नैरोबी (केनिया) Highest Total in T20I : T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासात सर्वोच्च धावसंख्येचा नवा विक्रम रचला गेला आहे आणि हे काम भारत, ऑस्ट्रेलिया किंवा इंग्लंडसारख्या मोठ्या संघांनी केलेलं नाही. काही दिवसांपूर्वी भारतीय संघानं 297 धावा करून हा विक्रम करण्याच्या जवळ होता. मात्र 11 दिवसांनंतर अखेर हा विक्रम झिम्बाब्वेच्या नावावर झाला आहे. झिम्बाब्वेनं हा विक्रम केला आहे. सिकंदर रझाच्या नेतृत्वाखालील झिम्बाब्वे क्रिकेट संघानं गॅम्बियाविरुद्ध 20 षटकात तब्बल 344 धावा करत नवा विश्वविक्रम केला आहे. यापूर्वी हा विक्रम नेपाळच्या नावावर होता, त्यांनी मंगोलियाविरुद्ध 314 धावा केल्या होत्या.
सध्या केनियाची राजधानी नैरोबी डथं पुरुष T20 विश्वचषक स्पर्धेतील आफ्रिका उप-प्रदेशातील पात्रता सामने खेळली जात आहे. या क्वालिफायर स्पर्धेत झिम्बाब्वे आणि गांबिया बुधवार 23 ऑक्टोबर रोजी आमनेसामने आले. आता गांबियासारखा अननुभवी संघ झिम्बाब्वेसमोर टिकू शकणार नाही आणि झिम्बाब्वे सहज जिंकेल हे आधीच जवळपास निश्चित झालं होतं पण मैदानावर जे घडले ते अजिबात अपेक्षित नव्हतं.
A NEW RECORD 🚨
— ICC (@ICC) October 23, 2024
Zimbabwe put on an exhibition of hitting in the ICC Men's #T20WorldCup Africa Sub Regional Qualifier B 🙌https://t.co/G01f6R4IEK
या सामन्यात झिम्बाब्वेनं प्रथम फलंदाजी केली आणि त्यांच्या फलंदाजांनी धावा करण्याच्या या सोप्या संधीचा फायदा घेतला. यावेळी फक्त डिऑन मायर्स अपयशी ठरला पण इतर प्रत्येक फलंदाजांनी धावा केल्या. सलामीवीर ब्रायन बेनेट आणि टी मारुमणी यांनी मिळून 5.4 षटकांत 98 धावा केल्या. मारुमणी अवघ्या 19 चेंडूत 62 धावा करून बाद झाला. बेनेटनंही 26 चेंडूत 50 धावा केल्या. पण खरा शो कर्णधार सिकंदर रझानं चोरला. झिम्बाब्वेच्या सर्वात अनुभवी अष्टपैलू खेळाडूनं आपल्या फलंदाजीनं चौकार आणि षटकारांची आतषबाजी करत गॅम्बियाच्या गोलंदाजांचा नाश केला.
Zimbabwe finish on a WORLD RECORD 344/4 in T20I cricket.
— Adam Theo🇿🇼🏏 (@AdamTheofilatos) October 23, 2024
We just experienced hitting never seen before on the international stage.
Congratulations to the Chevrons with a special mention to Captain Raza who equalled the second fastest T20i century and Zimbabwe’s first🇿🇼🇿🇼 pic.twitter.com/pTih3OC3O6
सर्वाधिक षटकारांचा नवा विक्रम
या डावात झिम्बाब्वेच्या फलंदाजांनी भरपूर षटकार ठोकले. कर्णधार सिकंदर रझानं सर्वाधिक 15 षटकार ठोकले. याशिवाय त्याच्या बॅटमधून 7 चौकारही आले. 17 चेंडूत 55 धावा करणाऱ्या मदंडेनंही 5 षटकार ठोकले, तर मारुमणीने 4 षटकार ठोकले. एकूणच या डावात झिम्बाब्वेनं 27 षटकार मारले आणि नेपाळचा (26) विश्वविक्रमही मोडला.