सेंट किट्स WI vs BAN 3rd ODI Live Streaming : वेस्ट इंडिज राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध बांगलादेश राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना उद्या म्हणजेच 12 डिसेंबर रोजी खेळवला जाईल. उभय संघांमधला हा सामना वॉर्नर पार्क, बॅसेटेरे, सेंट किट्स इथं भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता खेळवला जाईल. वॉर्नर पार्कवर बांगलादेशविरुद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यात वेस्ट इंडिजच्या नजरा सीरिज क्लीन स्वीपकडे आहेत.
West Indies vs Bangladesh | 3rd ODI | 7:30 PM
— Bangladesh Cricket (@BCBtigers) December 11, 2024
Warner Park, Basseterre, St. Kitts | December 12, 2024#BCB | #Cricket | #BANvWI pic.twitter.com/9CzmGvtFIU
यजमान संघानं जिंकली मालिका : यजमान वेस्ट इंडिज संघानं तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी आघाडी अभेद्य घेतली आहे. पहिल्या वनडे सामन्यात वेस्ट इंडिजनं बांगलादेशचा 5 विकेटनं पराभव केला. तर दुसऱ्या वनडे सामन्यात पाहुण्या संघाला वेस्ट इंडिजनं 7 विकेट्सनं पराभूत केलं. यासह वेस्ट इंडिजनं बांगलादेशविरुद्ध 10 वर्षांनी वनडे मालिका जिंकली आहे. आता मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना जिंकून वेस्ट इंडिज संघाला बांगलादेशचा मालिकेत धुव्वा उडवायचा आहे. तर दुसरीकडं बांगलादेशचा संघ हा सामना जिंकत प्रतिष्ठा वाचवण्याच्या इराद्यानं मैदानात उतरेल. परिणामी दोन्ही संघांमधील रोमांचक सामना तुम्ही पाहू शकता.
The job isn't over yet!😤
— Windies Cricket (@windiescricket) December 11, 2024
WI rally again for a clean sweep tomorrow!🎯#WIvBAN | #WIHomeForChristmas pic.twitter.com/kiZvKd4LHs
बांगलादेशनं गमावली दुसरी मालिका : अलीकडेच बांगलादेशनं अफगाणिस्तानविरुद्धची मालिका 2-1 नं गमावली आहे. यानंतर आता वेस्ट इंडिजविरुद्धही त्यांना मालिका गमवावी लागली आहे. त्यामुळं हा सामना जिंकण्याचा बांगलादेश पुर्ण प्रयत्न करणार आहे. कर्णधार मेहंदी हसन मिराजनं गेल्या काही मालिकांमध्ये चमकदार कामगिरी केली आहे. मुस्तफिझूर रहमान आणि शोरीफुल इस्लाम सारख्या गोलंदाजांना अनुभव आहे. फलंदाजीत महमुदुल्लाह आणि तौहीद हृदोय यांच्याकडून खूप अपेक्षा असतील. याशिवाय जाकर अली यष्टिरक्षक म्हणूनही महत्त्वाचं योगदान देऊ शकतो.
A moment to remember. Debutant Marquino Mindley takes today's CG United Moment of the Match.👏🏾 #WIvBAN | #MatchMoment pic.twitter.com/lt9yJT3CBG
— Windies Cricket (@windiescricket) December 10, 2024
खेळपट्टी कशी असेल : वेस्ट इंडिज आणि बांगलादेश क्रिकेट संघ यांच्यातील तीन वनडे सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना आज सेंट किट्स इथं खेळवला जाणार आहे. वॉर्नर पार्कची खेळपट्टी फलंदाज आणि गोलंदाज दोघांसाठी उपयुक्त ठरु शकते, परंतु वेगवान गोलंदाजांना सुरुवातीला थोडी मदत मिळू शकते. 2018 साली वेस्ट इंडिज आणि बांगलादेश यांच्यातील शेवटच्या वनडे सामन्यात एकूण 584 धावा झाल्या होत्या, परंतु या सामन्यात आणखी धावा अपेक्षित आहेत. खेळपट्टी वेगवान असेल आणि गोलंदाजांसाठी ती आव्हानात्मक असेल. या खेळपट्टीवर फलंदाजी करणं अधिक फायदेशीर ठरु शकतं. या खेळपट्टीवर, गेल्या 11 पैकी 9 वेळा प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघानं सामने जिंकले आहेत.
Getting it done at the top of the order.🫱🏾🫲🏽#WIvBAN #WIHomeForChristmas pic.twitter.com/tlmxX8BEGS
— Windies Cricket (@windiescricket) December 10, 2024
दोन्ही संघांचा हेड-टू-हेड रेकॉर्ड काय : वेस्ट इंडिज आणि बांगलादेश यांच्यात आतापर्यंत एकूण 46 वनडे सामने खेळले गेले आहेत. यात दोन्ही संघांमध्ये चुरशीची स्पर्धा झाली. वेस्ट इंडिजनं 23 वनडे सामने जिंकले असून बांगलादेशनं 21 वनडे सामने जिंकले आहेत. तर दोन सामन्यांचा निकाल लागला नाही. या सामन्यात चुरशीची लढत होण्याची शक्यता आहे.
Crucial innings with the bat today!👏🏾#WIvBAN | #WIHomeForChristmas pic.twitter.com/FORNMVRQeI
— Windies Cricket (@windiescricket) December 10, 2024
वेस्ट इंडिज विरुद्ध बांगलादेश तिसरा वनडे सामना कधी आणि कुठं होईल?
वेस्ट इंडिज विरुद्ध बांगलादेश यांच्यातील तिसरा सामना आज 12 डिसेंबर रोजी वॉर्नर पार्क, बॅसेटेरे, सेंट किट्स इथं भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 07:00 वाजता खेळवला जाईल. ज्याची नाणेफेक संध्याकाळी 06.30 वाजता होईल.
वेस्ट इंडिज विरुद्ध बांगलादेश तिसरा वनडे सामना कुठं आणि कसा पहावा?
भारतातील कोणत्याही टीव्ही चॅनेलवर वेस्ट इंडिज आणि बांगलादेश यांच्यातील तीन सामन्यांची वनडे मालिका प्रसारित करणारी कोणतीही माहिती उपलब्ध नाही. मात्र, चाहते फॅनकोड ॲप आणि वेबसाइटवर या सामन्याचं लाईव्ह स्ट्रीमिंग पाहू शकतात.
A 🔟 year ODI series drought comes to an end against Bangladesh.👏🏾
— Windies Cricket (@windiescricket) December 10, 2024
WI win the CG United ODI series with one more match to play.🏆 #WIvBAN | #WIHomeForChristmas pic.twitter.com/rFdct1EQNg
दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग 11 :
वेस्ट इंडिज : ब्रँडन किंग, एविन लुईस, केसी कार्टी, शाई होप (यष्टिरक्षक/कर्णधार), शेरफेन रदरफोर्ड, जस्टिन ग्रीव्हज, रोस्टन चेस, रोमॅरियो शेफर्ड, गुडाकेश मोती, अल्झारी जोसेफ, जेडेन सील्स.
बांगलादेश : जाकर अली, लिटन दास (यष्टीरक्षक), तन्झीद हसन, सौम्या सरकार, मेहदी हसन मेराझ (कर्णधार), महमुदुल्लाह, अफिफ हुसेन, रिशाद हुसेन, तन्झीम हसन साकिब, तस्किन अहमद, नाहिद राणा.
हेही वाचा :