बुलावायो ZIM vs PAK 3rd T20I Live Streaming : झिम्बाब्वे राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध पाकिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील तिसरा आणि शेवटचा T20 सामना आज, गुरुवार, 5 डिसेंबर रोजी खेळवला जाणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना बुलावायो येथील क्वीन्स स्पोर्ट्स क्लब इथं होणार आहे.
Bulawayo Diaries: T20I series win sealed with Sufyan Moqim leading the way 💫#ZIMvPAK | #BackTheBoysInGreen pic.twitter.com/ejCdOq4xNn
— Pakistan Cricket (@TheRealPCB) December 4, 2024
पाकिस्ताननं जिंकली मालिका : तीन सामन्यांच्या मालिकेत पाकिस्ताननं 2-0 अशी आघाडी घेतली आहे. दुसऱ्या T20 सामन्यात पाकिस्ताननं झिम्बाब्वेचा 10 गडी राखून पराभव केला. त्या सामन्यात पाकिस्तानच्या घातक गोलंदाजीसमोर झिम्बाब्वेचा संघ 12.4 षटकांत 57 धावांवरच मर्यादित राहिला. प्रत्युत्तरात पाहुण्या संघानं 5.3 षटकांतच लक्ष्य गाठलं. आता मालिकेतील तिसऱ्या सामन्यात क्लीन स्वीप टाळण्याकडं झिम्बाब्वेच्या नजरा असतील. तर पाकिस्तान संघ तिसरा सामना जिंकून मालिकेत स्वीप करु इच्छितो. परणामी दोन्ही संघांमध्ये चुरशीची स्पर्धा पाहायला मिळणार आहे.
Pakistan complete their third 🔟-wicket win in T20Is 👏
— Pakistan Cricket (@TheRealPCB) December 3, 2024
Just 3️⃣3️⃣ balls needed for the chase and secure a 2-0 lead in the series 🔥#ZIMvPAK | #BackTheBoysInGreen pic.twitter.com/L1YYY8bOqm
दोन्ही संघाचा हेड-टू-हेड रेकॉर्ड काय : झिम्बाब्वे आणि पाकिस्तान यांच्यात आतापर्यंत 20 आंतरराष्ट्रीय T20 सामने खेळले गेले आहेत. या काळात पाकिस्तान संघाचं पारडं जड आहे. पाकिस्तान संघानं 18 सामने जिंकले आहेत. तर झिम्बाब्वेला केवळ दोनच सामने जिंकता आले आहेत.
T20 मालिकेचं वेळापत्रक :
- पहिला T20 सामना, 01 डिसेंबर, पाकिस्तान 57 धावांनी विजयी
- दुसरा T20 सामना, 03 डिसेंबर, पाकिस्तान 10 विकेटनं विजयी
- तिसरा T20 सामना, आज, दुपारी 5 वाजता क्वीन्स स्पोर्ट्स क्लब, बुलावायो
Pakistan's playing XI for the final T20I against Zimbabwe 🏏#ZIMvPAK | #BackTheBoysInGreen pic.twitter.com/RJGRYiGsSU
— Pakistan Cricket (@TheRealPCB) December 4, 2024
खेळपट्टी कशी असेल : झिम्बाब्वे आणि पाकिस्तान यांच्यातील तिसरा T20 सामना बुलावायो इथं होणार आहे. क्वीन्स स्पोर्ट्स क्लबच्या खेळपट्टीवर पहिल्या डावाची सरासरी 154 धावा आहे. या खेळपट्टीवर फलंदाजांना खूप मदत मिळते, परंतु वेगवान गोलंदाजांना नवीन चेंडूनं बाऊन्स आणि स्विंग मिळू शकते. या मैदानावर दुसऱ्या डावात खेळपट्टी संथ होते, ज्यामुळं फिरकीपटूंना मदत होते. या खेळपट्टीवर प्रथम फलंदाजी करताना 10 पैकी 9 सामने जिंकले आहेत. नाणेफेक जिंकणाऱ्या संघाने प्रथम फलंदाजी करावी जेणेकरून मोठी धावसंख्या फलकावर लावता येईल.
झिम्बाब्वे आणि पाकिस्तान यांच्यात तिसरा T20 सामना कधी आणि कुठं होणार?
झिम्बाब्वे आणि पाकिस्तान यांच्यातील तिसरा T20 सामना आज, गुरुवार, 05 डिसेंबर भारतीय वेळेनुसार दुपारी 5 वाजता बुलावायो येथील क्वीन्स स्पोर्ट्स क्लबमध्ये खेळवला जाईल. याची नाणेफेक अर्धा तास आधी म्हणजे 4:30 वाजता होणार आहे.
INCREDIBLE bowling show from the boys! 💪
— Pakistan Cricket (@TheRealPCB) December 3, 2024
Zimbabwe slump to their lowest total in T20Is. 5️⃣8️⃣ runs required to seal the series 🎯#ZIMvPAK | #BackTheBoysInGreen pic.twitter.com/6PlZqFu3w6
झिम्बाब्वे आणि पाकिस्तान यांच्यातील तिसरा T20 सामना कुठं आणि कसा पाहायचा?
सध्या भारतातील कोणत्याही टीव्ही चॅनेलवर झिम्बाब्वे विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील तीन सामन्यांच्या T20 मालिकेचं प्रसारण झाल्याची कोणतीही माहिती नाही. तथापि, झिम्बाब्वे विरुद्ध पाकिस्तान T20 मालिकेचं लाईव्ह स्ट्रीमिंग फॅनकोड ॲप आणि वेबसाइटवर भारतात उपलब्ध असेल.
मालिकेसाठी दोन्ही संघ :
झिम्बाब्वे संघ : क्रेग एर्विन (कर्णधार), फराज अक्रम, ब्रायन बेनेट, जॉयलॉर्ड गॅम्बी, ट्रेवर ग्वांडू, क्लाइव्ह मदांडे, टिनोटेंडा माफोसा, तदिवनाशे मारुमनी, ब्रँडन मावुता, ताशिंगा मुसेकिवा, ब्लेसिंग मुझाराबानी, डिओन मायर्डन, रिकान मायडर्स, डिओन मायडर्स. विल्यम्स.
पाकिस्तान संघ : आमिर जमाल, अब्दुल्ला शफीक, अबरार अहमद, अहमद डॅनियल, फैसल अक्रम, हारिस रौफ, हसिबुल्लाह (यष्टिरक्षक), कामरान गुलाम, मोहम्मद हसनैन, मोहम्मद रिझवान (यष्टिरक्षक), मोहम्मद इरफान खान, सैम अयुब, सलमान अली आगा (कर्णधार), शाहनवाज दहनी, तय्यब ताहिर.
हेही वाचा :