पुणे Criminal Identification Parade : सध्या लोकसभा निवडणूक (Lok Sabha Elections 2024) असून या निवडणुकीच्या काळात कोणतंही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासनाच्या वतीनं योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. आता पुणे पोलिसांकडून पुन्हा एकदा रेकॉर्डवरील गुन्हेगारांची आणखी एक परेड घेण्यात आला आहे. पुणे शहरातील तब्बल 109 पोलीस चौकींमध्ये रेकॉर्डवरील गुन्हेगारांची परेड पुणे पोलिसांनी (Pune Police) घेतली आहे. यात पुणे शहरात गेल्या पाच वर्षापासून रेकॉर्डवर असणाऱ्या 1000 पेक्षा अधिक गुन्हेगारांचा समावेश असून या गुन्हेगारांची पुणे पोलिसांकडून परेड घेण्यात आलीय.
पोलीस आयुक्तालयात गुन्हेगारांची परेड : पुणे पोलिसांकडून पुणे शहरातील 109 पोलीस चौकीमध्ये रेकॉर्डवरील सर्व गुन्हेगारांना बोलवून त्यांना तंबी देण्यात आली आहे. काही महिन्यांपूर्वी पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पदभार स्वीकारल्यानंतर पोलीस आयुक्तालयात गुन्हेगारांची परेड काढण्यात आली होती. तेव्हा देखील गुन्हेगारांना सोशल मीडियावर रिल्स टाकू नये असं सांगितल होतं. आत्ता लोकसभा निवडणुकीच्या काळ सुरू असून या काळात देखील कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी शहरातील अट्टल गुन्हेगारांना बोलावून त्यांची परेड घेऊन त्यांना तंबी देण्यात आलीय.
सातारा येथे सराईत गुन्हेगारांची परेड : महायुतीच्या नेत्यांसोबत गुंडांचे फोटो व्हायरल झाल्यानंतर सराईत गुन्हेगारांची पोलीस हजेरी घेत आहेत. याआधीही कराडच्या डीवायएसपींनी तालुक्यातील सराईत गुन्हेगारांची शनिवारी परेड घेण्यात आली होती. यावेळी १९० गुंडांचं डिजिटल क्राइम रेकॉर्ड पोलिसांनी तयार केलं होतं. गुन्हेगारीला उत्तेजन देणारे रिल्स करणाऱ्यांना कायद्याचा हिसका दाखवला जाईल, असा इशारा देताच अनेक गुंडांनी तिथल्या तिथं इनस्टाग्रामवरील रिल्स आणि अकाऊंट डिलीट केली होती.
हेही वाचा -