हरारे ZIM vs AFG 1st T20I Live Streaming : झिम्बाब्वे राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध अफगाणिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील तीन T20 सामन्यांच्या मालिकेतील पहिला T20 सामना आज 11 डिसेंबर रोजी होणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना हरारे येथील हरारे स्पोर्ट्स क्लब इथं होणार आहे.
पाकिस्तानकडून झिम्बाब्वेचा पराभव : झिम्बाब्वे संघानं नुकतीच पाकिस्तानविरुद्धची मायदेशातील मालिका 2-1 नं गमावली. त्यामुळं या मालिकेत यजमान संघ पुनरागमन करण्याचा प्रयत्न करेल. अफगाणिस्तान सध्या ICC पुरुषांच्या T20 संघ क्रमवारीत 10 व्या स्थानावर आहे, तर झिम्बाब्वे 12 व्या स्थानावर आहे. सिकंदर रझा T20 मालिकेत झिम्बाब्वेचे नेतृत्व करणार आहे.
𝐏𝐫𝐞𝐩𝐬 𝐌𝐨𝐝𝐞 🔛
— Afghanistan Cricket Board (@ACBofficials) December 8, 2024
AfghanAtalan are underway with their preparations as they gear up for the three-match T20I series against Zimbabwe, starting this Wednesday in Harare. 👍#AfghanAtalan | #ZIMvAFG | #GloriousNationVictoriousTeam pic.twitter.com/XS0Rtl9yKo
T20 विश्वचषकानंतर पहिलाच T20 सामना : दुसरीकडे या मालिकेत अफगाणिस्तानची कमान राशिद खान सांभाळणार आहे. ऑक्टोबरमध्ये झालेल्या ACC पुरुष T20 इमर्जिंग आशिया कप 2024 च्या विजेतेपदासाठी अफगाणिस्तानचं नेतृत्व केल्यानंतर युवा फलंदाज अष्टपैलू झुबैद अकबरीचा प्रथमच T20 संघात समावेश करण्यात आला आहे. फिरकीपटू मुजीब उर रहमानचा उजव्या पायाच्या दुखण्यातून बरा झाल्यानंतर T20 संघात समावेश करण्यात आला आहे. जुनमध्ये T20 विश्वचषक 2024 च्या उपांत्य फेरीत पोहोचल्यानंतर अफगाणिस्तान पहिलीच T20 मालिका खेळणार आहे.
दोन्ही संघाचा हेड-टू-हेड रेकॉर्ड काय : T20 मध्ये झिम्बाब्वे आणि अफगाणिस्तान संघ 15 वेळा आमनेसामने आले आहेत. ज्यात अफगाणिस्तानचा वरचष्मा दिसत आहे. अफगाणिस्ताननं 15 पैकी 14 T20 सामने जिंकले आहेत. तर झिम्बाब्वेनं फक्त 1 सामना जिंकला आहे. यावरुन अफगाणिस्तानचा संघ अधिक मजबूत असल्याचं दिसून येतं.
Get ready for an action packed holiday season as Zimbabwe take on Afghanistan in a tour featuring T20Is, ODIs, and Test matches in Harare and Bulawayo. 😍#ZIMvAFG #VisitZimbabwe pic.twitter.com/4f3ojWGTvI
— Zimbabwe Cricket (@ZimCricketv) December 7, 2024
खेळपट्टी कशी असेल : हरारे स्पोर्ट्स क्लबमधील खेळपट्टी फलंदाजीसाठी आव्हानात्मक असेल आणि फिरकीपटूंसाठी खूप उपयुक्त ठरेल. मात्र, सुरुवातीच्या षटकांमध्ये वेगवान गोलंदाजांना नव्या चेंडूची थोडीफार मदत मिळू शकते. पण जसजसा खेळ पुढं जाईल तसतशी फिरकीपटू महत्त्वाची भूमिका बजावतील. या मैदानावर दोन्ही संघ प्रथम फलंदाजी करण्याचा प्रयत्न करतील.
हरारे स्पोर्ट्स क्लब येथील T20 सामन्यांची आकडेवारी कशी : मीडिया रिपोर्ट्सनुसार, हरारे येथील हरारे स्पोर्ट्स क्लबमध्ये आतापर्यंत एकूण 46 T20 सामने खेळले गेले आहेत. ज्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघानं 23 सामने जिंकले आहेत, तर दुसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या संघानं 21 सामने जिंकले आहेत. याशिवाय एक सामना अनिर्णित तर एक सामना बरोबरीत सुटला आहे.
The Afghanistan cricket team touched down at Robert Gabriel Mugabe Int. Airport on Thursday. 🛬
— Zimbabwe Cricket (@ZimCricketv) December 5, 2024
They are set to take on Zimbabwe in all formats this December through to January 2025.#ZIMvAFG #VisitZimbabwe pic.twitter.com/WVVgekRtcU
T20 मालिकेचं वेळापत्रक :
- पहिला T20 सामना : 11 डिसेंबर, हरारे
- दुसरा T20 सामना : 13 डिसेंबर, हरारे
- तिसरा T20 सामना : 14 डिसेंबर, हरारे
- झिम्बाब्वे आणि अफगाणिस्तान यांच्यात पहिला T20 सामना कधी होणार?
झिम्बाब्वे आणि अफगाणिस्तान यांच्यातील पहिला T20 सामना आज बुधवार, 11 डिसेंबर रोजी हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे इथं भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 5:00 वाजता खेळवला जाईल. ज्याची नाणेफेक अर्धा तासआधी होईल.
- झिम्बाब्वे आणि अफगाणिस्तान यांच्यातील पहिला T20 सामना कुठं आणि कसा पाहायचा?
सध्या भारतातील टीव्ही चॅनेलवर झिम्बाब्वे विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यातील तीन सामन्यांच्या T20 मालिकेच्या प्रसारणाबाबत कोणतीही माहिती नाही. तथापि, या T20 मालिकेचं लाईव्ह स्ट्रीमिंग भारतात फॅनकोड ॲप आणि वेबसाइटवर उपलब्ध असेल.
𝐈𝐭 𝐁𝐞𝐠𝐢𝐧𝐬 𝐓𝐨𝐦𝐨𝐫𝐫𝐨𝐰! 🤩#AfghanAtalan are all set to begin their three-match T20I series against Zimbabwe at 4:00 PM (AFT) tomorrow at the Harare Sports Club in Harare. 👍#ZIMvAFG | #GloriousNationVictoriousTeam pic.twitter.com/bTT217gqzf
— Afghanistan Cricket Board (@ACBofficials) December 10, 2024
मालिकेसाठी दोन्ही संघ :
झिम्बाब्वे T20 संघ : सिकंदर रझा (कर्णधार), फराज अक्रम, ब्रायन बेनेट, रायन बर्ल, ट्रेवर ग्वांडू, क्लाइव्ह मदांडे (यष्टिरक्षक), वेस्ली माधवेरे, टिनोटेंडा माफोसा, तदिवानशे मारुमनी (यष्टिरक्षक), वेलिंग्टन मसाकादझा, ब्रँडन मावुथा, ताव्वा, ब्रँडन मावुता, ता. मुझाराबानी, डायोन मायर्स, रिचर्ड नगारावा
अफगाणिस्तान T20 संघ : राशिद खान (कर्णधार), रहमानउल्ला गुरबाज (यष्टिरक्षक), मोहम्मद इशाक (यष्टिरक्षक), सेदीकुल्ला अटल, हजरतुल्ला झाझाई, मोहम्मद नबी, दरविश रसौली, झुबैद अकबरी, गुलबदीन नायब, करीम जनात, अजमातुल्ला उमरझाई, नांग्याल खरोती, मुजीब उर रहमान, नूर अहमद, फजल हक फारुकी, फरीद अहमद, नवीन उल हक