अनंतपूर Ishan Kishan century : भारताचा युवा यष्टिरक्षक फलंदाज इशान किशननं पुन्हा एकदा आपल्या फलंदाजीची ताकद दाखवून दिली आहे. या डावखुऱ्या फलंदाजानं दुलीप ट्रॉफीमध्ये आक्रमक शतक झळकावलं आहे. इंडिया सी कडून खेळत असलेल्या इशान किशननं शानदार फलंदाजी करताना इंडिया बी विरुद्ध शतक झळकावलं. मोठी गोष्ट म्हणजे इंडिया सी संघानं आपला कर्णधार ऋतुराज गायकवाड दुखापतीमुळं गमावला होता, सामन्याच्या दुसऱ्या चेंडूवर तो रिटायर्ड हर्ट झाला होता. मात्र यानंतर इशान किशननं त्याच्या स्टाईलमध्ये आपलं शतक पूर्ण केलं. इशान किशननं जवळपास 90 च्या स्ट्राईक रेटनं हे शतक केलं. हे त्याचं प्रथम श्रेणी क्रिकेटमधील 7 वं शतक आहे. इशान किशनचं हे शतकही खास आहे, कारण त्यानं 2 वर्षांनंतर प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये शतक केलं आहे.
- Dropped from Central contract.
— Tanuj Singh (@ImTanujSingh) September 12, 2024
- Dropped from Indian Team.
- Comeback in Buchi Babu Tournament.
- Scored Hundred in Buchi Babu.
- Got Injured in Round 1 in Duleep Trophy.
- Now HUNDRED on Duleep Trophy return.
What a Remarkable Comeback by Ishan Kishan - TAKE A BOW, ISHAN. 🫡 pic.twitter.com/XXrydeuWID
पहिल्या सामन्यात खेळू शकला नव्हता इशान : इशान किशन पहिल्या सामन्यात खेळू शकला नाही. या खेळाडूला दुखापत झाल्यानं तो पहिल्या सामन्यातून बाहेर राहिला. पण फिट होताच इशान किशननं आपली प्रतिभा दाखवून दिली. ईशाननं इंडिया बी च्या गोलंदाजांची जोरदार धुलाई केली. विशेषत: फिरकीपटू त्याचं लक्ष्य होतं. त्यानं वॉशिंग्टन सुंदरविरुद्ध शानदार फटके मारले तसंच संधी मिळताच एकही कमकुवत चेंडू सोडला नाही. इशान किशननं या सामन्यात 111 धावांची खेळी केली.
HUNDRED BY ISHAN KISHAN IN DULEEP TROPHY...!!! 🌟
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) September 12, 2024
- The star player announces his arrival return with a remarkable century in just 121 balls. Couldn't play the 1st round due to an injury, but makes a memorable comeback. 👏 pic.twitter.com/KZ7dyeTP4W
इशानसाठी दुलीप ट्रॉफी महत्त्वाची : इशान किशनसाठी दुलीप ट्रॉफी स्पर्धा खूप महत्त्वाची आहे. तो बऱ्याच दिवसांपासून भारतीय संघाच्या बाहेर आहे आणि जर त्यानं या स्पर्धेत चांगली कामगिरी केली तर भारतीय निवड समिती त्याच्या नावावर विचार करु शकतात. तसं, इशाननं नुकताच बुची बाबू टूर्नामेंटही खेळला होता. ज्यातंही त्यानं शतक केलं होतं. आता त्याची बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेत निवड झाली नसून टी 20 मालिकेसाठी संघाची निवड होणे बाकी आहे. तीन सामन्यांच्या टी 20 मालिकेसाठी भारतीय संघात स्थान मिळवणं हे ईशान किशनसाठी मोठं लक्ष्य असेल.
हेही वाचा :