धर्मशाळा Yashasvi Jaiswal : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील शेवटचा सामना धर्मशाळा येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळवला जातोय. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली यजमान संघानं आधीच 3-1 अशी अभेद्य आघाडी घेतलीय. आता हा सामना जिंकून भारतीय संघ 4-1 नं मालिका जिंकण्याचा प्रयत्न करेल.
सर्वात जलद 1000 धावा : यशस्वी जैस्वालनं कसोटी क्रिकेटमध्ये 1000 धावा पूर्ण केल्या. यासोबतच यशस्वी हा सर्वात जलद हजार कसोटी धावा पूर्ण करणारा भारतीय सलामीवीर ठरलाय. यशस्वीनं त्याच्या 16व्या कसोटी डावात हजार धावा पूर्ण केल्या. यासाठी त्यानं 9 कसोटी सामने घेतले. सामन्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर यशस्वी हा एकंदरीत सर्वात जलद हजार कसोटी धावा करणारा दुसरा भारतीय आहे. त्याच्याआधी विनोद कांबळीनं 14 डावात हजार कसोटी धावा पूर्ण केल्या होत्या.
यशस्वीनं मोडला विराटचा विक्रम : सामन्याच्या पहिल्याच दिवशी भारतीय सलामीवीर यशस्वी जैस्वालनं अप्रतिम कामगिरी केली. यशस्वीनं भारताच्या पहिल्या डावात 58 चेंडूत 57 धावा केल्या. यशस्वीनं आपल्या खेळीत 5 चौकार आणि 3 षटकार मारले. या खेळीदरम्यान यशस्वीनं काही मोठे विक्रम केले. यशस्वी हा इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारा भारतीय फलंदाज ठरलाय. यशस्वीनं 2016 च्या मालिकेत 655 धावा करणाऱ्या विराट कोहलीला मागे टाकलं.
भारताकडून सर्वात जलद 1000 कसोटी धावा (डावानुसार)
- 14 - विनोद कांबळी
- 16 - यशस्वी जैस्वाल
- 18 - चेतेश्वर पुजारा
- 19 - मयंक अग्रवाल
- 21 - सुनील गावस्कर
1000 कसोटी धावा पूर्ण करण्यापर्यंतची सर्वोच्च फलंदाजी सरासरी (भारत)
- 83.33 - विनोद कांबळी
- 71.43 - चेतेश्वर पुजारा
- 71.43 - यशस्वी जैस्वाल
- 62.5 - सुनील गावस्कर
- 55.56 - मयंक अग्रवाल
1000 कसोटी धावा करणारा सर्वात तरुण (भारतीय फलंदाज)
- 19 वर्षे 217 दिवस - सचिन तेंडुलकर
- 21 वर्षे 27 दिवस - कपिल देव
- 21 वर्षे 197 दिवस - रवी शास्त्री
- 22 वर्षे 70 दिवस - यशस्वी जैस्वाल
- 22 वर्षे 293 दिवस - दिलीप वेंगसरकर
सर्वात कमी दिवसात 1000 कसोटी धावा
- 166 - मायकेल हसी
- 185 - एडन मार्कराम
- 207 - ॲडम व्होजेस
- 227 -अँड्र्यू स्ट्रॉस
- 239 - यशस्वी जैस्वाल
- 244 - हर्बर्ट सटक्लिफ
सर्वात कमी सामन्यांमध्ये 1000 कसोटी धावा
- 7 - डॉन ब्रॅडमन
- 9 - एव्हर्टन आठवडे
- 9 - हर्बर्ट सटक्लिफ
- 9 - जॉर्ज हॅडली
- 9 - यशस्वी जैस्वाल
आणखी विक्रम रचण्याची संधी : 22 वर्षीय यशस्वी जैस्वालनं चालू कसोटी सामन्यात एकूण 98 धावा केल्या तर तो भारत आणि इंग्लंड यांच्यातील कोणत्याही कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनेल. यशस्वी पहिल्या डावात 57 धावा करुन बाद झाल्यानं हा विक्रम मोडण्यासाठी त्याला आणखी 41 धावांची गरज आहे. सध्या हा विक्रम इंग्लिश दिग्गज ग्रॅहम गूचच्या नावावर आहे, त्यानं 1990 च्या कसोटी मालिकेत 752 धावा केल्या होत्या.
भारत-इंग्लंड कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा
- ग्रॅहम गूच (1990) – 3 सामने, 752 धावा, 3 शतकं
- जो रूट (2021-22) – 5 सामने, 737 धावा, 4 शतकं
- यशस्वी जैस्वाल (2024) – 5* सामने, 712* धावा, 2 शतकं
- विराट कोहली (2016) – 5 सामने, 655 धावा, 2 शतकं
- मायकेल वॉ (2002) – 4 सामने, 615 धावा, 3 शतकं
गावस्करांचा 53 वर्षे जुना विक्रम मोडण्याची संधी : यशस्वी जैस्वालला माजी भारतीय कर्णधार सुनील गावस्कर यांचा 53 वर्ष जुना विक्रम मोडण्याची संधी आहे. एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारा सुनील गावस्कर हा भारतीय फलंदाज आहे. गावसकरनं 1971 च्या वेस्ट इंडिज दौऱ्यावर 4 कसोटी सामन्यांत एकूण 774 धावा ( द्विशतकासह 4 शतकं आणि तीन अर्धशतकं) केली होती. या काळात गावस्कर यांची सरासरी 154.80 होती. म्हणजे धर्मशाळा कसोटीत यशस्वीनं 120 धावा केल्या तर तो गावस्करला मागे टाकेल. यशस्वी पहिल्या 57 धावा करुन बाद झाल्यानं त्याला आता हा विक्रम मोडण्यासाठी 63 धावांची गरज आहे.
कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा (भारतीय फलंदाज)
- सुनील गावस्कर विरुद्ध वेस्ट इंडीज (1971) – 4 सामने, 774 धावा, 154.80 सरासरी, 4 शतकं
- सुनील गावस्कर विरुद्ध वेस्ट इंडिज (1978-79) – 6 सामने, 732 धावा, 91.50 सरासरी, 4 शतकं
- विराट कोहली विरुद्ध ऑस्ट्रेलिया (2014-15) – 4 सामने, 692 धावा, 86.50 सरासरी, 4 शतकं
- विराट कोहली विरुद्ध इंग्लंड (2016) – 5 सामने, 655 धावा, 109.16 सरासरी, 2 शतकं
- दिलीप सरदेसाई विरुद्ध वेस्ट इंडीज (1971) – 5 सामने, 642 धावा, 80.25 सरासरी, 3 शतकं
- यशस्वी जैस्वाल विरुद्ध इंग्लंड (२०२४) – ५* सामने, 712* धावा, 2 शतकं
हेही वाचा :