गकबेर्हा WTC Scenario After SA beat SL : दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट संघानं दुसऱ्या कसोटीत श्रीलंकेचा पराभव केला आहे. सेंट जॉर्ज मैदानावर 109 धावांनी पराभव केला. यासह दक्षिण आफ्रिकेनं ही दोन सामन्यांची कसोटी मालिका 2-0 अशी जिंकली आहे. टेम्बा बावुमाच्या संघानं श्रीलंकेला 348 धावांचं लक्ष्य दिलं होतं, ज्याच्या प्रत्युत्तरात श्रीलंकेला केवळ 238 धावा करता आल्या. या विजयासह दक्षिण आफ्रिकेनं जागतिक कसोटी चॅम्पियनशिपची शर्यतही जिंकली आहे. ऑस्ट्रेलियाला मागे टाकत त्यांनी गुणतालिकेत प्रथम क्रमांक पटकावला आहे.
🟢🟡Match Result
— Proteas Men (@ProteasMenCSA) December 9, 2024
It’s done, the battle has concluded!👏
🇿🇦South Africa win by 109 runs down in Gqeberha.
The Proteas take the Test Series 2-0, as the win takes us top of the WTC rankings table!🏏🌍😏#WozaNawe #BePartOfIt #SAvSL pic.twitter.com/Le98NywRrj
आफ्रिकेचा सर्व विभागात चांगला खेळ : WTC च्या दृष्टिकोनातून हा सामना दक्षिण आफ्रिकेसाठी खूप महत्त्वाचा होता. यात संघातील अनेक खेळाडूंनी चमकदार कामगिरी करत महत्त्वाच्या भूमिका बजावल्या. 347 धावांचा बचाव करताना केशव महाराजनं अप्रतिम गोलंदाजी करत 25 षटकांत 76 धावांत 5 बळी घेतले. कागिसो रबाडा आणि डेन पीटरसननं 2-2 विकेट घेतल्या. तर मार्को जॉन्सननं 1 विकेट घेतली. पहिल्या डावात पीटरसननं 5 बळी घेत 30 धावांची आघाडी घेतली होती. संपूर्ण सामन्यात त्यानं 7 विकेट घेतल्या. यासाठी त्याला सामनावीर म्हणूनही निवडण्यात आलं.
Australia's reign at the top of the #WTC25 standings was short-lived as new leaders emerge after South Africa's whitewash of Sri Lanka 👀 #SAvSL | Details 👇
— ICC (@ICC) December 9, 2024
मालिकाही घातली खिशात : दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांव्यतिरिक्त फलंदाजांनीही आपलं काम चोख बजावलं. कर्णधार टेंबा बावुमानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केली. यादरम्यान रायन रिकेल्टन आणि काइल व्हेरिन यांनी शतकं झळकावली. कर्णधार बावुमानं स्वत: अर्धशतक झळकावलं, ज्याच्या जोरावर त्याचा संघ पहिल्या डावात 358 धावांची मोठी धावसंख्या उभारण्यात यशस्वी ठरला. प्रत्युत्तरात श्रीलंकेला 328 धावा करता आल्या. त्यानंतर दुसऱ्या डावातही कर्णधार बावुमा आणि एडन मार्करामच्या अर्धशतकांच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेनं 317 धावा केल्या. पहिल्या डावात 30 धावांच्या आघाडीच्या जोरावर 348 धावांचं एकूण लक्ष्य देण्यात आले. यानंतर श्रीलंकेचा संघ 238 धावांवर गारद झाला आणि सामन्यासह त्यांनी मालिकाही जिंकली.
South Africa seal a 2-0 whitewash against Sri Lanka after a closely-contested win in Gqeberha 🙌#WTC25 | 📝 #SAvSL: https://t.co/grtLlEan8h pic.twitter.com/Y0iM1CUcH4
— ICC (@ICC) December 9, 2024
भारतीय संघ WTC मध्ये तिसऱ्या क्रमांकावर कायम : भारतीय संघाबद्दल बोलायचं झालं तर, ते अजूनही 57.29 च्या पीसीटीसह तिसऱ्या स्थानावर कायम आहेत. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीतील पराभवानंतर भारतीय संघाची समीकरणं बदलली आहेत. आता त्यांना इथून उर्वरित तीनही सामने जिंकावे लागतील, जे इतकं सोपं काम होणार नाही. जर आपण श्रीलंकेबद्दल बोललो तर या सामन्यातील पराभवानंतर त्याचा पीसीटी 45.45 झाला आहे. हा संघ अजूनही चौथ्या स्थानावर आहे, मात्र आता अंतिम फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. मात्र, त्याला जाण्यासाठी इतर संघांवर अवलंबून राहावं लागणार आहे. आता भारत, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका हे चारच संघ अंतिम फेरीच्या शर्यतीत जिवंत आहेत.
🚨 SOUTH AFRICA WILL QUALIFY FOR THE WTC FINAL IF THEY WIN 1 TEST VS PAKISTAN...!!! 🚨 pic.twitter.com/SkjSgy8UX7
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) December 9, 2024
दक्षिण आफ्रिकेला फायनल खेळण्याची मोठी संधी : दक्षिण आफ्रिका विरुद्ध श्रीलंका मालिकेतील हा शेवटचा सामना होता. आता दक्षिण आफ्रिकेला पाकिस्तानविरुद्ध त्यांच्याच घरच्या मैदानावर दोन कसोटी खेळायच्या आहेत. यामध्ये दक्षिण आफ्रिकेचा संघ विजयाची नोंद करण्यात यशस्वी ठरला तर त्यांना WTC फायनल खेळण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही हे निश्चित. दरम्यान, या आघाडीच्या चार संघांसाठी आगामी काही सामने अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत. प्रत्येक सामन्यानंतर समीकरण आणि परिस्थिती बदलत जाईल आणि उत्साह वाढत जाईल.
SOUTH AFRICA AT NO.1 ON THE WTC POINTS TABLE...!!! 🏆 pic.twitter.com/OeEmwcsI7s
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) December 9, 2024
हेही वाचा :