ETV Bharat / state

१५ वर्षीय प्रेयसीवर १९ वर्षीय प्रियकराचा बळजबरीने बलात्कार; दगाबाज प्रियकराला अटक - RAPE

ठाणे जिल्ह्यात पुन्हा एकदा अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्यात आलाय. नराधम आरोपी हा तिचाच प्रियकर असल्याचं स्पष्ट झालय. वाचा सविस्तर...

प्रातिनिधिक चित्र
प्रातिनिधिक चित्र (Etv Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 22, 2024, 2:13 PM IST

ठाणे : एका १९ वर्षीय प्रियकरानं १५ वर्षीय प्रेयसीला लग्नाचं आमिष दाखवून बहाण्यानं स्वतःच्या घरी नेलं. त्यानंतर अल्पवीयन प्रेयसीशी शारीरिक संबंधास तगादा करत असतानाच, पीडित प्रेयसीनं संबंधास नकार दिला. मात्र नकार देवूनही दगाबाज प्रियकरानं प्रेयसीवर बळजबरीनं बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना भिवंडी शहरानजीक असलेल्या एका गावातील इमारतीच्या पाठीमागे घडली. याप्रकरणी अल्पवीयन प्रेयसीच्या फिर्यादीवरून प्रियकरावर नारपोली पोलीस ठाण्यात अत्याचारासह पोक्सोन्वये गुन्हा दाखल करण्यात आला तसंच पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.

प्रेयसीला लग्नाचं आमिष - पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्पवीयन पीडित प्रेयसी भिवंडी तालुक्यातील काल्हेर येथील एका सोसायटीत राहात आहे. तर ती राहत असलेल्या परिसरात दुसऱ्या सोसायटीत दगाबाज प्रियकर राहात आहे. त्यातच एकाच भागात राहात असल्यानं दोघांची ओळख झाली. या ओळखीतून दोघांमध्ये ऑगस्ट २०२४ मध्ये जवळीक निर्माण होऊन प्रेमसंबंध जुळून आले. त्यानंतर प्रेमसंबंधातून आरोपी प्रियकरानं पीडित प्रेयसीला लग्नाचं आमिष दाखवून शारीरिक सुखाची मागणी केली. मात्र पीडित प्रेयसीनं त्यास नकार दिला. त्यानंतर पीडित प्रेयसीला आरोपी प्रियकरानं त्याच्या घरी बोलावून प्रेयसीवर इच्छेविरुद्ध जबरीनं बलात्कार केला.

आरोपीला ठोकल्या बेड्या - आता याप्रकरणी पीडितेच्या फिर्यादीवरून प्रथम दादर रेल्वे पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर २१ ऑक्टोबर रोजी सदर गुन्हा ००/२४ नंबरने भिवंडीतील नारपोली पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात येवून दगाबाज प्रियकराच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम ६४ (१) , ६५ (१) सह पोक्सो कलम १२, ४, ८, कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर पोलिसांनी घटनेचं गांभीर्य ओळखून काही तासातच सोमवारी रात्रीच्या सुमारास प्रियकराला ताब्यात घेऊन अटक केली आहे. अटक आरोपीला आज न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस ठाण्यातुन देण्यात आली. या गुन्ह्याचा पुढील तपास साहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश वाडणे करीत आहेत.

हेही वाचा...

  1. घर मालकाचा घरात घुसून अल्पवयीन मुलीवर बलात्कार; नराधम अटकेत
  2. एयर होस्टेस बनायचं स्वप्न भंगलं : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या तरुणीवर सपा नेत्याचा बलात्कार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.