अँटिग्वा (वेस्ट इंडिज) WI vs ENG 1st ODI Live Streaming : वेस्ट इंडिज राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि इंग्लंड राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील तीन वनडे सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना आज म्हणजेच 31 ऑक्टोबर रोजी खेळवला जाणार आहे. नॉर्थ साऊंड, अँटिग्वा येथील सर व्हिव्हियन रिचर्ड्स स्टेडियमवर उभय संघांमधील हा सामना रंगणार आहे. या वनडे मालिकेत वेस्ट इंडिजची कमान शाई होपच्या खांद्यावर असेल. तर इंग्लंडचं नेतृत्व प्रथमच लियाम लिव्हिंगस्टोनकडे असेल.
All smiles in Antigua! 😀 🇦🇬 #WIvENG | #EnglandCricket pic.twitter.com/w5ZHNZQBQ9
— England Cricket (@englandcricket) October 29, 2024
वेस्ट इंडिज नुकतीच गमावली मालिका : वेस्ट इंडिजनं श्रीलंकेविरुद्ध नुकतीच वनडे मालिका 2-1 नं गमावली. मात्र, घरच्या मालिकेत यजमान संघाची नजर मालिका जिंकण्यावर असेल. अशा स्थितीत वेस्ट इंडिज संघाला पहिल्या सामन्यात इंग्लंडचा पराभव करायचा आहे. दुसरीकडं, इंग्लंड संघाला नुकतंच ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्यांच्या घरच्या वनडे मालिकेत 3-2 नं पराभवाचा सामना करावा लागला. याशिवाय पाहुण्या संघाला जॉस बटलरची उणीव भासणार आहे, जो वारंवार होणाऱ्या वासराच्या दुखापतीमुळं मालिकेतून बाहेर पडला आहे. अशा स्थितीत इंग्लंडच्या युवा संघाला पहिल्या सामन्यात वेस्ट इंडिजचा पराभव करुन मालिकेत 1-0 अशी आघाडी घेण्याची इच्छा आहे.
दोन्ही संघांचा हेड-टू-हेड रेकॉर्ड काय : पहिला वनडे आंतरराष्ट्रीय सामना 1973 साली वेस्ट इंडिज आणि इंग्लंड यांच्यात खेळला गेला होता. आतापर्यंत दोन्ही संघांमध्ये एकूण 105 वनडे सामने खेळले गेले आहेत. या कालावधीत इंग्लंड संघानं 53 सामने जिंकले आहेत. तर वेस्ट इंडिजनं 46 जिंकले आहेत. वेस्ट इंडिजच्या भूमीवर दोन्ही संघांमध्ये 47 एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत. या कालावधीत कॅरेबियन संघानं 25 सामने जिंकले आहेत. त्याचबरोबर इंग्लंडनं 18 सामने जिंकले असून 4 सामने अनिर्णित राहिले आहेत.
West Indies v England!⚔️
— Windies Cricket (@windiescricket) October 30, 2024
The action goes down at the Sir Vivian Richards Stadium tomorrow!🇦🇬 #TheRivalry | #WIvENG pic.twitter.com/P3RYockRqu
वनडे मालिकेत कशी कामगिरी : वनडे मालिकेतील वेस्ट इंडिज आणि इंग्लंड यांच्यातील सामना बरोबरीत सुटला आहे. आतापर्यंत इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यात एकूण 22 वनडे मालिका खेळल्या गेल्या आहेत. या कालावधीत दोन्ही संघांनी 9-9 मालिका जिंकल्या आहेत. याशिवाय 4 मालिका अनिर्णित राहिल्या आहेत. घरच्या मैदानावर खेळताना वेस्ट इंडिजनं इंग्लंडला 6 वनडे मालिकेत पराभूत केलं आहे. तर 3 मालिकेत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. याशिवाय 2 मालिका अनिर्णित राहिल्या आहेत.
खेळपट्टी कशी असेल : वेस्ट इंडिज आणि इंग्लंड यांच्यातील पहिला वनडे सामना सर व्हिव्हियन रिचर्ड्स स्टेडियमवर होणार आहे. या खेळपट्टीवर फलंदाजांना खूप मदत मिळते. या मैदानावर प्रथम फलंदाजी करणारा संघ चांगली धावसंख्या उभारु शकतो. या खेळपट्टीचा मूड काळानुसार बदलू शकतो आणि फिरकीपटूंना मदत मिळू शकते. सुरुवातीच्या षटकांमध्ये वेगवान गोलंदाजांना स्विंग मिळण्याची शक्यता असते, तर शेवटच्या षटकांमध्ये फिरकी गोलंदाज वर्चस्व गाजवू शकतात. या खेळपट्टीवर लक्ष्याचा पाठलाग करणं सोपं असल्यानं नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम गोलंदाजी करणं पसंत करेल. दुसऱ्या डावात गोलंदाजांच्या अडचणी वाढू शकतात.
Jewel Andrew & Hayden Walsh Jr. will have their eyes on a maiden International match on home soil in Maroon!🇦🇬#TheRivalry | #WIvENG pic.twitter.com/iMDrtali4h
— Windies Cricket (@windiescricket) October 30, 2024
हवामान कसं असेल : पहिल्या वनडे दरम्यान हवामान उष्ण आणि स्वच्छ असेल. तापमान 25-30 अंशांच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. वेळोवेळी ताजं राहण्यासाठी फलंदाजांना अतिरिक्त खबरदारी घ्यावी लागेल.
मालिकेचं वेळापत्रक :
- पहिला वनडे : 31 ऑक्टोबर
- दुसरा वनडे : 2 नोव्हेंबर
- तिसरा वनडे : 6 नोव्हेंबर
All smiles in Antigua! 😀 🇦🇬 #WIvENG | #EnglandCricket pic.twitter.com/w5ZHNZQBQ9
— England Cricket (@englandcricket) October 29, 2024
वेस्ट इंडिज आणि इंग्लंड यांच्यातील पहिला वनडे सामना कधी खेळला जाईल?
वेस्ट इंडिज आणि इंग्लंड यांच्यातील पहिला वनडे सामना आज, गुरुवारी, 31 ऑक्टोबर रोजी भारतीय वेळेनुसार रात्री 11:30 वाजता नॉर्थ साउंड, अँटिग्वा येथील सर व्हिव्हियन रिचर्ड्स स्टेडियमवर खेळला जाईल.
वेस्ट इंडिज आणि इंग्लंड यांच्यातील पहिला वनडे सामना कधी, कुठं आणि कसा पाहायचा?
सध्या भारतातील कोणत्याही टीव्ही चॅनलवर वेस्ट इंडिज विरुद्ध इंग्लंड यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेच्या प्रसारणाबद्दल कोणतीही माहिती नाही. तथापि, वेस्ट इंडिज विरुद्ध इंग्लंड एकदिवसीय मालिकेचे थेट प्रक्षेपण फॅनकोड ॲप आणि वेबसाइटवर भारतात उपलब्ध असेल.
दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन :
वेस्ट इंडिज : एविन लुईस, ब्रँडन किंग, शाई होप (यष्टिरक्षक), शेरफेन रदरफोर्ड, रोस्टन चेस, शिमरॉन हेटमायर, रोमॅरियो शेफर्ड, गुडाकेश मोती, अल्झारी जोसेफ, शमर जोसेफ, हेडन वॉल्श/जेडेन सील्स.
इंग्लंड : फिलिप सॉल्ट (यष्टिरक्षक), मायकेल-काईल पेपर, विल जॅक, जॉर्डन कॉक्स, जेकब बेथेल, लियाम लिव्हिंगस्टोन (कर्णधार), डॅन मौसली, सॅम कुरन, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद, रीस टोपली.
हेही वाचा :