ETV Bharat / state

२२ वर्षीय तरुणीवर अत्याचार करून निर्घृण खून; नातेवाईकांचा 'लव्ह जिहाद'चा आरोप - Girl Murder Case Uran - GIRL MURDER CASE URAN

Girl Murder Case Uran : 25 जुलै पासून बेपत्ता झालेल्या एका 22 वर्षीय तरुणीचा मृतदेह उरण शहरात बेवारस अवस्थेत आढळून आलाय. यामध्ये प्रेम प्रकरणातून अत्याचारानंतर ही हत्या झाल्याचा संशय आहे. तरुणीच्या नातेवाईकांनी याला 'लव्ह जिहाद'चा रंग देण्याचा प्रयत्न केलाय. सोबतच मारेकऱ्याला अटक करण्याची मागणी लावून धरलीय.

Girl Murder Case Uran
प्रातिनिधक चित्र (File Photo)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 27, 2024, 5:53 PM IST

Updated : Jul 28, 2024, 6:19 PM IST

उरण (नवी मुंबई) Girl Murder Case Uran : नवी मुंबईतील विवाहितेच्या शीळ डायघर परिसरातील खून प्रकरणाची घटना ताजी असतानाच आता नवी मुंबईतील उरणमध्ये देखील धक्कादायक प्रकार घडला आहे. गुरुवारपासून बेपत्ता असलेल्या २२ वर्षीय तरुणीचा मृतदेह उरण शहरात आढळून आला आहे. संबंधित तरुणीची प्रेम प्रकरणातून हत्या झाल्याचा पोलिसांनी संशय व्यक्त केला आहे.

तरुणी होती बेपत्ता : मृत तरुणी उरण शहरात राहात होती. संबधित तरुणी गुरुवार (25 जुलै) पासून बेपत्ता होती. आज शनिवारी दिनांक २७ तारखेला संबंधित तरुणीचा मृतदेह पहाटेच्या सुमारास उरण रेल्वे स्थानकासमोर असणाऱ्या खाडीजवळ आढळून आला.

क्रूरतेने केली तरुणीची हत्या : संबंधित तरुणीच्या मृतदेहाच्या गुप्तांगावर वार केल्याच्या खुणा आढळून आल्या. संबंधित तरुणीची हत्या अत्यंत क्रूरतेनं केल्याचं समोर येत आहे.

तरुणीचा मृतदेह पोलिसांच्या ताब्यात : उरण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तरुणीचा छिन्नविच्छिन्न अवस्थेतील मृतदेह ताब्यात घेतला. यानंतर तो शवविच्छेदनासाठी उरण येथील इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला असल्याची माहिती उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कोते यांनी दिली आहे.

प्रेमप्रकरणातून खून झाल्याचा आरोप : संबंधित तरुणीचा प्रेम प्रकरणातून खून झाला असल्याचा आरोप तरुणीच्या नातेवाईकांनी केला आहे. आरोपी तरुण दुसऱ्या समुदायातील असल्याचं नातेवाईक सांगत आहेत. संबंधित आरोपीचा शोध घेऊन लवकरात लवकर त्याला फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी तरुणीचे पालक आणि नातेवाईक मंडळी करीत आहेत. नातेवाईकांनी घटनेला 'लव्ह जिहाद'चा रंग देण्याचाही प्रयत्न केला. या घटनेची माहिती उरण शहरातील नागरिकांना मिळताच नागरिकांचा उद्रेक पाहायला मिळाला. या प्रकरणी नागरिकांनी आरोपीला लवकरात लवकर बेड्या ठोकून अटक करावी याची मागणी केली.

हेही वाचा:

  1. Love Jihad : क्लासच्या नावाखाली अहमदनगर जिल्ह्यात लव जिहादचे रॅकेट; विधानपरिषदेत मुद्दा गाजला
  2. Tunisha Sharma : तुनिषा शर्मा आत्महत्या प्रकरण, राम कदम यांची लव जिहाद अँगलने तपास करण्याची मागणी
  3. Love Jihad And Rape : हिंदू तरुणीवर बलात्कारासाठी 'शाकीब' झाला 'शिवा'; आता धर्मांतरणासाठी करतोय मारझोड

Last Updated : Jul 28, 2024, 6:19 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.