सेंट किट्स WI Beat BAN in 1st ODI : बांगलादेश क्रिकेट संघ सध्या वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर आहे. दोन्ही संघांमधील कसोटी मालिका 1-1 अशी बरोबरीत सुटल्यानंतर आता 3 सामन्यांची वनडे मालिका सुरु झाली आहे. त्याचा पहिला सामना रविवारी 8 डिसेंबर रोजी सेंट किट्सच्या मैदानावर खेळला गेला. वेस्ट इंडिज संघानं हा सामना 5 विकेटनं जिंकला. या विजयाचा सर्वात मोठा हिरो ठरला शेरफान रदरफोर्ड, त्याच्या वादळी शतकाच्या जोरावर वेस्ट इंडिज संघानं या विक्रमी आव्हानाचा पाठलाग केला आणि बांगलादेशविरुद्ध 11 सामन्यातील पराभवाची मालिका संपुष्टात आणली. यासह वेस्ट इंडिजनं मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.
Sherfane Rutherford's maiden ODI century powers the West Indies to an early series lead 👏#WIvSA 📝 https://t.co/WcwgfNF9RA pic.twitter.com/voCakocuBa
— ICC (@ICC) December 8, 2024
विक्रमी धावांचा पाठलाग करताना रदरफोर्डनं ठोकलं शतक : सेंट किट्सच्या मैदानावर प्रथम फलंदाजी करताना बांगलादेश संघानं 295 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. आजपर्यंत या मैदानावर कोणत्याही संघाला एवढ्या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करता आला नव्हता. शेरफान रदरफोर्डनं अवघ्या 80 चेंडूत 140 च्या स्ट्राईक रेटनं 113 धावा करुन सामना एकतर्फी केला. यादरम्यान त्यानं 7 चौकार आणि 8 षटकार मारले. त्याच्या खेळीमुळं वेस्ट इंडिजनं 14 चेंडू शिल्लक असताना या मैदानावरील सर्वोच्च धावसंख्येचा पाठलाग केला. या जबरदस्त कामगिरीसाठी रदरफोर्डला सामनावीर म्हणूनही निवडण्यात आले. एवढंच नाही तर वनडे क्रिकेटमध्ये बांगलादेशकडून सलग 11 सामने गमावल्यानंतर वेस्ट इंडिजनं विजयाची चव चाखली. वेस्ट इंडिजनं यापुर्वी 11 डिसेंबर 2018 रोजी मिरपुरमध्ये बांगलादेशचा पराभव केला होता. यानंतर त्यांनी आता विजय मिळवला आहे.
Rutherford's stand at the crease was crucial to two big partnerships to bring home the 1st win of the series.💥#WIvBAN | #WIHomeForChristmas pic.twitter.com/IZ74ASiJbG
— Windies Cricket (@windiescricket) December 8, 2024
A huge win for the #MenInMaroon, a record run chase at Warner Park in the first CG United ODI!🙌🏾🙌🏾🙌🏾🎉#WIvBAN | #WIHomeForChristmas pic.twitter.com/958r6Q56Rk
— Windies Cricket (@windiescricket) December 8, 2024
कशी राहिली फलंदाजी : सेंट किंटच्या मैदानावर 295 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करता आला नाही. वेस्ट इंडिजनंही पाठलाग करताना 94 धावांवर 3 विकेट गमावल्या. यानंतर रदरफोर्ड पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आला. प्रथम त्यानं शाय होपसोबत 99 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. मात्र कर्णधार होप 88 चेंडूत 86 धावा करुन 193 धावांवर बाद झाला. यानंतरही रदरफोर्ड क्रीजवरच राहिला. जस्टिन ग्रीव्हजसोबत त्यानं पुन्हा एकदा पाचव्या विकेटसाठी 95 धावा जोडल्या. यादरम्यान त्यानं बरेच चौकार आणि षटकार मारले, ज्यामुळं सामना वेस्ट इंडिजकडे वळला. मात्र, तो 288 धावांवर बाद झाला पण तोपर्यंत सामना वेस्ट इंडिजच्या हातात होता. आता त्यांना 20 चेंडूत फक्त 7 धावा करायच्या होत्या, जे बाकीच्या फलंदाजांनी सहज साध्य केलं.
RUTHERSSSS!!👏🏽
— Windies Cricket (@windiescricket) December 8, 2024
Maiden ODI ton from Sherfane Rutherford, what a moment!💯#WIvBAN #WIHomeForChristmas pic.twitter.com/Ho6S9k1541
हेही वाचा :