ETV Bharat / state

विशाळगड हिंसाचार प्रकरण; 21 जण ताब्यात तर 500 ते 600 जणांवर गुन्हे दाखल, संभाजीराजेंबाबत पोलिसांचं मौन - Vishalgarh Violence Case - VISHALGARH VIOLENCE CASE

Vishalgarh Violence Case : कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगडावरील अतिक्रमणाविरुद्ध संभाजीराजे छत्रपती यांनी केलेल्या आंदोलनादरम्यान काही जणांनी तेथील घरांची तोडफोड केली. याप्रकरणी 21 जणांना पोलिसांनी ताब्यात घेऊन 500 ते 600 जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले गेले. यामुळे संभाजीराजे छत्रपती आक्रमक झाले असून त्यांनी शाहूवाडी पोलीस ठाण्यात ठिय्या मांडला आहे. कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हे दाखल झाले असले तरी संभाजीराजेंविरुद्ध कारवाई करण्याबाबत पोलिसांनी मौन बाळगले आहे.

Vishalgarh Violence Case
पोलीस अधिकारी आणि संभाजी राजे (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 15, 2024, 9:19 PM IST

Updated : Jul 15, 2024, 9:33 PM IST

कोल्हापूर Vishalgarh Violence Case : विशाळगडावरील तोडफोड प्रकरणी शाहूवाडी पोलिसांनी 21 जणांना ताब्यात घेतल्यानंतर माजी खासदार संभाजीराजे छत्रपती आक्रमक झाले होते. त्यांनी तात्काळ शाहूवाडी पोलीस ठाण्यात जाऊन पोलिसांना याबाबत जाब विचारला. शिवभक्तांवर गुन्हे दाखल करण्याआधी माझ्यावर गुन्हा दाखल करा, अशी भूमिका घेत सुमारे तीन तास पोलीस ठाण्यात संभाजीराजेंनी ठाण मांडलं; मात्र पोलिसांनी संभाजी राजेंवर कारवाई प्रकरणी कोणतीही भूमिका न घेता मौन बाळगलं. विशाळगड प्रकरणी आतापर्यंत विविध चार प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये 500 ते 600 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून संशयितांच्या तपासासाठी आठ पथके रवाना करण्यात आली आहेत, अशी माहिती अतिरिक्त पोलीस अधीक्षक खाटमोडे पाटील यांनी दिली.

विशाळगड हिंसाचार प्रकरणी करण्यात आलेल्या कारवाई प्रकरणी माहिती देताना पोलीस अधिकारी (ETV Bharat Reporter)

संभाजीराज्यांच्या भूमिकेमुळे पोलिसांची पंचाईत : रविवारी विशाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या गजापूर गावात झालेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागलं. त्याचे पडसाद आज कोल्हापुरात उमटले. अनेक संघटनांनी विशाळगड अतिक्रमण मुक्त करण्याच्या मोहिमेमागून जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या संघटनांविरोधात आंदोलने, निदर्शने केली. तर स्वराज्य पक्षाचे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी थेट शाहूवाडी पोलीस ठाण्यात जाऊन आंदोलनकर्त्यांवर गुन्हे दाखल झाल्याबद्दल जाब विचारला. आधी माझ्यावर गुन्हे दाखल करा. याशिवाय पोलीस ठाण्यातून हलणार नाही अशी भूमिका घेतली. यामुळे पोलीस प्रशासनाची पंचाईत झाली. संभाजीराजेंवर करण्यात येणाऱ्या कारवाईबद्दल पोलिसांनी ही कोणतीही प्रतिक्रिया यावेळी व्यक्त केली नाही.

अतिक्रमण काढण्याच्या मोहिमेला सुरुवात : किल्ले विशाळगडावरील 158 एकूण अतिक्रमणा पैकी आज जिल्हा प्रशासनाकडून 30 अतिक्रमणे हटवण्यात आली आहेत. तर उर्वरित अतिक्रमणही हटवण्याची मोहीम सुरू आहे. विशाळगडावरील अतिक्रमण हटवताना पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यासह रविवारी जमावाकडून तोडफोड झालेल्या घरांचे पंचनामे सुरू करण्यात आले आहेत. अतिक्रमण हटवताना जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. विशाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या गजापूर पैकी मुसलमानवाडीत खासदार शाहू महाराज उद्या पाहणी करणार आहेत.

जिल्हा पोलीस अधीक्षकांची बदली करा : कोल्हापूर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था ढासली असून याला जबाबदार असलेले जिल्हा पोलीस प्रमुख महेंद्र पंडित यांची तातडीने बदली करावी, अशी मागणी काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी केली आहे. कोल्हापूर राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या पुरोगामी विचाराचे शहर म्हणून ओळखले जाते. अशा घटना कोल्हापूरची बदनामी करत आहेत, असंही आमदार पाटील यावेळी म्हणाले.

हेही वाचा:

  1. विशाळगड अतिक्रमण मुद्दा; हसन मुश्रीफांनी मला पुरोगामीत्व शिकवू नये, संभाजीराजेंनी पिळले कान - Sambhaji Raje Warns Hasan Mushrif
  2. विशाळगड अतिक्रमणमुक्त मोहिमेला हिंसक वळण, जमावाकडून घरांची तोडफोड - Vishalgad Encroachment issue
  3. Vishalgarh Encroachment: विशाळगड येथे दुसऱ्या दिवशी सुद्धा अतिक्रमण काढण्याचे काम सुरू

Last Updated : Jul 15, 2024, 9:33 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.