नागपूर : राज्यात हिट अँड रनच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. अशीच आणखी एक घटना नागपुरात घडली आहे. शनिवारी एका अल्पवयीन मुलानं रस्त्याच्या कडेला असलेल्या स्टॉलला जोरदार धडक दिलीय. ज्यात सुमारे पाच जण जखमी झाले. ही घटना परिसरात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, या भीषण घटनेचा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाला आहे.
अल्पवयीन तरुणासह कार चालक ताब्यात : नागपूर शहरातील नंदनवन परिसरात बेलगाम भरधाव कारनं 5 जणांना धडक दिली. या घटनेत जखमींपैकी दोघांची तब्येत चिंताजनक असल्याची माहिती पुढं आली आहे. महत्वाचं म्हणजे अपघातासाठी जबाबदार कार चालक अल्पवयीन असून तो गॅरेजमध्ये काम शिकत आहे. पोलिसांनी अल्पवयीन तरुणाला ताब्यात घेतलं आहे. तर अपघातातील सर्वचं जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेची माहिती समजताचं नंदनवन पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पोपट धायतोंडेसह पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. कार चालवत असलेला ताब्यात घेत, सर्व जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
चालकानं ब्रेक ऐवजी एक्सलेटरवर ठेवला पाय : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या ठिकाणी ही घटना घडली, तिथं शेजारीच कार दुरूस्तीचं गॅरेज आहे. गॅरेज मालकानं मंगेश नामक एका कर्मचाऱ्यांला कार पार्क करण्यासाठी सांगितलं होतं. तो मुलगा शिकाऊ असल्यानं त्यानं पाय ब्रेकवर ठेवण्याऐवजी एक्सलेटर ठेवला. त्यामुळं गाडी सुसाट सुटली, तेव्हा स्त्याच्या कडेला असलेल्या भाजी विक्रेत्यांना गाडीनं जोराची धडक दिली. त्यानंतर कार एका झाडाला जाऊन धडकली. या अपघातात पाच लोकं जखमी झाले असून जखमींना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तर कार चालक मुलासह गॅरेज मालकाला ताब्यात घेण्यात आलं आहे.
'हे' वाचलंत का :
- पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीची तत्काळ मुक्तता करावी; मुंबई उच्च न्यायालयात याचिका - Porsche Car Accident Case
- ‘तिला आतमध्ये घ्या’ म्हणत पुण्यातील पोलीस ठाण्यात महिलेला दिली थर्ड डिग्री, पोलीस उपनिरीक्षकासह 8 जणांवर गुन्हा - Third degree to woman
- ऑनलाईन जुगारात तरुण कर्जबाजारी; कर्ज फेडण्यासाठी केला वृद्ध महिलेचा खून - Thane Murder Case