ETV Bharat / state

मुंबईच्या आइस्क्रिमची चवच न्यारी! जगात भारी १०० आइस्क्रिमच्या यादीत मुंबईतल्या ३ तर भारतातील ५ आइस्क्रिमचा समावेश - TOP 100 TESTY ICE CREAMS

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 25, 2024, 3:54 PM IST

Updated : Jul 26, 2024, 5:33 PM IST

TOP 100 TESTY ICE CREAMS - जगात भारी १०० आइसस्क्रिमची यादी फूड गाइड टेस्ट ॲटलसने नुकतीच जाहीर केलीय. यामध्ये जगातील १०० सर्वात जास्त लोकप्रिय आइस्क्रिमचा सर्व्हे करुन त्यांचा समावेश करण्यात आलाय. या यादीत भारतातील पाच आइस्क्रिमचा समावेश आहे. विशेष म्हणजे कोणत्याही प्रतिथयश ब्रँडच्या आइस्क्रिमचा यामध्ये समावेश नाही. पाहूयात ही कोणती आइस्क्रिम आहेत.

आइस्क्रिम
मुंबईतील जगप्रसिद्ध आइस्क्रिम (ETV Bharat Reporter)

मुंबई TOP 100 TESTY ICE CREAMS : आइस्क्रिम खायला कुणाला आवडत नाही? काही अपवाद वगळले तर सगळ्यांनाच आइस्क्रिम खायला आवडतं. आपण कधी-कधी म्हणतो की आमच्या गावातल्या या आइस्क्रिमवाल्याचं आइस्क्रिम जगात भारी आहे. काय चव असते म्हणून सांगतो... अशी बढाई मारणारे आइस्क्रिम शौकीन आपल्याला प्रत्येक गावात दिसून येतील. या आइस्क्रिम प्रेमींना आइस्क्रिम खायला उन्हाळ्याची वाट पाहावी लागत नाही. ते कोणत्याही सिझनमध्ये आइस्क्रिम खायला तयार असतात. अगदी थंडीचे दिवस असो किंवा पावसाळा... भर पावसात चहा आणि भजी खाण्यात जी मजा आहे, तीच किंवा त्यापेक्षा जास्त मजा भार पावसात आइस्क्रिम खाऊन या शौकीनांना मिळते. त्यामुळे बाहेर पाऊस सुरू असताना आइस्क्रिम पार्लरमध्ये मलईदार कोन-कुल्फी किंवा स्कूपवर ताव मारताना शौकीन तुम्हाला दिसतील. पण शौकीनांचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ते त्यांना आवडणारी गोष्ट सर्वाधिक चांगली कुठे मिळते ते शोधत असतात. असाच जगात भारी १०० आइस्क्रिमचा शोध लावण्यात आलाय. त्यामध्ये भारतातील पाच आइस्क्रिमची निवड करण्यात आलीय.

मुंबईतील जगप्रसिद्ध आइस्क्रिमची माहिती देताना ग्राहक आणि कर्मचारी (ETV Bharat reporter)

जगात भारी आइस्क्रिम म्हटल्यावर तुमच्या डोळ्यापुढे भारतातील काही नामवंत ब्रँडची नावं आली असतील. साहजिकच आहे म्हणा. उन्हाळ्याच्या तोंडावर अशी काही जाहिरात या आइस्क्रिम कंपन्या करतात की, ते पाहूनच तोंडाला पाणी सुटतं. पण थांबा जरा... जाहिरातबाजी करणाऱ्या भारतातील कोणत्याच ब्रँडचा समावेश जगात भारी आइस्क्रिमच्या यादीत नाही. सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे आपल्या गावातच जसं एखादा आइस्क्रिमवाला असतो ना, तशीच ही सर्वोत्तम आइस्क्रिम आहेत. यामध्ये भारतातील ५ आइस्क्रिमचा समावेश आहे. त्यात तब्बल ३ आइस्क्रिम मुंबईतील आहेत.

आता आपली उत्सुकता चांगलीच ताणली गेली असेल. तर वेळ न लावता या आइस्क्रिमबद्दल जाणून घेऊया...

PABBA आइस्क्रिम पार्लरची Gadbad आइस्क्रिम - यातलं पहिलं आहे PABBA या आइस्क्रिम पार्लरमधील Gadbad आइस्क्रिम. कर्नाटकातील मंगळुरूमध्ये PABBA आइस्क्रिम पार्लर आहे. या आइस्क्रिम पार्लरमधील अप्रतिम आइस्क्रिम तयार करतात. यामध्ये ताज्या फळांच्याबरोबरच काजु-पिस्ते-बदाम अशा सुख्यामेव्याचाही वापर करण्यात येतो. एवढंच नाही तर जेली आणि विशिष्ठ सरबतातून हे आइस्क्रिम सर्व केलं जातं. तीन वेगवेगळ्या फ्लेवरचं हे आइस्क्रिम मिळतं. त्यामुळे याची गोडी आणि चव अशी काही असते की 'जिसका नाम वो च...! असे उद्गार आपसुकच आपल्या तोंडातून बाहेर पडतात.

टेंडर कोकोनटआइस्क्रिम - भारतातील उत्कृष्ट आइस्क्रिमच्या यादीत दुसरं नाव आहे, मुंबईतील 'नॅचरल्स' चं. येथील शहाळ्याच्या चवीचं आइस्क्रिम जगात भारी म्हणायला पाहिजे. मलाईदार ‘टेंडर कोकोनट’आइस्क्रिमची चव अफलातून आनंद देऊन जाते. त्यातील नैसर्गिक चव अप्रतिम अशीच आहे. या आइस्क्रिमला खास चव देण्यासाठी ताज्या फळांचा वापर केला जातो.

आंबा सँडविच आइस्क्रिम - यानंतर नंबर लागतो मुंबईतील के. रुस्तम आणि कंपनीच्या आइस्क्रिमचा. यांचं आंबा सँडविच आइस्क्रिम जगात भारी आइस्क्रिम असल्याचं सर्व्हेमध्ये म्हटलं आहे. अर्थातच आंबा हे फळच असं आहे की अबालवृद्धांना आवडतं. त्याचं अप्रतिम आइस्क्रिम खायला मिळणं म्हणजे अगदी सुख... के रुस्तम यांचं हे आइस्क्रिम वेफर बिस्किटमधून अशा पद्धतीनं सँडविचसारखं सर्व्ह केलं जातं की त्याची मजा द्विगुणीत होते.

डेथ बाय चॉकलेट - मुंबईबरोबरच कर्नाटकची राजधानी बंगळुरूमधील कॉर्नर हाऊस हे आइस्क्रिम पार्लर असंच प्रसिद्ध आहे. येथील 'डेथ बाय चॉकलेट' या फ्लेवरचं आइस्क्रिम अप्रतिम असंच आहे. त्यामुळे त्याचाही नंबर पहिल्या १०० आइस्क्रिममध्ये लागतो. बंगळुरूमधील कॉर्नर हाऊसचं हे ‘डेथ बाय चॉकलेट’ आइस्क्रिम खूपच लोकप्रिय आहे. या आइस्क्रीममध्ये केक, चॉकलेट सॉसबरोबरच सुक्या मेव्याचाही समावेश असतो. वर चेरी टाकल्यानं त्याला वेगळीच चव येते.

पेरूच्या चवीचं आइस्क्रम - जगात भारी आइस्क्रिमच्या यादीत मुंबईच्या आणखी एका आइस्क्रिमचा समावेश होतो. मुंबईच्या अप्सरा आइस्क्रिम पार्लरमधील पेरूच्या चवीचं आइस्क्रम अप्रतिम आहे. या आइस्क्रिममध्ये पिकलेल्या पेरूचा वापर करण्यात येतो. त्यावर मीठ मिरचीचा मसाला टाकून अशी काही चव आणली जाते की ला जवाब... पेरूचे कापही या आइस्क्रिममध्ये असतात. त्यामुळे या आइस्क्रिमला चार चांद लागतात.

फूड गाइड टेस्ट ॲटलसने जगातील १०० सर्वाधिक लोकप्रिय आइस्क्रीमची यादी प्रसिद्ध केली आहे. या यादीत भारतातील पाच आइसक्रीम ब्रँडचा समावेश आहे.

Last Updated : Jul 26, 2024, 5:33 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.