ETV Bharat / state

सलमान खानला युट्यूबवरून धमकी देणाऱ्या आरोपीकडे सापडले 19 इमेल - Salman Khan Threaten Case

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 18, 2024, 10:48 PM IST

Salman Khan Threaten Case : सलमान खानला (Salman Khan) गेल्या काही दिवसांपासून सतत जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. 16 जून रोजी पुन्हा एकदा यु ट्यूबवरून व्हिडीओ तयार करून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. याप्रकरणी राजस्थानहून एका व्यक्तीला अटक केली असून पोलीस चौकशीत आरोपीकडं 19 ईमेल आयडी सापडल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Salman Khan Threaten Case
सलमान खान धमकी प्रकरण (ETV Bharat Reporter)

मुंबई Salman Khan Threaten Case : अभिनेता सलमान खानला (Salman Khan) यु ट्यूबवरून धमकी देणाऱ्या आरोपी बनवारीलाल गुजरला किल्ला कोर्टाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपी बनवारीलाल गुजरच्या पोलीस चौकशीत 19 ईमेल आयडी आणि एक बँक अकाउंट सापडले आहे. त्याचा तपास करण्यासाठी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दुसऱ्या रिमांडच्यावेळी पोलीस कोठडी मागितली आहे.

आरोपीकडे सापडले 19 ईमेल : मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने आरोपी बनवारीलाल गुजरकडं सापडलेल्या 19 ईमेल आयडीचा तपास करण्यासाठी गुगलकडं धाव घेतल्याची माहिती, पोलिसांनी कोर्टात दिली आहे. तसेच बनवारीलालच्या बँक खात्याची देखील चौकशी करायची असल्याचं पोलिसांनी कोर्टात सांगितलं. मात्र, आरोपीच्या वकिलांनी माहिती आणि तंत्रज्ञान अधिनियम कलम 66 ब हे नॉन बेलेबल कलम असून ते केवळ आरोपीची कस्टडी मिळावी म्हणून चुकीच्या पद्धतीनं लावण्यात आल्याचा युक्तिवाद कोर्टात केला. त्याचप्रमाणं भारतीय दंड संविधान कलम 506 (2) हे देखील चुकीच्या पद्धतीनं पोलिसांनी एफआयआरमध्ये लावले असल्याचं आरोपीच्या वकिलानं युक्तिवाद केला.

काय आहे घटना : आरोपी बनवारीलालने केवळ अरे छोडो यार या आपल्या यु ट्यूब चॅनेलवर सलमान खानला धमकावून प्रसिद्धी मिळवण्याच्या हेतूने हा स्टंट केला होता. आता हे यु ट्यूब चॅनेल देखील बंद करण्यात आले आहे. मात्र, आरोपी बनवारीलाल गुजर हा बीएचं शिक्षण घेत असून त्याने 19 ईमेल आयडी का बनवले होते? याचा पोलीस तपास करणार आहेत. राजस्थानच्या बुंदी जिल्ह्यातील फाजलपुरा, बोर्डा गावचा रहिवासी असलेल्या गुजरने येथील एका द्रुतगती महामार्गावर सलमान खानला जीवे ठार मारण्याची धमकी देणारा व्हिडिओ बनवला होता. यात त्याने कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई आणि गोल्डी ब्रार यांच्या नावांचा उल्लेख केला होता. हा व्हिडीओ त्याने त्याच्या 'अरे छोड यार' या यूट्यूब चॅनलवर अपलोड केला होता.

आरोपीला राजस्थानमधून घेतलं ताब्यात : गुन्हे शाखेकडं याबाबत तक्रार येताच दक्षिण सायबर पोलिसांनी भादवि कलम ५०६(२), ५०४ आणि ३४ यासह माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६६ (ड) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. तसेच गुजरला राजस्थानमधून ताब्यात घेत बेड्या ठोकल्या आहेत. गुजरकडं केलेल्या चौकशीत आणि त्याच्याकडून जप्त करण्यात आलेल्या मोबाईलच्या तपासणीत तो वेगवेगळे 19 ईमेल आयडी वापरत असल्याचं उघड झालंय.

हेही वाचा -

Salman Khan Threaten Case : सलमान खानला जीवे मारण्याची धमकी देणारा अटकेत, मुंबई पोलिसांची कारवाई

Thieves Arrested in Bageshwar Dham Program: धीरेंद्र कृष्ण शास्त्रींच्या कार्यक्रमात शिरले चोर; पोलिसांनी बेदम चोपले

Salman Khan Threat Case : सलमान खान धमकी प्रकरण गुन्हे शाखेकडे वर्ग

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.