नवी दिल्ली Vinesh Phogat Bajrang Punia Joined Congress : कुस्तीपटू विनेश फोगट आणि बजरंग पुनिया शुक्रवारी अधिकृतपणे काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. नवी दिल्ली येथील कॉंग्रेस मुख्यालयात काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या उपस्थितीत या दोघांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. पक्षात प्रवेश करण्यापूर्वी दोघेही काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या घरी पोहोचत त्यांची भेट घेतली. यावेळी पक्षाचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल हेही खरगे यांच्या निवासस्थानी उपस्थित आहेत. काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर विनेश आणि बजरंग आता कुस्तीच्या आखाड्यातून राजकीय मैदानात दिसणार आहेत. हरियाणा विधानसभा निवडणुकीपूर्वी हे दोन्ही खेळाडू काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.
चक दे इंडिया, चक दे हरियाणा!
— Mallikarjun Kharge (@kharge) September 6, 2024
दुनिया में भारत का नाम रौशन करने वाले हमारे प्रतिभाशाली चैंपियन विनेश फोगाट और बजरंग पुनिया से 10 राजाजी मार्ग पर मुलाक़ात।
हमें आप दोनों पर गर्व है। pic.twitter.com/aFRwfFeeo1
लाखो रुपयांची नोकरी सोडली : तत्पुर्वी विनेश फोगटनं एक मोठा निर्णय घेत सरकारी नोकरी सोडली. शुक्रवारी विनेश फोगटनं सरकारी नोकरी सोडण्याची घोषणा केली. त्यांनी आपला राजीनामा सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. विनेश फोगट ही उत्तर रेल्वेत नोकरी करत होती. ती विशेष कर्तव्य अधिकारी म्हणून तैनात होती. रेल्वेची नोकरी सोडताना विनेश फोगटनं लिहिलं की, 'भारतीय रेल्वेची सेवा हा माझ्या आयुष्यातील संस्मरणीय आणि अभिमानास्पद काळ आहे. मी रेल्वे सेवेपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे आणि माझं राजीनामा पत्र त्यांना सादर केलं आहे. देशाच्या सेवेत रेल्वेनं मला दिलेल्या या संधीबद्दल मी भारतीय रेल्वे परिवाराची सदैव ऋणी राहीन.'
भारतीय रेलवे की सेवा मेरे जीवन का एक यादगार और गौरवपूर्ण समय रहा है।
— Vinesh Phogat (@Phogat_Vinesh) September 6, 2024
जीवन के इस मोड़ पर मैंने स्वयं को रेलवे सेवा से पृथक करने का निर्णय लेते हुए अपना त्यागपत्र भारतीय रेलवे के सक्षम अधिकारियों को सौप दिया है। राष्ट्र की सेवा में रेलवे द्वारा मुझे दिये गये इस अवसर के लिए मैं… pic.twitter.com/HasXLH5vBP
या कारणामुळं विनेशनं घेतली निवृत्ती : रेल्वेची नोकरी का सोडत आहे, हे विनेश फोगटनं राजीनामा पत्रात स्पष्ट केलं आहे. विनेशनं लिहिलं, तिच्या कौटुंबिक आणि वैयक्तिक परिस्थितीमुळं ती नोकरी सोडत आहे. विनेश फोगट रेल्वेत ओएसडी होती आणि या पदाला चांगला पगार मिळतो. रिपोर्ट्सनुसार, रेल्वे ओएसडीला वर्षाला 15 ते 17 लाख रुपये मिळतात. विनेश फोगटनं काँग्रेसमध्ये प्रवेश केला असून, ती हरियाणा विधानसभेची निवडणूक लढवू शकते.
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये विनेशचं हुकलं होतं पदक : विनेश फोगटनं पॅरिस ऑलिम्पिकमध्ये अप्रतिम कामगिरी केली होती. तिनं 50 किलो कुस्ती प्रकारात अंतिम फेरी गाठली होती. मात्र 100 ग्रॅम जास्त वजनामुळं तिला अपात्र ठरवण्यात आलं. यामुळं तिची ऑलिम्पिक पदक जिंकण्याची संधी हुकली. विनेश फोगटनं देशासाठी 15 पदकं जिंकली आहेत. तिनं वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये 3 कांस्यपदकं जिंकली आहेत. आशियाई क्रीडा स्पर्धेत त्याच्या नावावर एक सुवर्ण आणि एक कांस्यपदक आहे. राष्ट्रकुल स्पर्धेत तिनं तीन सुवर्णपदकं जिंकली आहेत. आशियाई चॅम्पियनशिपमध्ये तिनं एक सुवर्ण आणि तीन रौप्यपदकं जिंकली आहेत.
हेही वाचा :