पुणे Pune Ayodhya Train : काही दिवसांपूर्वी, 22 जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत अयोध्येतील भव्य राम मंदिरात प्राणप्रतिष्ठापना झाली. तेव्हापासून अयोध्येत भक्तांची रीघ लागली आहे.
पुणे स्टेशन 'राममयट झालं : मंगळवारी, 6 फेब्रुवारीला पुण्यातील भारतीय जनता पार्टीच्या वतीनं शहरातील विविध मतदारसंघातील जवळपास 1400 रामभक्तांना घेऊन ट्रेन अयोध्येकडे रवाना करण्यात आली. यावेळी पुणे स्टेशन 'राममय' झालं होतं. 'प्रभू श्री राम की जय', 'जय श्री राम' अशा घोषणा देत पुणेकर ट्रेनद्वारे अयोध्येला रवाना झाले. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आणि शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी हिरवा कंदील दाखवल्यानंतर ट्रेन मार्गस्थ झाली.
मोदी सरकारमुळे मंदिराचं स्वप्न साकार : यावेळी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, देशात मोदी सरकार आल्यामुळेच मंदिराचं स्वप्न साकार झालं. 2008 आणि 2011 साली प्रभू श्रीराम जन्मभूमी मंदिराचा खटला सर्वोच्च न्यायालयात आला होता. तेव्हा श्रीराम जन्मभूमीचे पुरावे तत्कालीन काँग्रेस सरकारकडे मागितले असता, काँग्रेसच्या वकिलांनी रामलल्ला काल्पनिक असल्याचं सांगितलं. मात्र त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींचं सरकार आल्यानंतर जन्मभूमीचे पुरावे दिले गेले आणि राम मंदिर साकारायला परवानगी मिळाली, असं बावनकुळे म्हणाले.
उद्धव ठाकरेंचं हिंदुत्व बेगडी : बावनकुळे पुढे म्हणाले की, "राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेचं निमंत्रण मिळूनही उद्धव ठाकरे अयोध्येला गेले नाहीत. यातून त्यांचा नास्तिकपणा उघड झालाय. उद्धव ठाकरेंचं बेगडी प्रेम आणि हिंदुत्व जनतेच्या लक्षात आलं आहे. ते केवळ मतांच्या राजकारणासाठी ते अयोध्येला गेले नाहीत. मतांच्या राजकारणासाठी उद्धव ठाकरे किती खाली गेले आहेत, हे कळलं आहे", अशी बोचरी टीका बावनकुळेंनी केली.
हे वाचलंत का :