हरारे ZIM vs AFG 3rd T20I Live Streaming : झिम्बाब्वे राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध अफगाणिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील तीन सामन्यांच्या T20 मालिकेतील तिसरा सामना आज 14 डिसेंबर (शनिवार) रोजी हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे इथं खेळवला जाईल. संध्या ही मालिका 1-1 अशी बरोबरीत आहे. यामुळं तिसरा सामना जिंकणारा संघ T20 मालिका जिंकेल. झिम्बाब्वेनं पहिला सामना चार गडी राखून जिंकला होता, मात्र शुक्रवारी अफगाणिस्तान संघानं शानदार पुनरागमन करत 50 धावांनी विजय मिळवला.
Afghanistan Win the 2nd T20I to Draw Level the Series
— Afghanistan Cricket Board (@ACBofficials) December 13, 2024
Kabul, December 13, 2024: The Afghanistan National Team has put on an incredible all-round performance to beat Zimbabwe by 50 runs and draw level the three-match T20I series 1-1.
Read More: https://t.co/3GbiFLHfaW pic.twitter.com/FcdwksIwUl
दुसऱ्या सामन्यात अफगाणिस्तान विजयी : दुसऱ्या T20 सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारल्यानंतर पाहुण्या संघानं 153 धावा केल्या, ज्यात दर्वेश रसूलीनं 42 चेंडूत 58 धावा केल्या. प्रत्युत्तरात झिम्बाब्वे 17.4 षटकांत सर्वबाद 103 धावांवर आटोपला, अफगाणिस्तानकडून कर्णधार राशिद खान आणि मध्यमगती गोलंदाज नवीन-उल-हकनं प्रत्येकी तीन बळी घेतले. अफगाणिस्तानसाठी आतापर्यंत आठ T20 सामने खेळलेल्या रसूलीला त्याच्या महत्त्वपूर्ण अर्धशतकासाठी सामनावीर म्हणून गौरवण्यात आलं.
𝐑𝐮𝐧𝐬: 𝟓𝟖
— Afghanistan Cricket Board (@ACBofficials) December 13, 2024
𝐁𝐚𝐥𝐥𝐬: 𝟒𝟐
𝐅𝐨𝐮𝐫𝐬: 𝟔
𝐒𝐢𝐱𝐞𝐬: 𝟏
𝐒. 𝐑𝐚𝐭𝐞: 𝟏𝟑𝟖.𝟎𝟗
Darwish Rasooli was awarded as the Player of the Match for his maiden T20I half-century. 👏#AfghanAtalan | #ZIMvAFG | #GloriousNationVictoriousTeam pic.twitter.com/KtPPA0Dw8P
दोन्ही संघाचा हेड-टू-हेड रेकॉर्ड काय : आंतरराष्ट्रीय T20 मध्ये झिम्बाब्वे आणि अफगाणिस्तान संघ 17 वेळा आमनेसामने आले आहेत. ज्यात अफगाणिस्तानचा वरचष्मा दिसत आहे. अफगाणिस्ताननं 17 पैकी 15 T20 सामने जिंकले आहेत. तर झिम्बाब्वेनं फक्त 2 सामने जिंकले आहेत. यावरुन अफगाणिस्तानचा संघ अधिक मजबूत असल्याचं दिसून येतं.
RESULT | AFGHANISTAN WON BY 50 RUNS 🚨
— Afghanistan Cricket Board (@ACBofficials) December 13, 2024
Naveen Ul Haq (3/19), Rashid Khan (3/20), and Mujeeb Ur Rahman (2/30) put on a terrific bowling effort to help #AfghanAtalan beat Zimbabwe by 50 runs and draw level the three-match T20I series 1-1. 👍#ZIMvAFG |… pic.twitter.com/dMnHwSAmIk
खेळपट्टी कशी असेल : हरारे स्पोर्ट्स क्लबमधील खेळपट्टी फलंदाजीसाठी आव्हानात्मक असेल आणि फिरकीपटूंसाठी खूप उपयुक्त ठरेल. मात्र, सुरुवातीच्या षटकांमध्ये वेगवान गोलंदाजांना नव्या चेंडूची थोडीफार मदत मिळू शकते. पण जसजसा खेळ पुढं जाईल तसतशी फिरकीपटू महत्त्वाची भूमिका बजावतील. या मैदानावर दोन्ही संघ प्रथम फलंदाजी करण्याचा प्रयत्न करतील.
𝟐𝟓𝟎 𝐓𝟐𝟎 𝐖𝐢𝐜𝐤𝐞𝐭𝐬 𝐟𝐨𝐫 𝐍𝐚𝐯𝐞𝐞𝐧! 👏
— Afghanistan Cricket Board (@ACBofficials) December 13, 2024
Naveen Ul Haq has reached a significant milestone by taking his 250th wicket in T20 cricket. He has played 207 T20 matches and achieved this feat with an impressive average of 24.12. 👊
Many more to come, Naveen! 👍… pic.twitter.com/8fgLJgNyRY
हरारे स्पोर्ट्स क्लब येथील T20 सामन्यांची आकडेवारी कशी : मीडिया रिपोर्ट्सनुसार, हरारे येथील हरारे स्पोर्ट्स क्लबमध्ये आतापर्यंत एकूण 48 T20 सामने खेळले गेले आहेत. ज्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघानं 24 सामने जिंकले आहेत, तर दुसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या संघानं 22 सामने जिंकले आहेत. याशिवाय एक सामना अनिर्णित तर एक सामना बरोबरीत सुटला आहे.
It’s the third and final T20 international this afternoon — the series decider!
— Zimbabwe Cricket (@ZimCricketv) December 14, 2024
Catch all the action from Harare Sports Club at 13:30 (CAT) as Zimbabwe take on Afghanistan.#ZIMvAFG #VisitZimbabwe pic.twitter.com/eHHA5hSXSD
T20 मालिकेचं वेळापत्रक :
- पहिला T20 सामना : 11 डिसेंबर, हरारे (झिम्बाब्वे 4 विकेटनं विजयी)
- दुसरा T20 सामना : 13 डिसेंबर, हरारे (अफगाणिस्तान 50 धावांनी विजयी)
- तिसरा T20 सामना : आज, हरारे
A 50-run victory for Afghanistan in the second T20I levelling the series 1-1 and setting the stage for a decider this Saturday.#ZIMvAFG #VisitZimbabwe 📝 https://t.co/CFpkJwGFCr pic.twitter.com/8n1OvFH7bX
— Zimbabwe Cricket (@ZimCricketv) December 13, 2024
झिम्बाब्वे आणि अफगाणिस्तान यांच्यातील तिसरा T20 सामना कधी होणार?
झिम्बाब्वे आणि अफगाणिस्तान यांच्यातील तिसरा T20 सामना आज शनिवार, 14 डिसेंबर रोजी हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे इथं भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 5:00 वाजता खेळवला जाईल. ज्याची नाणेफेक अर्धा तासआधी होईल.
Afghanistan set a target of 154 for Zimbabwe in the second T20I 🎯#ZIMvAFG #VisitZimbabwe 📝 https://t.co/CFpkJwG7MT pic.twitter.com/9GZd5rdScd
— Zimbabwe Cricket (@ZimCricketv) December 13, 2024
झिम्बाब्वे आणि अफगाणिस्तान यांच्यातील तिसरा T20 सामना कुठं आणि कसा पाहायचा?
सध्या भारतातील टीव्ही चॅनेलवर झिम्बाब्वे विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यातील तीन सामन्यांच्या T20 मालिकेच्या प्रसारणाबाबत कोणतीही माहिती नाही. मात्र, या T20 मालिकेचं लाईव्ह स्ट्रीमिंग भारतात फॅनकोड ॲप आणि वेबसाइटवर उपलब्ध असेल.
Afghanistan set a target of 154 for Zimbabwe in the second T20I 🎯#ZIMvAFG #VisitZimbabwe 📝 https://t.co/CFpkJwG7MT pic.twitter.com/9GZd5rdScd
— Zimbabwe Cricket (@ZimCricketv) December 13, 2024
सामन्यासाठी दोन्ही संघ :
झिम्बाब्वे T20 संघ : सिकंदर रझा (कर्णधार), फराज अक्रम, ब्रायन बेनेट, रायन बर्ल, ट्रेवर ग्वांडू, क्लाइव्ह मदांडे (यष्टिरक्षक), वेस्ली माधवेरे, टिनोटेंडा माफोसा, तदिवानशे मारुमनी (यष्टिरक्षक), वेलिंग्टन मसाकादझा, ब्रँडन मावुथा, ताव्वा, ब्रँडन मावुता, ता. मुझाराबानी, डायोन मायर्स, रिचर्ड नगारावा
अफगाणिस्तान T20 संघ : राशिद खान (कर्णधार), रहमानउल्ला गुरबाज (यष्टिरक्षक), मोहम्मद इशाक (यष्टिरक्षक), सेदीकुल्ला अटल, हजरतुल्ला झाझाई, मोहम्मद नबी, दरविश रसौली, झुबैद अकबरी, गुलबदीन नायब, करीम जनात, अजमातुल्ला उमरझाई, नांग्याल खरोती, मुजीब उर रहमान, नूर अहमद, फजल हक फारुकी, फरीद अहमद, नवीन उल हक
At the halfway point, Afghanistan are 73/3
— Zimbabwe Cricket (@ZimCricketv) December 13, 2024
(Darwish Rasooli 23*, Azmatullah Omarzai 17*)#ZIMvAFG #VisitZimbabwe 📝 https://t.co/CFpkJwG7MT pic.twitter.com/svkexxr4UN
हेही वाचा :