशन गाठलं आणि तक्रार दिली. या प्रकरणात बंडगार्डन पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरीक्षक गावडे अधिक तपास करत आहेत.

हेही वाचा

  1. अनधिकृत फूड स्टॉल्स बृहन्मुंबई महापालिकेच्या रडारवर; तीन विशेष पथकं आजपासून करणार तपासणी - Mumbai Illegal Food Stalls
  2. महागडे लॅपटॉपसह मोबाईल चोरणाऱ्या आंध्रातील दोन भावंडांना अटक, ३१ लाखांचा मुद्देमाल जप्त - Pune Crime News
  3. एअर इंडियाकडून देण्यात येणाऱ्या जेवणात आढळलं ब्लेड, प्रशासनानं मागितली माफी - Air India Flight
  4. मित्र रिल्ससाठी शूट करताना तरुणीनं चुकून टाकला रिव्हर्स गिअर, दरीत कार कोसळल्यानंतर गमाविलं आयुष्य - Chhatrapati Sambhajinagar Accident

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.