सातारा Gaur On Kas Plateau : साताऱ्यापासून पश्चिमेकडं 15 किलोमीटर अंतरावर असलेल्या कास पठारावरील फुलांचा हंगाम सध्या बहरात आहे. या फुलोत्सवाचा आनंद लुटण्यासाठी आलेल्या पर्यटकांची गुरुवारी पळता भुई थोडी झाली. तब्बल 17 रानगव्यांच्या कळपानं कास पठार परिसरात फेरफटका मारला. रानगव्यांच्या दर्शनानं पर्यटकांमध्ये भिंतीचं वातावरण निर्माण झालं. काही हादरलेल्या पर्यटकांनी जीव मुठीत घेऊन कास पठारावरुन धूम ठोकली.
एकाचवेळी 17 रानगव्यांचं दर्शन : कास पठारावर सध्या फुलांचा हंगाम बहरात आहे. रोज हजारो पर्यटक पठारावर येऊन फुलोत्सवाचा आनंद लुटत आहेत. गुरुवारी देखील पर्यटकांची मोठी गर्दी होती. अशातच एकावेळी तब्बल 17 रानगव्यांची एन्ट्री झाली आणि पर्यटकांची भंबेरी उडाली. रानगव्यांच्या कळपानं बिनधास्तपणे फेरफटका मारल्यानं स्थानिकांसह पर्यटकांचा थरकाप उडाला. यावेळी पर्यटकांनी रानगव्यांच्या कळपाला कॅमेऱ्यात कैद केलं.
पावसामुळे फुलांच्या हंगामावर परिणाम : कास पठारावरील फुलोत्सव जगप्रसिद्ध आहे. सप्टेंबरच्या मध्यावर पठारावर फुलांच्या हंगामाला सुरूवात होते. ऑक्टोंबरच्या अखेरपर्यंत हा फुलोत्सव पाहायला मिळतो. परतीच्या पावसामुळे यंदा पठारावर फुलं उमलण्यास उशीर झाला आहे. 5 सप्टेंबरपासून फुलं उमलायला सुरूवात झाली. मात्र, पावसामुळे फुलांच्या उमलण्यावर परिणाम झाला. फुलोत्सवाची उत्सुकता असणाऱ्या पर्यटकांनी सप्टेंबर महिन्याच्या सुरूवातीपासूनच कास पठाराला भेट द्यायला सुरूवात केली होती.
यंदा कारवी, टोपली फुलांचं आकर्षण : सात वर्षातून एकदा फुलणाऱ्या कारवी आणि टोपलीच्या फुलांनी सुरूवातीला कास पठार बहरुन गेलं होतं. ही फुलं यंदाच्या हंगामात पर्यटकांचं आकर्षण ठरली. चांगलं ऊन पडू लागल्यानंतर संपूर्ण पठारावर विविध प्रजातीची फुलं उमलली. त्यामुळे सध्या पर्यटकांचे लोंढे कास पठारावर पाहायला मिळत आहेत.
हेही वाचा :